जाहिरात

'या' कुटुंबांना नवं सिलिंडर अन् नवं गॅस कनेक्शन मिळणार नाही, LPG-PNG बाबत सरकारची नवी नियमावली

LPG-PNG New Rule : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती स्वयंपाक गॅसच्या सप्लायवरुन अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहेत.

'या' कुटुंबांना नवं सिलिंडर अन् नवं गॅस कनेक्शन मिळणार नाही, LPG-PNG बाबत सरकारची नवी नियमावली
  • एनजी कनेक्शन वाले घरों को घरेलू एलपीजी सिलेंडर उपलब्ध न कराने का नया नियम लागू किया है.
  • जिनके पास पीएनजी और एलपीजी दोनों कनेक्शन हैं, उन्हें अपना एलपीजी कनेक्शन तुरंत सरेंडर करना अनिवार्य होगा.
  • सरकारी तेल कंपनियां और उनके वितरक पीएनजी कनेक्शन वाले घरों में एलपीजी सिलेंडर की आपूर्ति नहीं कर सकेंगे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

LPG-PNG New Rule : पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाने घरगुती स्वयंपाक गॅसच्या सप्लायवरुन अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे बदल केले आहेत. नव्या निमयांअंतर्गत आधीपासून पाईपद्वारे नैसर्गिक वायू कनेक्शन असलेल्या ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलिंडर दिले जाणार नाहीत.
पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असलेल्या ग्राहकांना त्यांचे एलपीजी कनेक्शन तात्काळ सोडून द्यावं लागेल. शनिवारी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे हा निर्णय लागू करण्यात आला आणि तो तात्काळ लागू झाला आहे.


१ आता एकाच घरात पीएनजी आणि एलपीजी सिलिंडर दोन्ही कनेक्शन ठेवणं बेकायदेशीर असेल. 
२ ज्यांच्याकडे सक्रीय पीएनजी कनेक्शन आहे, ते आता आपल्या जुन्या एलपीजी सिलिंडरची रिफिलिंग करू शकत नाहीत. 
३ ज्यांच्याजवळ दोन्ही सुविधा आहेत, त्यांना आपला घरगुती गॅस एलपीजी कनेक्शन विभागाकडे तातडीने सरेंडर करावं लागेल. 
४ पाइपलाइन गॅस असणारे ग्राहक आता नव्या घरगुती एलपीजी कनेक्शनसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 

नक्की वाचा - Buldhana News : गॅसचा वापर शून्य! महाराष्ट्रातील जबरदस्त गाव; गॅस टंचाईत हॉटेल चालक टेन्शन फ्री

...तर नवं घरगुती एलपीजी कनेक्शन घेता येणार नाही

 
मंत्रालयाकडून जारी अधिसूचनेत पेट्रोलियम वायू आदेश, २००० मध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे. नव्या नियमांनुसार, पीएनजी कनेक्शन असलेली कोणतीही व्यक्ती नवं घरगुती एलपीजी कनेक्शन घेऊ शकत नाही. पीएनजी आणि एलपीजी दोन्ही कनेक्शन असणारे ग्राहक एलपीजी सिलिंडर रिफिल करू शकणार नाहीत. अशा ग्राहकांना एलपीजी कनेक्शन सरेंडर करणं अनिवार्य असेल. 

सरकारी तेल कंपन्या आणि त्यांचे वितरक अशा कुटुंबाला एलपीजी देऊ शकणार नाहीत. यामध्ये सरकारचा उद्देश स्पष्ट एलपीजीची मर्यादीत साठा योग्य पद्धतीने गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचण्याचा आहे. पीएनजी प्रामुख्याने शहरांमध्ये उपलब्ध आहे. येथे पाइपलाइनच्या माध्यमातून स्वस्त आणि पर्यावरणाच्यादृष्टीने अनुकूल गॅस मिळतो. तर ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये अद्यापही एलपीजी मुख्य इंधन आहे. या बदलामुळे पीएनजीच्या क्षेत्रात एलपीजीची मागणी कमी होईल. त्यामुळे ग्रामीण ग्राहकांसाठी अनुदानित सिलिंडरची उपलब्धता वाढेल.

"एक घर, एक इंधन" धोरणाच्या दिशेने एक पाऊल म्हणूनही या नव्या नियमांकडे पाहिलं जात आहे. सरकारने यापूर्वी दुहेरी कनेक्शनवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता हा नियम स्पष्ट आणि काटेकोरपणे लागू करण्यात येणार आहे. ग्राहकांना सल्ला देण्यात आला आहे की जर त्यांच्याकडे दोन्ही कनेक्शन असतील तर त्यांनी जवळच्या एलपीजी वितरकाला किंवा कंपनीच्या पोर्टलला भेट देऊन ताबडतोब कनेक्शन परत करावे. परतफेड करण्यासाठी कोणताही दंड आकारला जाणार नाही, परंतु नियम मोडल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com