जाहिरात

Karnataka IPS Officer : मेहनत करुन IPS बनला, मात्र पहिली पोस्टिंग घेण्यासाठी जाताना वाटेतच अपघाती मृत्यू

IPS Harsh Bardhan : अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

Karnataka IPS Officer : मेहनत करुन IPS बनला, मात्र पहिली पोस्टिंग घेण्यासाठी जाताना वाटेतच अपघाती मृत्यू
IPS Harsh Bardhan

कर्नाटकात IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची दु:खद घटना समोर आली आहे. हर्षवर्धन असं 26 वर्षीय मृत आयपीएस अधिकाऱ्याचं नाव आहे. हर्षवर्धन कर्नाटक केडरचे 2023 बॅचचे आयपीएस अधिकारी असून ते मध्य प्रदेशचे रहिवासी होते. पहिल्या पोस्टिंगनंतर पदभार स्वीकारण्यासाठी जात असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हसन तालुक्यातील किटणेजवळ रविवारी सायंकाळी पोलिसांच्या वाहनाचा टायर फुटल्याने हा अपघात झाला. टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरावर व झाडावर आदळले. अपघातात हर्षवर्धन यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 

(नक्की वाचा-  फुटबॉल सामन्यादरम्यान फॅन्समध्ये तुंबळ हाणामारी, 100 हून अधिक जणांचा मृत्यू)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन यांनी नुकतेच म्हैसूर येथील पोलीस अकादमीमध्ये चार आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. प्रशिक्षण पूर्ण झाल्याने ते सोमवारी होलेनरसीपूर येथे प्रोबेशनरी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू होणार होते. 

हसनचे पोलीस अधीक्षक मोहम्मद सुजीत आणि सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटेश नायडू यांनीही हॉस्पिटलला भेट देऊन हर्षवर्धन यांना श्रद्धांजली वाहिली आणि घटनेची माहिती घेतली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हर्षवर्धन यांच्या कुटुंबाप्रती शोक व्यक्त केला आहे. 

(नक्की वाचा-  Shobhita Shivanna : दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध अभिनेत्री घरात आढळली मृतावस्थेत)

सिद्धरामय्या यांनी ट्वीट करत म्हटलं की,'हसन-म्हैसूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात आयपीएस अधिकारी हर्षवर्धन यांच्या मृत्यूबद्दल ऐकून दुःख झाले. कार्यभार स्वीकारण्यासाठी जात असताना असा हा अपघात झाला, ही अत्यंत खेदाची बाब आहे. त्यांच्या वर्षानुवर्षे केलेल्या कष्टाचे फळ मिळाले, तेव्हा असे घडायला नको होते. हर्षवर्धन यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो."
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com