1 day ago

आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली असून नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवसांची मंचकी निद्रा संपवून आई तुळजाभवानी सिंहासनावर विराजमान झाले आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते दुपारी 12 वाजता घटस्थापना होणार आहे. नवरात्र उत्सव काळात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. देवीच्या विविध अलंकार पूजा मांडल्या जाणार आहेत. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून देखील जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

Sep 22, 2025 16:06 (IST)

LIVE Updates: करमाळा आणि माढा तालुक्यात पूरस्थिती, 1800 नागरिकांचे स्थलांतर

सोलापूर जिल्ह्यातील माढा करमाळा तालुक्यातील 26 गावांना सीना नदीच्या पुराचा फटका बसत आहे. दोन्ही तालुक्यातील 1 हजार 800 ग्रामस्थांच स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. यामध्ये  करमाळा तालुक्यातील 10 गावांचा संपर्क तुटला आहे. एकंदर संभाव्य पूरस्थिती बाबत प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. तर करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी हातात काठी घेऊनच परिस्थितीत धोकादायक वाहतूक करू पाहणाऱ्या नागरिकांना परतवून लावले आहे. 

Sep 22, 2025 16:06 (IST)

Buldhana News: बुलढाण्यात खाजगी दवाखान्याविरोधात वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर

बुलढाणा शहरातील खाजगी दवाखान्यात अवाजवी देयके काढून रुग्णांची लूट थांबवण्यात यावी.. रुग्णालयातील हॉलमध्ये प्रकारचे चार्जेस फलक लावण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.. निवेदनाची दखल न घेतल्यास तीस दिवसात दवाखाने फोडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत वाघोदे यांनी दिला आहे..

Sep 22, 2025 16:05 (IST)

LIVE Updates: रिसनगाव येथे मराठा-ओबीसींच्या दोन गटांत हाणामारी; चौघे जखमी

लोहा तालुक्यातील रिसनगाव येथे गावातील विठ्ठल मंदिरात जिल्हा - परिषदेसाठी इच्छुक अपक्ष उमेदवाराची बैठक सुरू असताना - मराठा समाजातील आणि ओबीसी - समाजातील काही जण एकमेकांना - भिडले. 

यात चार जण जखमी झाले. 

गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. - जखमींवर नांदेडमधील विष्णुपुरी शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

मागील सात् दिवसांपासून - आरक्षण प्रश्नावरून दोन्ही समाजात - वातावरण तणावपूर्ण झाल्याचे - पाहावयास मिळत आहे.

Sep 22, 2025 15:10 (IST)

LIVE Updates: मुलुंड टोल नाक्या जवळ 7 ते 8 चारचाकी वाहनांचा अपघात

मुंबई ते ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मुलुंड टोल नाक्या जवळील ब्रिजवर सात ते आठ चार चाकी वाहनांचा अपघात झाला.. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही ,मात्र चार चाकी गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.. पुढे असणाऱ्या गाडीने अचानक ब्रेक मारल्यामुळे मागे असणारे गाड्या एकमेकांना धडकल्या त्या गाड्यांचे पुढे आणि मागून दोन्ही ठिकाणी नुकसान झाले त्यापैकी चार ते पाच गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे काही गाड्या चालकांनी तक्रार करण्यासाठी नवघर पोलीस ठाण्याच्या दिशेने वळवल्या या संदर्भात कोणाची चूक आहे पुढील तपास नवघर पोलीस ठाणे करत आहे.

Advertisement
Sep 22, 2025 13:57 (IST)

Live Update :छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक

छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये शेतकरी आक्रमक 

पैठण-छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या ठेकेदारामुळे शेतकर्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकाचं मोठं नुकसान झालंय 

शेतकऱ्याने शेतातील पाण्यात ठिय्या मांडला आहे तर शेतकऱ्यांनी पैठण-छत्रपती संभाजीनगर रोड आडवत रस्तारोको आंदोलन केले.

जो पर्यंत ठेकेदारावर कारवाई होत नाही आणि नुकसान भरापई मिळत नाही तोपर्यंत पाण्यातुन उठणार नाही असा पवित्र शेतकऱ्याने घेतला आहे.

मात्र ठेकेदाराच्या या चुकीमुळे शेत पिकांना मोठा फटका बसला आहे.

