
Kanpur Blast: उत्तर प्रदेशमधील कानपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या दाट लोकवस्तीच्या मूलगंज परिसरात एक मोठा स्फोट झाल्याची बातमी आहे. या स्फोटात 8 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. जेथे स्फोट झाला, तो मूलगंज भाग फटाक्यांसाठी मोठे बाजारपेठ आहे. दिवाळीच्या सणादरम्यान मूलगंज बाजारपेठेत फटाक्यांचा मोठा व्यापार होतो. हा स्फोट काही वेळापूर्वी झाला आहे. जखमींना उपचारासाठी कानपूरच्या सरकारी रुग्णालय उर्सला येथे पाठवण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
कानपूरमध्ये ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी डॉग स्क्वॉड (Dog Squad), बॉम्ब शोधक पथक (Bomb Disposal Squad) आणि मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले आहेत. या स्फोटात दोन स्कुटींचं मोठं नुकसान झालंय. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
कानपूरचे संयुक्त पोलीस आयुक्त (Joint CP) आशुतोष कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, हा स्फोट रस्त्यावर उभ्या असलेल्या दोन स्कुटीच्या डिक्कीमध्ये (storage box) झाला आहे. ते म्हणाले की, कोतवाली (Kotwali) हद्दीत एका घरासमोर असलेल्या दुकानाजवळ ही घटना घडली आहे. 'मूलगंज पोलीस ठाण्यांतर्गत मिश्री बाजार परिसरात दोन स्कूटर उभ्या होत्या, ज्यामध्ये स्फोट झाला. ही घटना अंदाजे संध्याकाळी 7.15 वाजताची आहे. एकूण 8 लोक जखमी आहेत, ज्यात एका महिलेचा समावेश आहे.'
( नक्की वाचा : Nobel Peace Prize: डोनाल्ड ट्रम्प यांचा पत्ता कट! नोबेल शांतता पुरस्काराच्या शर्यतीत कोण पुढे? वाचा सविस्तर )
त्यांनी सांगितले की, 2 लोकांना सुरुवातीला किरकोळ उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे, तर इतरांवर अजूनही उपचार सुरू असून, सर्व जण धोक्याबाहेर आहेत.

त्यांनी पुढे सांगितले, 'आमचे फॉरेन्सिक पथक (Forensic Team) घटनास्थळी उपस्थित आहे आणि आम्ही स्फोटाचे कारण काय असू शकते हे तपासत आहोत... आम्ही स्कूटरचा शोध घेतला आहे आणि त्या चालवणाऱ्यांचीही चौकशी केली जाईल. हा अपघात होता की कट, हे नंतरच कळेल.' डिक्कीमध्ये काय सामान होते, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, सध्या तपास सुरू आहे.
हा स्फोट इतका तीव्र होता की संपूर्ण बाजार स्फोटाने दणाणून गेला. यामुळे घटनास्थळी पळापळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world