ऑनलाईन ऑर्डर, मग मर्डर! दीड लाखांच्या iPhone साठी डिलिव्हरी बॉयला संपवलं

डिलिव्हरी बॉय भरतचा गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. हत्यनंतर त्याचा मृतदेह इंदिरा कालव्यात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.  

जाहिरात
Read Time: 2 mins

आयफोनसाठी दोघांनी डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे ही घटना घडली आहे.  हत्येनंतर आरोपींनी डिलिव्हरी बॉयचा मृतदेह कालव्यात फेकून पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केला. डिलिव्हरी बॉय हरवल्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात हे प्रकरण उघड झालं. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर एकजण फरार आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, चिनहट येथील रहिवाशी गजाननने प्लिपकार्टवरुन दीड लाख रुपयांचा आयफोन ऑर्डर केला होता. यासाठीचे पेमेंट ऑप्शन 'कॅश ऑन डिलिव्हरी' (COD) ठेवलं होतं. 23 सप्टेंबर रोजी भरत साहू हा 30 वर्षीय डिलिव्हरी बॉय पार्सल देण्यासाठी गजानन याच्या घरी पोहोचला. त्यावेळी गजानन आणि त्याच्या मित्राने तिथे भरतची हत्या केली. 

(नक्की वाचा-  Pune News : हत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?)

भरतचा गळा दाबून त्याची हत्या करण्यात आली. हत्यनंतर त्याचा मृतदेह इंदिरा कालव्यात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.  भरत घरी आला नाही म्हणून त्याच्या कुटुंबियांना पोलिसात तो हरवल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीनंतर पोलिसांना तपास सुरु केला. पोलिसांनी भरतच्या फोनचे कॉल रेकॉर्ड्स आणि लाईव्ह लोकेशन चेक केले. 

याआधारे पोलिसांना कळाले की भरत गजाजन याच्या घरी डिलिव्हरीसाठी गेला होता. पोलीस गजाननच्या कॉल डिटेल्सच्या आधारे त्याचा मित्र आकाशपर्यंत पोहोचले आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी आकाशची चौकशी केली त्यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. 

Advertisement

(नक्की वाचा -  क्षुल्लक वादातून बारावीच्या विद्यार्थ्याची कोयत्याने वार करून हत्या, बारामतीतील घटनेने खळबळ)

"आयफोन चोरीचा प्लान आम्ही बनवला होता. त्यानुसार आम्ही फोन ऑनलाईन ऑर्डर केला. भरत फोन घेऊन आला त्यावेळी आम्ही त्याच्यावर हल्ला केला आणि त्याची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकून दिला", असं आरोपी आकाशने सांगितलं. 
 
पोलिसांना भरतचा मृतदेह अजूनही सापडलेला नाही. एसडीआरएफची टीम कालव्यामध्ये भरतच्या मृतदेहाचा शोध घेत आहे. पोलीस दुसरा आरोपी गजाजनचाही शोध आहेत.