
Pahlgam Terrorist Attack : पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेले दहशतवादी अजूनही फरार आहेत. सुरक्षा दलाकडून त्यांचा शोध सुरु आहे. त्याचबरोबर काश्मीारमध्ये दहशतवाद्यांच्या समर्थकांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या अनेकांना सैन्यानं ताब्यात घेतलंय.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर मंगळवारी (29 एप्रिल) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. काश्मीरमधील जवळपास 50 पर्यटन स्थळ सुरक्षेच्या कारणामुळे बंद करण्यात आले आहेत. पर्यटन स्थळांना दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्यानं ही ठिकाणं सध्या बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जम्मू काश्मीरमधील कोणते पर्यटन स्थळ बंद?
बांदीपोरा जिल्हा
- गुरेज घाटी (बाहेरच्या लोकांसाठी बंद)
- बडगाम
- यूसमार्ग
- तौसीमैदान
- दूधपथरी
- कुलगाम
- अहरबल
- कौसरनाग
कुपवाडा जिल्हा
- बंगस
- करिवान गोताखोर
- चंडीगाम
- हंदवाड़ा
- बंगस घाटी
- सोपोर
- वुलर/वाटलॅब
- रामपोरा आणि राजपोरा
- चेरहार
- मुंडिज-हमाम-मरकूट झरना
- खंपू, बोस्निया, विजीटॉप
अनंतनाग जिल्हा
- सूर्य मंदिर खीरीबल
- वेरीनाग गार्डन
- सिंथन टॉप
- मार्गनटॉप
- अकाड पार्क
बारामुला जिल्हा
- हब्बा खातून पॉईंट कंवर
- बाबरेशी तंगमार्ग
- रिंगावली तंगमार्ग
- गोगलदारा तंगमार्ग
- बदेरकोट तंगमार्ग
- श्रुंज झरना
- कमानपोस्ट उरी
- नामब्लान झरना
- इको पार्क खडनियार
पुलवामा जिल्हा
- संगरवानी
श्रीनगर जिल्हा
- जामिया मशिद
- बादामवारी
- राजोरी कदल होटल कनाज़
- आली कदल जे जे फूड रेस्टॉरंट
- आइवरी होटल गंदताल (थीड)
- पदशापाल रिसॉर्ट्स और रेस्तरां (फकीर गुजरी)
- चेरी ट्री रिसॉर्ट (फकीर गुजरी)
- नॉर्थ क्लिफ कॅफे और रिट्रीट बाय स्टे पॅटर्न (अस्टानमार्ग पैराग्लाइडिंग पॉईंट)
- वन पहाड़ी कुटिया (अस्तान मोहल्ला, दारा)
- इको विलेज रिसॉर्ट (दारा)
- अस्तानमार्ग व्यू पॉईंट
- अस्तानमार्ग पॅराग्लाइडिंग स्पॉट
- ममनेथ और महादेव पहाड (फकीर गुजरीचा मार्ग)
- बौद्ध मठ, हरवान
- दाचीगाम – ट्राउट फार्म/मत्स्य पालन फार्म
- अस्तानपोरा (विशेषत: कयाम गाह रिसॉर्ट)
गांदरबल जिल्हा
- लछपत्री लेटरल
- हंग पार्क
- नारानाग
( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : 'पुढची सुट्टी काश्मीरमध्ये घालवणार', पहलगाम हल्ल्यानंतर अभिनेत्याची घोषणा )
सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सुरक्षेचा आढवा सातत्यानं घेतला जात आहे. आगामी काळात या यादीमध्ये आणखी काही ठिकाणांचा समावेश होऊ शकतो. काश्मीरमधील दूर्गम भागातील तसंच गेल्या 10 वर्षांमध्ये सुरु झालेल्या काही नव्या ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी कोणता औपचारिक आदेश जारी केलेला नाही. पण, या स्थळांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. दक्षिण काश्मीरमधील अनेक 'मुघल गार्डन' देखील बंद करण्यात आले आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world