जाहिरात

Mumbai Monsoon: चिंता वाढली! मुंबईत धो-धो पाऊस कधी बरसणार? निसर्ग दाखवणार रौद्र रूप? हवामान विभागाचा नवा अंदाज

Mumbai Monsoon Updates: मुंबईकरांची चिंता वाढली आहे. दक्षिण महाराष्ट्रात पोहोचलेला पाऊस मुंबईत कधी दाखल होणार, जाणून घ्या आयएमडीचा नवा अंदाज.

Mumbai Monsoon: चिंता वाढली! मुंबईत धो-धो पाऊस कधी बरसणार? निसर्ग दाखवणार रौद्र रूप? हवामान विभागाचा नवा अंदाज
"Mumbai Monsoon Updates: मुंबईत मान्सून कधी दाखल होणार?"
Canva

Mumbai Monsoon Updates: मुंबईकरांसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे. मुंबईत 11 जून रोजी अपेक्षित असलेला मान्सून लांबणीवर पडला आहे. आयएमडी (IMD) मुंबईचे संचालक बिक्रम सिंग यांनी पुष्टी केली आहे की, पुढील चार ते पाच दिवसांत मान्सून दक्षिण महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात दाखल होईल. तसेच मान्सून शहरात पोहोचेपर्यंत तापमान चढेच राहील.

मुंबईत मान्सून लांबणीवर | Mumbai Monsoon 2026 News

"मुंबईत मान्सूनचे आगमन अधिकृतपणे लांबले आहे. मुंबईत मान्सून दाखल होण्याची अधिकृत वार्षिक तारीख 11 जून आहे, पण पुढील आठवड्यापर्यंत मान्सून येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत", असे भारत हवामानशास्त्र विभागाचे (IMD) मुंबई संचालक बिक्रम सिंग यांनी सांगितले.

दिलासा नाहीच, उष्णता कायम राहणार

सिंग यांनी पुढे सांगितले की, पुढील किमान पाच दिवस तरी मुंबईत मान्सून येण्याची कोणतीही चिन्हे नाहीत आणि जोपर्यंत मुंबईत मान्सूनची सक्रियता सामान्य होत नाही, तोपर्यंत तापमान चढेच राहील. IMDने वर्तवलेल्या अंदाजाच्या 9 दिवस आधी म्हणजेच 4 जून रोजी नैऋत्य मोसमी पाऊस केरळ राज्यात दाखल झाला. हवामान विभागाने म्हटले होते की, जर मान्सूनची प्रगती सामान्य राहिली तर तो सात ते 10 दिवसांत मुंबई आणि महाराष्ट्रात पोहोचेल. त्यानुसार महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील भागांत मान्सून मजबूत झाला आहे, पण मान्सूनची पुढील वाटचाल अपेक्षेपेक्षा संथ गतीने होत आहे.

(नक्की वाचा : Rain Alert: राज्यातील 30 जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह धो-धो पावसाचा इशारा; तात्काळ पाहा संपूर्ण यादी)

अल निनोचा फटका| El Nino Effect | Monsoon News

दरम्यान बुधवारी सलग चौथ्या दिवशी मुंबईत किमान तापमान 30 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्य तापमानापेक्षा 3.6 अंश सेल्सिअस जास्त होते. हे संपूर्ण राज्यातील सर्वात जास्त किमान तापमान होते. आयएमडीने (IMD) या आठवड्यात मुंबई (Mumbai) आणि महानगर क्षेत्रासाठी हलका पाऊस/विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला असला, तरी पावसाने प्रामुख्याने हुलकावणी दिली आहे आणि दमटपणा (ह्युमिडिटी) खूप वाढला आहे.

पुढील 48 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांच्या स्थानिक हवामान अंदाजानुसार, आकाश अंशतः ढगाळ राहील आणि हलका पाऊस/विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34 अंश सेल्सिअस आणि 29 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील.

मान्सून 2026 (जून ते सप्टेंबर) च्या आपल्या दीर्घकालीन अंदाजात, आयएमडीने या वर्षी सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या कमी पावसाचे कारण पॅसिफिक क्षेत्रात निर्माण होत असलेली 'अल निनो' (El Nino) ची हवामान स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com