जाहिरात

Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर

NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे.

Pahalgam Terror Attack: NIA प्राथमिक तपास अनेक धक्कादायक खुलासे, वाचा सविस्तर

Pahalgam Terrorist Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास NIA कडून केला जात आहे. एनआयएच्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक खुलासा समोर आले आहे. हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI यांचा हात असल्याचे पुरावे मिळाले असल्याची प्राथमिक माहिती एनआयएच्या तपासात समोर आल्याचं सूत्रांच्या माध्यमातून  कळतंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गुरुवारी NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी दहशतवादी हल्ला जिथे झाला त्या घटनास्थळी भेट दिली होती. हल्ल्यात सामील दोघे दहशतवादी – हाशमी मूसा आणि अली भाई ऊर्फ तल्हा भाई – हे पाकिस्तानचे नागरिक असल्याचे समोर आले आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी ‘हँडलर्स'च्या संपर्कात होते. पाकिस्तानातून त्यांना थेट सूचना मिळत होत्या. ISI च्या सूचनेवर लष्करच्या मुख्यालयात हा संपूर्ण कट रचण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: चुन-चुन कर मारेंगे! अमित शाहंनी दहशतवाद्यांना ठणकावले

NIA चा आतापर्यंतचा तपास

>> पहलगाम येथील घटनास्थळाची 3D मॅपिंग केली, ज्यामुळे दहशतवाद्यांची एन्ट्री आणि एक्झिटची माहिती मिळेल
>> गुन्ह्याच्या परिसरातील कॉल डंप डेटा गोळा केला
>> 2800 हून अधिक लोकांची चौकशी
>> 150 हून अधिक जण अजूनही ताब्यात
>> घटनास्थळावरून सापडलेले 40 पेक्षा अधिक काडतुसे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले
>> अनेक प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले
>> अनेक ‘ओव्हर ग्राउंड वर्कर्स' (OGW) अटकेत
>> सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे
>> दहशतवाद्यांनी वापरलेले सॅटेलाइट फोन तपासणीखाली
>> पहलगाममधील रेकी केलेल्या जागांची ओळख पटवली
>> फोटोग्राफर, हॉटेल मालक, दुकानदार, झिपलाइन कर्मचारी, पर्यटक मार्गदर्शक यांचे जबाब घेतले
>> बंदी घालण्यात आलेल्या संघटना – हुर्रियत व जमाते इस्लामी – संबंधित लोकांवर छापे मारले

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: