जाहिरात

Pune News : हत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?

घटनेच्या वेळी अपार्टमेंटमध्ये दोन अभियंते आणि एका सर्जनसह मृत तरुणीचे तीन मित्र उपस्थित होते.

Pune News : हत्या की आत्महत्या, 19 वर्षीय तरुणीसोबत पहाटे अडीच वाजता काय घडलं?
पुणे:

पुण्यातील हडपसरमधून (Pune Hadapsar News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील अमनोरा टाऊनशिपमध्ये तीन दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा इमारतीच्या 29व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात ही सुसाईड नोट सापडली नसली तरी ही आत्महत्या असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी गोल्ड टॉवर्समधील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. ही विद्यार्थिनी मूळची रायगड जिल्ह्यातील आहे. ती पुण्यातून बीबीएचं शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. पहाटे अडीचच्या सुमारास ती खाली पडल्याचा संशय आहे. घटनेच्या वेळी अपार्टमेंटमध्ये दोन अभियंते आणि एका सर्जनसह मृत तरुणीचे तीन मित्र उपस्थित होते.

बातमी अपडेट होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: