Kolkata Doctor Case : 'एका रात्रीत आमचं सगळं संपलं", पीडित डॉक्टर तरुणीच्या आई-वडिलांचा आक्रोश

तरुणीच्या आई-वडिलांनी सांगितलं की, "आमच्या मुलीचं गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बणण्याचं स्वप्न होते. त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. घराची बेताची परिस्थिती, कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होते.

जाहिरात
Read Time: 2 mins

पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 31 वर्षांच्या डॉक्टर तरुणीची बलात्कार करुन निर्घृण हत्या करण्यात आली. या संतापजनक घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होण्याची मागणी देशभरातील डॉक्टरांकडून होत आहे. आपल्या मुलीच्या अशा मृत्यूने आई-वडिलांना देखील मोठा धक्का बसला आहे. टेलरिंगचं दुकान चालवून आपल्या मुलीला आई-वडिलांनी उच्च शिक्षण दिलं. मात्र आमची सर्व स्वप्ने एका रात्री भंगली असल्याची प्रतिक्रिया पीडित डॉक्टर तरुणीच्या वडिलांनी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तरुणीच्या वडिलांनी सांगितलं की, "आमच्या मुलीचं गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर बणण्याचं स्वप्न होतं. त्यासाठी ती अहोरात्र मेहनत करत होती. घराची बेताची परिस्थिती, कुटुंबावर असलेलं कर्ज तिला फेडायचं होतं. आमच्या कष्टाची परतफेड करण्यासाठी, जीवन सुधारण्यासाठी ती प्रयत्न करत होती. तिने डॉक्टर बनण्यासाठी खूप मेहतन घेतली. मात्र एका रात्रीत सगळं संपलं." TOI ला पीडितेच्या पालकांना प्रतिक्रिया दिली.

(नक्की वाचा - महिला डॉक्टर बलात्कार, हत्या प्रकरणामध्ये मोठी अपडेट, हायकोर्टानं दिला आदेश)

"यंदाचं वर्ष आमच्यासाठी खास होतं. कारण आमच्या मुलीने यावर्षी दुर्गा पूजेचे मोठं आयोजन करण्याचं ठरवलं होते. आमच्या घरातील दुर्गा पूजेचं हे तिसरं वर्ष होतं. तसेच यावर्षी तिचं वैद्यकीय पदवीचं शिक्षण देखील पूर्ण होणार होतं. त्यामुळे यावर्षी ती उत्साहात होती. मात्र आता तसं काहीच होणार नाही. आता आमची एवढीच आशा आहे की दोषींचा कठोर शिक्षा व्हावी आणि तिच्या आत्म्याला शांती मिळावी", अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने दिली आहे. 

"कुटुंबात ती एक आदर्श मुलगी होती. तिच्या अभ्यासू वृत्ती आणि मितभाषी स्वभावाने ती सर्वांना आपलेसे करत असे. तिने JEE आणि मेडिकल अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या", असं एका नातेवाईकाने सांगितलं. कोरोना काळातील परिस्थिती पाहून, डॉक्टरांचं काम पाहून तिने 'रेस्परेटरी मेडिसीन' या स्पेशलायझेशन करण्याचा निर्णय घेतला होता. आरजी कर कॉलेज तिचं दुसरं घर असल्याचं बोललं जात असे. कारण तिला तिच्या कामाप्रति खूप प्रेम होतं. कामाचे तास आणि शैक्षणिक वेळापत्रक यामुळे तिला झोपायलाही कमी वेळ मिळत असे. 

(नक्की वाचा - न्यायालयातच वकील कोसळला, न्यायाधीशही धावले; नागपुरात वकिलाचा धक्कादायक शेवट!)

तिचे शिक्षक असलेले अर्णब बिस्वास यांनी याबाबत सांगितलं की, "एमबीबीएसची तिने केवळ करिअरची निवड केलेली नव्हती तिची त्यात आवड होती. ती केवळ शैक्षणिकदृष्ट्या चांगली नव्हती तर त्या क्षेत्रासाठी खूप वचनबद्धही होती. ती देशातील सर्वोत्तम डॉक्टर बनू शकली असती. कुणी आजारी पडलं की ती खूप अस्वस्थ व्हायची."