जाहिरात
9 hours ago

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरीशस दौऱ्यासाठी रवाना झाले असून 57 व्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांचा अकरावा अर्थसंकल्प सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पातून सरकारने 1.5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवलंय.. दरम्यान अर्थसंकल्प मांडायला सुरुवात करतानाचा अजितदादांनी लाडक्या बहिणींचे आभार मानले.. लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो असं म्हणत अजितदादांनी लाडक्या बहिणींवर स्तुतीसुमनं उधळली.. शिवाय महाराष्ट्र आता थांबणार नाही.. पंतप्रधान मोदींचं 2047 पर्यंत भारताला विकसीत राष्ट्र बनवायचं स्वप्न आहे.. तसंच महाराष्ट्राला विकसीत राज्य बनवण्याचा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. यावेळी  मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन पंतप्रधान मोदींनी देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्यापासून खटला चालणार

संतोष देशमुख हत्या प्रकरणात उद्यापासून खटला चालणार आहे.  उद्याच्या सुनावणीत मकोका अंतर्गत कारवाई केलेले आरोपी वाल्मीक कराड , सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, विष्णू चाटे, आणि जयराम चाटे यांचे जबाब महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. सर्व आरोपींचे जबाब उद्या बंद लिफाफ्यामधून न्यायालयात सादर केले जाणार आहेत. 

पुण्याहून रायपूरला जाणाऱ्या विमानाचं संभाजीनगरात इमर्जन्सी लँडिंग

पुण्याहून रायपूरला जाणाऱ्या विमानाचं संभाजीनगरात इमर्जन्सी लँडिंग झाल आहे.  विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने  विमान डायव्हर्ट करून संभाजीनगरला उतरवण्यात आले. तांत्रिक बिघाडाची शहानिशा करूनच हे विमान आता इथून उड्डाण करेल अशी माहिती देण्यात आली आहे. 

गौरव आहुजाला न्यायालयीन कोठडी

गौरव आहुजा याला येरवडा प्रकरणात न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आहुजाच्या वकीलांनी जामीनासाठी अर्ज देखील केला आहे. 

पाकिस्तानात बलोच लिब्रेशन आर्मीने ट्रेन केली हायजॅक

पाकिस्तानात बलोच लिब्रेशन आर्मीने ट्रेन केली हायजॅक, क्वेटाहून पेशावरच्या दिशेने जात होती ट्रेन

कोरटकरच्या अंतरिम जामीनावर उद्या सुनावणी, हस्तक्षेप याचिका फेटाळली

प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामीनावर उद्या कोल्हापूर कोर्टात सुनावणी होणार आहे. शिवाय कोरटकरची हस्तक्षेप याचिका कोर्टाने फेटाळली आहे. कोल्हापूर कोर्टाने कोरटकरला दिलासा देण्यास नकार दिला आहे.   

Live Update : विठ्ठलाच्या मूर्तीची झीज, संस्थानाकडून लवकरच इपॉक्सी लेप लावणार

विठोबाच्या मूर्तीची झीज कमी करण्यासाठी मूर्तीवर इपॉक्सी लेप लावावा. असा निर्णय परत होणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायावर, तसेच इतर ठिकाणी मूर्तीची झीज झाल्याचे पुरातत्व विभागाच्या निरीक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे विठ्ठलाच्या मूर्तीची झीज थांबवण्यासाठी मूर्तीवर लवकरच रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. 

Live Update : पुण्यात नशेसाठी औषध आणि इंजेक्शनचा वापर, दोन तरुणांना अटक

पुण्यात नशेसाठी चक्क औषध आणि इंजेक्शनचा वापर

हडपसर पोलिसांनी तरुणांना नशा येणारी औषधांची विक्री केल्याप्रकरणी दोन तरुणांना अटक केली.

योगेश सुरेश राऊत आणि निसार चाँद शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

आरोपी राऊत आणि शेख यांनी औषध निर्मिती अभ्यासक्रमाची पदवी नाही, तसेच त्यांच्याकडे अन्न आणि औषध विभागाकडून दिला जाणारा परवाना नाही. राऊत आणि शेख यांच्याकडे बेकायदा औषधांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी  सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले.

Live Update : जळगावात परप्रांतीय मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडले

जळगाव जिल्ह्यातील नशिराबादजवळ मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपुलाजवळ अज्ञात वाहनाने तीन परप्रांतीय मजुरांना चिरडलं असून या अपघातात तीनही मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. नशिराबाद जवळ महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू असून उड्डाणपुलालगत असलेल्या कच्च्या रस्त्यावर तीनही मजूर हे रात्रीच्या सुमारास झोपले होते. पहाटेच्या सुमारास या कच्च्या रस्त्यावरून गेलेल्या अज्ञात वाहनाने तीनही मजुरांना चिरडलं असून तीनही मजुरांचे वय 20 ते 25 वर्ष असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातानंतर मजुरांचे मृतदेह हे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घालवण्यात आले असून घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक पथक दाखल झाले असून अज्ञात वाहनाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Live Update : जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा पार पडला

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या 375 व्या वैकुंठगमन बीज सोहळ्याचे औचित्य साधून त्यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा पार पडला. आज देहूगावातील संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात पार पडतोय. ही पगडी सुती कापडापासून बनवली असून या पगडीचा घेराव 22 फुटांचा असून त्याची उंची 4 फूट आहे. या पगडीसाठी 450 मीटर कापड लागले असून याची नोंद सुद्धा वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया अँड जिनिअस बुकमध्ये याची नोंद होणार आहे. 

Live Update : प्रशांत कोरडकरला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका

प्रशांत कोरडकरला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका

कोल्हापूरच्या न्यायालयाने केलेली निरीक्षणे काढून टाकण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश 

प्रशांत कोरडकरचा मोबाईल हॅक झाल्याचं नोंदवलं होतं, कोल्हापूरच्या न्यायालयाने निरीक्षण

कोर्टाने प्रशांत कोरटकरला त्याचा मोबाईल फोन जमा करण्याचे आदेश दिले होते मात्र त्याने त्याचा फोन पत्नी करावी जमा केला 

फोन तपासाला त्यातला सगळा डेटा डिलिट केला आढळला

म्हणून आरोपीच्या कोठडीत घेऊन चौकशी करण्याची गरज सरकारी वकिलांची मुंबई उच्च न्यायालयात मागणी

Live Update : सोलापुरात रस्ता ओलांडताना सिमेंट बल्करच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू

अक्कलकोट-सोलापूर रोडवरील मल्लिकार्जुननगर परिसरातील घटना 

अपघातात अंदाजे 55 वर्षे वय असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू 

मृत महिलेची अद्याप ओळख पटली नसून घटनास्थळावर पोलीस दाखल झाले आहेत

अपघातनंतर बल्कर चालक हा गाडीसह घटनास्थाळवरून पळून गेलेला चालक एमआयडीसी पोलीस स्टेशनला शरण आल्याची माहिती 

तर मृतदेह हे शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलं आहे 

सोलापुरात बल्कर वाहनाच्या धडकेत काही दिवसापूर्वी असाच भीषण अपघात झाला होता, त्यानंतर पुन्हा एकदा अपघाताची घटना

Live Update : राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर कांदा , कापूस , तूर, सोयाबीन फेकून आंदोलन

मुंबईत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनावर कांदा , कापूस , तूर, सोयाबीन फेकून आंदोलन

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Live Update : संगमेश्वरमधील कसबामध्ये साजरा होतोय हिंदू धर्मरक्षक दिन

छत्रपती संभाजी महाराज यांचा आज बलिदान दिन. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी महाराजांना ज्या कसबा गावामध्ये पकडलं गेलं तिथं हिंदू धर्म रक्ष दिन साजरा करण्यात येतोय..

महाराजांच्या बलिदानाला स्मरण करण्यासाठी इथे मोठा कार्यक्रम होत आहे. भाजपचे जेष्ठनेते, माजी आमदार प्रमोद जठार यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी "सिंंहाच्या छाव्याची अलौकिक गाथा" या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. संभाजी राज्यांच्या शौर्याला, बलिदानाप्रति नतमस्तक होण्यासाठी हा कार्यक्रम आहे. मंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, शेखर निकम उपस्थित राहणार आहेत. थोड्याच वेळात त्यांचं आगमन होईल. 

Live Update : पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरणार 1 एप्रिलपासून

पहिलीच्या विद्यार्थ्यांची शाळा भरणार 1 एप्रिलपासून

अध्यापनाचे दिवस 220 होण्यासाठी पहिली ते नववीची परीक्षा ‘या’ वेळापत्रकानुसारच 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यंदा अंगणवाडी ते इयत्ता दुसरीपर्यंतचा अभ्यासक्रम बदलणार आहे. 

‘बालभारती’कडून सध्या युद्धपातळीवर पुस्तकांची छपाई सुरू आहे. 

‘सीबीएसई’च्या शाळा आता 1 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. 

याच धर्तीवर आगामी काळात राज्यातील सर्वच शाळांच्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात त्याचवेळी होणार आहे.

Live Update : पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेतून एसबीसी आरक्षण काढलं

पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षेतून एसबीसी आरक्षण काढलं

सेट परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे 

एसबीसीचे आरक्षण नसल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली 

विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागातर्फे 40 वी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट परीक्षा 15 जून रोजी 

या परीक्षेसाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी नोडल एजन्सी म्हणून पुणे विद्यापीठ काम पाहते.

Live Update : संभाजीराजांची बदनामी करणाऱ्या 'या' पुस्तकांचं दहन करणार, अमोल मिटकरींचा इशारा

अनेक पुस्तकांच्या माध्यमातून संभाजी महाराजांची बदनामी केली जात आहे.
रायगडाला जेव्हा जाग येते

संपूर्ण गडकरी

राजसंन्यास

बेबंदशाही

प्रणय युवराज 

अशा पुस्तकांचं दहन होळीच्या दिवशी करणार असल्याचं अमोल मिटकरी यावेळी म्हणाले. 

Live Update : नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी विधीमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन दाखल

आज छत्रपती संभाजी महाराजांची पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने नंदुरबारचे आमदार आमशा पाडवी विधीमंडळ परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा घेऊन दाखल झाले. 

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये सिलिंडरचा मोठा ब्लास्ट

छत्रपती संभाजी नगर शहरातील देवळाई परिसरातल्या एका फॅब्रिकेशनच्या दुकानात लोखंड कापताना ठिणग्या उडाल्याने आगीचा भडका उडाला. त्यानंतर मोठा स्फोट झाल्याने परिसर हादरून गेला. त्यानंतर शेजारच्या गादीघराला आग लागली. पाहता पाहता आगीने लगतची आणखी तीन दुकाने गिळंकृत केली. पण, त्यानंतर घडलेला प्रकार भयंकर होता. फॅब्रिकेशनच्या दुकानातील सिलिंडर फुटले आणि सिलिंडरसह त्याचे मोठाले तुकडे अक्षरशः क्षेपणास्त्रासारखे उडाल. शेजारचे अपार्टमेंट आणि त्या पलीकडच्या अपार्टमेंटचे या तुकड्यानी प्रचंड नुकसान केले. पाचव्या मजल्यावरील फ्लॅटला भगदाड पडून मोठा तुकडा थेट घरातच घुसला. देवळाई परिसरातील विजयंतनगर येथे सोमवारी सायंकाळी ही थरकाप उडवणारी घटना घडली.

Live Update : जयकुमार गोरेंविरोधात लिहिणारे तुषार खरात यांच्याविरोधात आठपेक्षा जास्त गुन्हे दाखल

मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात लिहिणारे पत्रकार तुषार खरात यांच्यावर सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आठपेक्षा जास्त गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एक तक्रार ही जयकुमार गोरे यांनी स्वतः दाहीवडी पोलीस ठाण्यात दिली आहे. मुंबई येथून तुषारला ताब्यात घेऊन साताऱ्यात आणण्यात आले. आणि  अॕट्राॕसिटीच्या कलमाखाली वडूज पोलिसांनी त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने 13 तारखेपर्यत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. तुषार यांच्यावर आणखी गुन्हे दाखल होऊ शकतात...

Live Update : शहीद विनायक पुजारी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात पार पडले अंत्यसंस्कार

देश सेवा बजावताना सांगलीच्या जत तालुक्यातील बालगावची सुपुत्र विनायक पुजारी यांना वीरमरण आले आहे.गडचिरोली येथे सेवा बजावताना विनायक पुजारी शहीद झाले आहेत,त्यांच्या पार्थिवावर बालगाव या ठिकाणी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.तत्पुर्वी बालगाव मधून शहीद विनायक पुजारी यांच्या पार्थिवाचे अंत्ययात्रा काढण्यात आली,हजारोंच्या उपस्थितीमध्ये  शहीद विनायक पुजारी यांना निरोप देण्यात आला,शहीद पुजारी गडचिरोली येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते,त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा आई असा परिवार आहे.

Live Update : रत्नागिरीत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे घंटानाद आंदोलन

रत्नागिरीत ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’कडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं.. कोकणातील अनेक देवस्थानांच्या देवराई तथा देवरहाटी जमिनींच्या ७/१२ उताऱ्यांमधून देवस्थानांची नावे देवस्थानांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता बेकायदेशिररित्या कमी करण्यात आली आहेत. आणि त्या ठिकाणी ‘महाराष्ट्र शासन’ अशी नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे  देवराई तथा देवरहाटी जमिनी या देवस्थानांच्या नावावर पूर्ववत कराव्यात, या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि समस्त मंदिर विश्वस्त, भाविक - भक्त, हिंदू यांच्या वतीने  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आलं. देवरहाटीच्या जमिनी देवस्थानाच्या नावे करण्याविषयी शासनाने चालू अधिवेशनात सकारात्मक पाऊल उचलावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली.