5 minutes ago

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या डोंगररांगा आणि इतर भागात तीव्र पाणीटंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. विशेषता धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई असून महिलांना पाण्यासाठी दीड ते दोन किलोमीटरची भटकंती करावी लागत आहे. काही ठिकाणी पाण्याचे स्त्रोत गावापासून दूर आहेत, तर काही ठिकाणी डोंगरदर्‍यातील झऱ्यातून महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. 

May 06, 2025 20:00 (IST)

नागपूरवरून मोर्शी मार्ग बऱ्हाणपूरला जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सला अपघात

नागपूरवरून मोर्शी मार्ग बऱ्हाणपूरला जाणाऱ्या खाजगी  ट्रॅव्हल्सला अपघात झाला आहे.  अमरावतीच्या धारणी तालुक्यातील सीमाडोह जवळ येणाऱ्या मांगिया गावाजवळ ट्रॅव्हल्स पलटली आहे.   अपघातावेळी बसमध्ये 40 प्रवासी असल्याची माहिती आहे. त्यातील 35 जण जखमी झाले असून 9 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर हरीसालच्या PHC मध्ये प्राथमिक उपचार केले जात आहेत.  तर पुढील उपचारासाठी काहींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. 

May 06, 2025 19:56 (IST)

मुंबई विमानतळावरील धावपट्टी 8 मे रोजी बंद राहणार

मुंबई विमानतळावरील धावपट्टी 8 मे रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बंद राहील. यामुळे विमान प्रवासात अडचणी येण्याची शक्यत आहे. त्यामुळे विमानतळाकडे जाण्या आधी विमानाची स्थिती पाहावी असे आवाहन स्पाईस जेट तर्फे करण्यात आलं आहे. 

May 06, 2025 18:46 (IST)

उद्या पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी होणार मॉक ड्रिल

उद्या पुणे जिल्ह्यात तीन ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.  पुण्यात विधानभवन आणि तळेगाव आणि मुळशी पंचायत समिती या ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे.  पुणे जिल्ह्यात उद्या फक्त तीन ठिकाणी सायरन वाजणार आहेत. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची ही माहिती दिली आहे.  सायंकाळी चार वाजता पुण्यातील विधान भवन येथे मॉक ड्रील होईल. 

May 06, 2025 18:44 (IST)

संभाजीनगरच्या वैजापूर शहरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

संभाजीनगरच्या वैजापूर शहरात पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज केला आहे.  दोन गटात वाद झाल्यानंतर मोठा जमाव जमला होता.  जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज केला.  वैजापूर शहरात सद्या पूर्णपणे शांतता आहे. 

Advertisement
May 06, 2025 16:54 (IST)

उद्याच्या मॉक ड्रिलला अभ्यास मॉक ड्रिल असं देण्यात आलं नाव

उद्याच्या मॉक ड्रिलला अभ्यास मॉक ड्रिल नाव देण्यात आले आहे.  दुपारी 4 वाजता सायरन वाजवले जाणार आहेत. त्यावेळी मॉक ड्रिल सुरू होईल.  राज्यात एकाच वेळी हे मॉक ड्रिल होईल. 

May 06, 2025 16:53 (IST)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी ही वादळी वाऱ्यासह पाऊस

सलग दुसऱ्या दिवशी ही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊसाने हजेरी लावलीय.शहरातील सिडको, हर्सूल, पिसादेवी परिसरात वादळी वाऱ्या सह हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू झाल्याने हवेत गारवा निर्माण झालाय त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांची उकाड्या पासुन काहीशी सुटका मिळालीय.काल सुद्धा जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊसाने हजेरी लावली होती त्यात बाजरी,मका,फळबागा या सह आंब्याचे गळती झाल्याने शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झालं होतं.

Advertisement
May 06, 2025 15:25 (IST)

जळगाव जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले

जळगाव भुसावळसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.   वादळी वारा व अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली असून अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.  अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा केळीच्या पिकालाही मोठा धोका निर्माण झाला असून केळीच्या बागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

May 06, 2025 13:24 (IST)

Live Update : दौंड तालुक्यातील एका 17 वर्षीय मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतला गळफास

दौंड तालुक्यातील राहू गावातील एका 17 वर्षीय मुलीने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केलीय. तिच्या आत्महत्येच कारण अस्पष्ट असून यवत पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Advertisement
May 06, 2025 12:16 (IST)

Live Update : मोबाइल बंद करून सिद्धीविनायक मंदिरात भाविकांना प्रवेश, सुरक्षेसाठी न्यासाचा निर्णय

सिद्धीविनायक मंदिरात भाविकांना फोन बंद करून मंदिरात सोडण्याचा निर्णय

भाविकांना मोबाइल बंद केल्यावर आतमध्ये सोडलं जात आहे

हा निर्णय सध्या तात्पुरता स्वरूपाचा आहे 

सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलाय मात्र भाविकांमध्ये यामुळे नाराजी

May 06, 2025 12:14 (IST)

Live Update : दादरमधील फेरीवाल्यांना पोलिसांनी उठवलं, मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी?

दादरमधील फेरीवाल्यांना पोलिसांनी उठवलं, कुठेही फेरीवाल्यांना बसू देऊ नये असा दिला आदेश

मुंबईतील पोलीस स्थानकांना वरिष्ठांचा आदेश 

मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी?

May 06, 2025 11:16 (IST)

Live Update : मॉक ड्रिलबाबत गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्रालयात मोठी बैठक

मॉक ड्रिलबाबत गृह मंत्रालयात मोठी बैठक

गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

7 मे रोजी 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल आयोजित केले जाईल

जिल्ह्यांमधून नागरी संरक्षण समितीचे प्रतिनिधी घेतले जातील.

सुमारे 54 वर्षांनी अशी महत्त्वाची बैठक होत आहे. 

एनडीएमए, पोलिस, एनडीआरएफ आणि राज्य सरकारी संस्था सहभागी असतील.

May 06, 2025 10:39 (IST)

Live Update : मुंबईतील दादर येथील डिसिल्वा शाळेत वाजवले सायरन

मुंबईतील सर्वच सायरन आज सकाळी नऊच्या ठोक्याला वाजवण्यात आले आणि या सायरन बाबत तपासणी देखील करण्यात आली. दादर येथील डिसिल्वा शाळेत सायरन वाजवण्यात आले. भारत पाकिस्तान आणि भारत चीन युद्धा दरम्यान मुंबईत आणि ठिकाणी हे सायरन लावण्यात आले आहेत. मात्र भारत पाक तणाव स्थिती आणि मॉक ड्रिल पार्श्वभूमीवर हे सायरन आज सकाळी नऊच्या ठोक्याला वाजवण्यात आले.

May 06, 2025 08:29 (IST)

Live Update : बारवी धरणात 15 जुलैपर्यत पुरेल एवढाच पाणीसाठा

मागील वर्षीपेक्षा यंदा एक टक्का अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुरबाड आणि बदलापूर परिसरामध्ये तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असून त्यामुळे बाष्पीभवनात 3 टक्के वाढ झालीय. यंदाच्या वर्षी बाष्पीभवन 10 टक्के आहे. मात्र तरीही 15 जुलै पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा बारवी धरणात शिल्लक राहणार असल्याचं एमआयडीसी प्रशासनानं सांगितलंय. बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, मीरा भाईंदर या महापालिकांसह अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका, तसंच एमआयडीसी आणि स्टेम प्राधिकारणांना पाणीपुरवठ केला जातो.

May 06, 2025 08:28 (IST)

Live Update : गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली नागरी संरक्षण विषयक व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक

गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली नागरी संरक्षण विषयक व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक सकाळी 10:45 वाजता होणार आहे. या बैठकीत 244 जिल्ह्यांचे प्रतिनिधी, मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण विभाग सहभागी होणार आहेत.

May 06, 2025 07:49 (IST)

Live Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, महापालिकेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार का याकडे लक्ष

महापालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार? 

मागील कित्येक महिन्यांपासून ही सुनावणी रखडली असून आज सुनावणी झाली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे

May 06, 2025 07:48 (IST)

Live Update : सलग बाराव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

सलग बाराव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार, राजौरी, मेंढर, नौशेरा, अखनूरमधील चौक्यांवर हल्ला, भारताकडूनही पाकला चोख प्रत्युत्तर

५-०६ मे २०२५ च्या रात्री, पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर येथील नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर गोळीबार केला.

May 06, 2025 07:47 (IST)

Live Update : पुणे शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर आयुक्तांची करडी नजर

शहरातील अतिक्रमणांची संख्या वाढत असून, नागरिकांना पदपथांवरून चालणे अवघड झाले आहे. महापालिकेने कारवाईसाठी अनेक ठिकाणी स्थिर तसेच फिरती पथकेही नियुक्त केली आहेत. मात्र, तरीही अतिक्रमणे होत असल्याने चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण कारवाई करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत

May 06, 2025 06:29 (IST)

Live Update : बाळ सुखरूप घेऊन येताच टाळ्या आणि पेढे वाटून जल्लोषात करण्यात आलं स्वागत

सांगलीच्या मिरज शासकीय रुग्णालयातून चोरी झालेल्या बाळाची चांगली पोलिसांनी सुखरूप सुटका केली आणि रुग्णालयात तिच्या आईच्या कुशीत सुखरूप सोपवल्या दरम्यान पोलिसांच्या या कामगिरीचं सामाजिक संघटनांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. रुग्णालयामध्ये बाळाला घेऊन येताचं आंबेडकरी चळवळीचे नेते महेशकुमार कांबळे आणि विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून पोलीस दलाचे टाळ्या वाजवून स्वागत करत जयघोष करून पेढे वाटून आनंद साजरा केला तसेच सांगली पोलिसांचे कौतुक करत आभार देखील मानण्यात आले.