राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता दोन महत्त्वाच्या मुद्दांवर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील एका दहशतवाद्याने संभाव्य हल्ल्याचा संकेत दिला होता. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. हा हल्ला अत्यंत नियोजित होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तर दुसरीकडे आता NIAने पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या तपासात 14 स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहेत, जे लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनांशी संबंधित आहेत. या व्यक्तींनी परदेशी दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत केली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आलं
नक्की वाचा - Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर
1. हल्ल्यापूर्वी गुप्तचर इशारा
पहलगाम हल्ल्याच्या काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील एका दहशतवाद्याने संभाव्य हल्ल्याचा संकेत दिला होता. परंतु, सुरक्षा यंत्रणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. हा हल्ला अत्यंत नियोजित होता, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरून मार्गदर्शन मिळत होते. हल्लेखोरांनी हेल्मेट-माउंटेड कॅमेरे वापरून हल्ल्याचे दृश्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता.
2. NIA चा तपास आणि स्थानिक संशयित
राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने पहलगाम हल्ल्याच्या तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या तपासात 14 स्थानिक दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली आहे. जे पाकिस्तान-आधारित लष्कर-ए-तोयबा (LeT), जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि हिजबुल मुजाहिदीन (HM) या संघटनांशी संबंधित आहेत. या व्यक्तींनी परदेशी दहशतवाद्यांना स्थानिक पातळीवर मदत केली आहे. तपासादरम्यान, काही स्थानिक व्यक्तींनी हल्ल्याच्या दिवशी आपली दुकाने उघडली नाहीत, ज्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे .