जाहिरात

LPG Cylinder Booking Tips: गॅस सिलिंडर फोनवरून बुक होत नाहीय? या 7 पर्यायाद्वांरे काही मिनिटांमध्ये करा बुकिंग

Alternate Ways To Book LPG Gas Cylinder: गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी चार पर्यायांबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

LPG Cylinder Booking Tips: गॅस सिलिंडर फोनवरून बुक होत नाहीय? या 7 पर्यायाद्वांरे काही मिनिटांमध्ये करा बुकिंग
"LPG गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी 4 सोप्या पद्धती"
PTI
  • देशात एलपीजी गॅसच्या कमतरतेची भीती वाढली आहे आणि सिलिंडर बुकिंगसाठी गर्दी वाढली आहे
  • ग्राहक व्हाट्सअ‍ॅपवर वेगळ्या क्रमांकांवर संदेश पाठवून सोप्या पद्धतीने सिलिंडर बुक करू शकतात
  • एसएमएसद्वारेही ग्राहक रजिस्टर्ड नंबरवर दिलेल्या क्रमांकांवर संदेश पाठवून गॅस सिलिंडरची बुकिंग करू शकतात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

LPG Gas Cylinder Booking:  आखाती देशांमध्ये वाढत्या तणावामुळे देशात गॅसची टंचाई निर्माण होईल की काय? अशी भीती लोकांना वाटू लागली आहे. यामुळे अनेकांनी आतापासूनच सिलिंडर बुक करण्यास सुरुवात केली आहे. साधारणपणे बुकिंग फोन कॉलद्वारे होते, पण सध्या त्यात अनेक अडचणी येत आहेत. परिणामी गॅस एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. जर तुमचाही घरगुती गॅस सिलिंडर संपत आला असेल आणि फोन कॉलद्वारे बुकिंग होत नसेल, तर तुम्ही इतर पद्धतींचा वापर करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा चार पद्धती सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही मिनिटांत गॅस सिलिंडर बुक करू शकाल.

1. WhatsApp द्वारे करा बुकिंग

जर फोन कॉलद्वारे बुकिंग होत नसेल, तर व्हॉट्सॲप हा एक उत्तम पर्याय आहे:

  • Indane कंपनी: ग्राहकांनी आपल्या नोंदणीकृत (Registered) नंबरवरून 7588888824 या क्रमांकावर 'REFILL' असा व्हॉट्सॲप मेसेज पाठवावा.
  • HP Gas कंपनी: ग्राहक 9222201122 या क्रमांकावर व्हॉट्सॲपवर 'Hi' किंवा 'Book' असा मेसेज करू शकतात.
  • Bharat Gas कंपनी: ग्राहक 1800224344 या क्रमांकावर 'Hi' किंवा 'Book' लिहून मेसेज करू शकतात.
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

2. SMS द्वारे करा बुकिंग

ग्राहक एसएमएस पाठवूनही सिलिंडर बुक करू शकतात:

  • Indane कंपनी: नोंदणीकृत नंबरवरून 7718955555 वर 'REFILL' लिहून मेसेज पाठवा.
  • Bharat Gas: नोंदणीकृत नंबरवरून 7715012345 किंवा 7718012345 वर 'LPG' लिहून एसएमएस करा.
Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: PTI

3. मिस्ड कॉल देऊन करा बुकिंग
  • Indane कंपनी: ग्राहक 8454955555 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन बुकिंग करू शकतात.
  • Bharat Gas: ग्राहक 9493602222 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकतात.

4. मोबाइल ॲपद्वारे करा बुकिंग

जर वरीलपैकी कोणतीही पद्धत काम करत नसेल, तर तुम्ही UMANG ॲपसह Paytm, PhonePe, Amazon Pay यासारख्या पेमेंट ॲप्सवरूनही बुकिंग करण्याचा प्रयत्न करू शकता.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com