Sep 22, 2025 13:44 (IST)

Live Update : सोयगाव तालुक्यात मुसळधार पाऊस; रुद्रेश्वर लेणी डोंगरावरील दरड कोसळली...

सोयगाव तालुक्यात रात्री पासून मुसळधार पाऊस पडत आहे, सोयगाव पासून जवळच असलेल्या रुद्रेश्वर लेणी परिसरात पावसाचा जोर जास्तच असल्याने रुद्रेश्वर लेणीच्या धबधब्यावरील पाण्याचा प्रवाह वाढल्याने लेणी जवळील दरड कोसळली आहे यामुळे लेणीला देखील धोखा निर्माण झाला आहे.

Advertisement
Sep 22, 2025 11:22 (IST)

Live Update : मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सत्ताधारी आमदाराकडून मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी 

अजित पवार गटाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची मागणी 

मराठवाड्यात जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील जवळपास 17 लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Sep 22, 2025 09:25 (IST)

Live Update : लातूरमध्ये अतिवृष्टीचा मोठा फटका; शासनाने मंजूर केला 244 कोटींचा निधी

लातूर जिल्ह्यातील  मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरस्थितीमुळे तब्बल 480 कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाने केली आहे. रस्ते, घरे, शेती तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने तत्परता दाखवत 244 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पुढील दोन दिवसांत ही नुकसानभरपाई थेट खात्यात जमा होणार असून पंचनामे पूर्ण झाल्यानंतर वितरण प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. त्यामुळे या भरपाईतून नेमके कुणाकुणाला किती मदत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Sep 22, 2025 08:33 (IST)

Live Update : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराला आकर्षक फुलांची आरास

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात आज शादीय नवरात्र उत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराची आकर्षक अशा फुलांनी सजावट करण्यात आली आहे. देशी विदेशी फुलांचा वापर करून केलेल्या सजावटीमुळे आई तुळजाभवानीचा मंदिर परिसर फुलून गेला आहे. दुपारी बारा वाजता मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते घटस्थापना करण्यात येणार आहे. 

Sep 22, 2025 08:14 (IST)

Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, पैठण शहरातील राहुलनगरात पुन्हा पाणी शिरले

छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पाऊस, पैठण शहरातील राहुलनगरात पुन्हा पाणी शिरले 

राहुलनगर वसाहत दुसऱ्यांदा पाण्याखाली 

रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणी वसाहतीत शिरले 

नागरिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान 

घरातील संसार उपयोगी भिजल्याने नुकसान 

यापूर्वी 15 सप्टेंबरला राहुलनगरमध्ये पाणी शिरले होते

Sep 22, 2025 08:13 (IST)

Live Update : हालूर येथे दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव मंजूर....

तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या हालूर गावातील ग्रामस्थांनी एकमुखाने गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला असून यामध्ये विशेषतः महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावातील महिलांनी, व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लॉईड्स इन्फिनिट फाउंडेशन (एलआयएफ) च्या प्रेरणेने आणि पाठिंब्याने, दारू सेवनामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आणि आर्थिक आव्हानांविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे.

गावातील महिलांनी कौटुंबिक वाद, आरोग्य समस्या, आर्थिक अस्थिरता, वाहन दुर्घटनेला कारणीभूत ठरणाऱ्या दारूच्या व्यसनाविरोधात भूमिका घेत हालूर गावातून या संकटाचे उच्चाटन करण्याचा एकत्रितपणे संकल्प केला. त्यांच्या सक्रिय भूमिकेला आणि दृढ निर्णयाला सर्व ग्रामस्थांकडून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे.

Sep 22, 2025 07:46 (IST)

Live Update : दादानंतर आता शिंदे यांचे विदर्भाकडे लक्ष, 24 सप्टेंबर रोजी होणार निर्धार मेळावा

राज्यातील एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले चिंतन शिविर नुकतेच नागपुरात पार पडले. आता दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा निर्धार मेळावा येत्या 24 सप्टेंबर रोजी नागपुरात आयोजित करण्यात येत आहे. सुरेश भट सभागृहात पूर्व विदर्भातील नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत येत्या बुधवारी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. 

एकनाथ शिंदे पूर्ण वेळ उपस्थित असतील आणि पक्षातील नेते, पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतील.

आगामी स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागपुर आणि विदर्भाकडे राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असल्याचे यातून दिसून येत आहे. विदर्भ हा पूर्वी काँग्रेसच मात्र काही काळापासून सध्या भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप सोबत राज्यात सत्तेत असलेल्या अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेसाठी विदर्भ महत्त्वाचें ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नुकत्याच पार पडलेल्या चिंतन शिबिरादरम्यान अजितदादासह NCP च्या सर्व शीर्ष नेत्यांनी आपण विदर्भाकडे लक्ष केंद्रित केल्याचे आणि विदर्भ हा आमचाही बालेकिल्ला आहे किंवा होऊ शकतो अशा आशयाची विधाने केली होती, हे येथे उल्लेखनीय.

Sep 22, 2025 07:42 (IST)

Live Update : जिल्ह्यात पावसाचा कहर, परंडा- भुम तालुक्यातील नद्यांना पूर

धाराशिव जिल्ह्यात राञी झालेल्या अतिवृष्टीने मोठा कहर केला आहे.जिह्यातील परंडा,भुम,कळंब, धाराशिव,उमरगा,लोहारा,तुळजापूर,वाशी सह सर्वच तालुक्यात पावसाने तुफान बॅटींग केलीय.परंडा व भुम तालुक्यातील अनेक नद्यांना महापुर आला आहे.बाणगंगा नदीला आलेल्या पुराचा लाखी गावाला वेडा पडला आहे.तर सिरसाव गावात देखील घरात पाणी घुसले आहे.तसेच २०० ते ३०० नागरीक नदीच्या पलीकडे अडकले आहेत.चिंचपुर,बेलगाव येथील नद्यांना देखील पुर आला आहे.या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांसह द्राक्ष बागा व जनावरांच देखील मोठ नुकसान झाल आहे.पुराच्या पाण्यात गाई,म्हैस,शेळ्या अशी पाळीव जनावरे वाहुन गेल्याची माहिती आहे.

Sep 22, 2025 06:40 (IST)

Live Update : सातपुडा पर्वतरांगात असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगात वसलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला असून नवरात्रोत्सव काळात मंदिर संस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले आहे. खानदेश ची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त राज्यभरासह परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करतात..

Sep 22, 2025 06:39 (IST)

Live Update : जळगावमधील मेहरून उद्यान परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

जळगाव शहरातील मेहरून उद्यान परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून 60 हजार रुपये किमतीचा 6 ग्रॅम एम डी ड्रग्स पोलिसांनी जप्त केला असून याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी मात्र फरार झाला आहे. मोहम्मद हनीफ पटेल असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव असून फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

Sep 22, 2025 06:39 (IST)

Live Update : उजनी धरणातून भीमापात्रात सुरू असणारा विसर्ग पुन्हा वाढवला, पहाटे 5.45 वा.उजनीतून भीमा नदीत विसर्गात वाढ

उजनी धरणातून पूर परिस्थिती नियंत्रणासाठी भीमा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू होता.आज पहाटे पावणे सहा वाजता या विसर्गामध्ये वाढ करण्यात आले असून तो आता 71 हजार 600 क्युसेक इतका करण्यात आला आहे. उजनी धरणाच्या वरील धरण साखळीतील धरण भरलेली असून मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने या धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जातो आणि हे पाणी उजनी धरणामध्ये येत आहे.सध्या उजनी धरण 109 टक्के क्षमतेने भरलेला आहे म्हणजे उजनी धरणात एकूण पाणी साठवून क्षमतेच्या 122 पूर्णांक 17 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदी पात्रात मोठा विसर्ग केला जातोय. यामध्ये कमी अधिक वाढ केली जाऊ शकते यासाठी उजनी धरण व्यवस्थापनाने भीमा नदी काठाच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Sep 22, 2025 06:36 (IST)

Live Update : नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

अनेक गुन्हेगारांवर  प्रतिबंधात्मक कारवाई करत गुन्हेगारांची जेलमध्ये रवानगी

नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आणि गुन्हेगारी टोळ्यांना आळा घालण्यासाठी झोन १ कडून आज ४३ जणांना तुरुंगात पाठविण्यात आले. हे सर्व कारवाई एका दिवसात करण्यात आली. यापैकी अनेक जण हे टोळीतील सदस्य आहेत. हत्यार कायद्याखालील आरोपी, दारूबंदीचे गुन्हेगार, कलम ३०७ अंतर्गत गुन्हे करणारे इत्यादींचा समावेश आहे.

Topics mentioned in this article