Kurnool Bus Fire: आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे शुक्रवारी पहाटे झालेल्या भीषण बस अपघाताला (Kurnool Bus Accident) एका मद्यधुंद मोटारसायकल स्वाराची (Motorcycle Rider) टक्कर कारणीभूत ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अपघातात दोन लहान मुलांसह, मोटारसायकल चालक आणि बसमधील एकूण 20 जणांचा मृत्यू झाला, तर 9 प्रवासी जखमी झाले. अपघातापूर्वीचा मोटारसायकल स्वाराचा एक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये तो व्यक्ती दारूच्या नशेत (Drunk) असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
काय आहे व्हिडिओ?
बेंगळुरूकडे (Bengaluru) जाणाऱ्या एका खासगी बसला कुरनूलजवळ मोटारसायकलने धडक दिल्यानंतर ही दुर्घटना घडली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेची पोलीस वेगवेगळ्या दृष्टिकोनातून चौकशी करत आहेत. याच चौकशीदरम्यान पोलिसांच्या हाती एका पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) लागले आहे. हे फुटेज अपघाताला जबाबदार असलेल्या मोटारसायकल चालकाचे आहे.
व्हिडिओमध्ये दिसतं की, तो व्यक्ती आणखी एका साथीदारासोबत पेट्रोल घेण्यासाठी पंपावर आला होता. मात्र, तिथे कर्मचारी नसल्याने तो परत जाऊ लागला. पंपातून बाहेर पडताना त्याची मोटारसायकल डगमगत होती. तो तोल जाऊन पडण्यापासून तो थोडक्यात वाचला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो दारूच्या नशेत बेदरकारपणे मोटारसायकल चालवत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
( नक्की वाचा : Kurnool Bus Accident: 234 स्मार्टफोन्स ठरले 19 प्रवाशांच्या मृत्यूला कारणीभूत; बस दुर्घटनेतील धक्कादायक खुलासा )
कसा झाला अपघात?
बेंगळूरु पोलिसांना (Bengaluru Police) संशय आहे की, मोटारसायकल स्वाराच्या निष्काळजीपणामुळे बसला आग लागून मोठे नुकसान झाले. अपघाताच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. अपघातातून बचावलेल्या एन. रमेश (N Ramesh) यांच्या तक्रारीवरून कर्नूल जिल्ह्यातील उल्लिंडाकोंडा पोलिस ठाण्यात (Ullindakonda Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, मोटारसायकल चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवल्याच्या आणि वेगाच्या आरोपाखाली 'व्ही कावेरी ट्रॅव्हल्स' (V Kaveri Travels) बसच्या दोन चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर मोटारसायकल काही अंतरापर्यंत बसच्या खाली ओढली गेली. याच वेळी मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीचे झाकण उघडले गेले आणि आग लागली, अशी माहिती पोलिसांनी दिली. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बहुतांश प्रवाशांचे मृतदेह इतके जळाले आहेत की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
रमेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'व्ही कावेरी ट्रॅव्हल्स'च्या या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते आणि ती हैदराबादहून (Hyderabad) बेंगळुरूला जात होती. "कर्नूल ओलांडल्यानंतर पहाटेच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि बसच्या पुढील भागात आग लागली," असे रमेश यांनी तक्रारीत म्हटले आहे.
( नक्की वाचा : Kurnool Bus Fire: बंद दार, पडदे आणि.. धावत्या बसमध्ये 19 जणांचा कोळसा ! वाचलेल्या प्रवाशांचा थरारक अनुभव )
रमेश यांनी मागची काच तोडून पत्नी आणि मुलांसह बसमधून उडी मारली आणि स्वतःचा जीव वाचवला. मात्र, धुरामुळे आणि आगीमुळे अडकलेल्या त्यांचा मित्र जी. रमेश (G Ramesh) यांच्यासह इतर अनेकांना ते वाचवू शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले. कर्नूल पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) विक्रांत पटेल (Vikrant Patel) यांनी माहिती दिली की, या घटनेप्रकरणी उल्लिंडाकोंडा पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita - BNS) च्या कलम 125(ए) (मानवी जीविताला धोका निर्माण करणे) आणि 106(1) (निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवणे) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
इथे पाहा संपूर्ण Video
कुरनूल बस हादसा: आरोपी बाइक सवार वीडियो में कैद, शराब के नशे में कर रहा था लापरवाही से ड्राइविंग
— NDTV India (@ndtvindia) October 25, 2025
सीसीटीवी फुटेज में युवक को पेट्रोल पंप से बाइक लापरवाही से चलाते हुए देखा गया है. पुलिस के अनुसार, वह शराब के नशे में था और उसकी लापरवाह ड्राइविंग के चलते बस के पास आग लगने की घटना… pic.twitter.com/DCjO6tabKR
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world