2 hours ago

सोमवार, 22 सप्टेंबरपासून राज्यभरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रौत्सव पावसात जाणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 

Sep 21, 2025 14:00 (IST)

LIVE Update: गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न

गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, धनगर उपोषण आंदोलनाला भेट देण्यासाठी येत असताना जालन्यामध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. 

Sep 21, 2025 13:34 (IST)

LIVE Update: मनोज जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाश्यांचा हल्ला

मनोज जरांगेंच्या बैठकीत अचानक मधमाश्यांचा हल्ला 

बैठकीत आलेल्या अनेकांना मधमाश्यांचा चावा 

मनोज जरांगेंना तात्काळ समन्वयकांनी बाहेर काढले 

बैठकीच्या ठिकाणी गोधळाचे वातावरण

मधमाश्यांच्या हल्ल्यानंतर आता मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत मराठवाड्यातील मराठा सेवकांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे, या बैठकीत हैदराबाद गॅझेट जीआर, नारायणगड दसरा महोत्सव आणि मराठा आंदोलकांनी मराठा समाजाबद्दल कोणी काही म्हणाले तरी संयम ठेवण्याच्या सूचना मनोज जरांगे देणार आहेत..

Sep 21, 2025 13:33 (IST)

LIVE Update: भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक

- भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना अटक 

- सागर जाधव गोळीबार प्रकरणी पंचवटी पोलीसांनी केली अटक 

- गोळीबार प्रकरणात कटात सहभागी असल्याचा आरोप

- पूर्ववैमनस्यातून सागर जाधववर पेठरोड परिसरात मंगळवारी करण्यात आला होता गोळीबार

Sep 21, 2025 12:07 (IST)

LIVE Update: कोथरूड गोळीबार प्रकरण, घायवळ गँगचा पुणे पोलिसांनी उतरवला माज

कोथरूड गोळीबार प्रकरण

घायवळ गँगचा पुणे पोलिसांनी असा उतरवला माज

ज्या ठिकाणी केला होता सामान्य नागरिकांवर गोळीबार त्याच ठिकाणी पोलिसांनी ५ आरोपींची काढली धिंड

गोळीबार झालेल्या ठिकाणी घेऊन जात पोलिसांनी घायवळ गॅंग मधल्या पाच आरोपींचा उतरवला माज 

हे पाचही आरोपी आता पोलीस कोठडीत असून त्यांची या सगळ्या प्रकरणी पुणे पोलीस चौकशी करत आहेत

Advertisement
Sep 21, 2025 11:52 (IST)

Live Update : गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या गुंडांची कोथरूड परिसरात पोलिसांनी काढली धिंड 

पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये तरुणावर गोळीबार करणाऱ्या तरुणांची कोथरूड परिसरातच काढली धिंड 

मयूर कुंबरे मयंक व्यास गणेश राऊत दिनेश फाटक आनंद चादलेकर या पाचही जणांची पोलिसांनी काढली धिंड 

काल रात्री ज्या ठिकाणी या पाच जणांनी सामान्य नागरिकावर गोळीबार करून दहशत निर्माण केली होती त्याच भागातून पोलिसांनी धिंड काढले आहे

Sep 21, 2025 11:47 (IST)

Live Update : पिंपरी चिंचवड ठाकरे गटाचे शहराध्यक्ष घड्याळ हाती बांधणार?

पिंपरी चिंचवडचा बालेकिल्ला काबीज करण्याच्या दृष्टीने अजित पवार कंबर कसतायेत. याचं दृष्टीने अजित पवार आता उद्धव ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आज अजित पवार शहरात आहेत आणि परिवार मिलन घडवत आहेत. याचं प्रसंगी शिवसेनेचे शहराध्यक्ष संजोग वाघेरेंच्या पत्नी उषा वाघेरेंशी अजित दादा आज चर्चा करणार आहेत. त्यामुळं संजोग वाघेरे मशालीच्या हाती पुन्हा एकदा घड्याळ बांधतील अशी चर्चा रंगलेली आहे. मुळात मी शिवसेनेत असलो तरी माझ्या पत्नी आज ही राष्ट्रवादीतचं आहेत आणि मी तूर्त तरी शिवसेनेत आहे. महापालिका निवडणूक जाहीर झाल्यावर पाहुयात, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीतील प्रवेशाचे संकेत ही दिलेत. 

Advertisement
Sep 21, 2025 11:46 (IST)

Live Update : काँग्रेसची अगरबत्ती विझली, महाराष्ट्रात आता फक्त भाजपचा विकासमार्ग!

काँग्रेसची अगरबत्ती विझली, महाराष्ट्रात आता फक्त भाजपचा विकासमार्ग!

काँग्रेसमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांना कोणी विचारत नाही, म्हणून रास्वसंघ, भाजपवर टीका

मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसमध्ये किती इच्छुक होते हे आधी सांगा- नवनाथ बन

Sep 21, 2025 09:41 (IST)

Live Update : येवल्याच्या जगदंबा माता देवस्थानाची जय्यत तयारी....

द्यापासून सुरू होत असलेल्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्ताने नाशिकच्या येवल्यातील प्रसिद्ध कोटमगावच्या जगदंबा माता देवस्थान ट्रस्टच्यावतीने तयारी अंतिम टप्प्यात आली असून, प्रशासनही उत्सवासाठी सज्ज झाले आहे. घटी बसणाऱ्या भाविकांसाठी व दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, देवस्थानच्या स्वयंसेवकांबरोबर पोलिसांचाही बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे नऊ दिवसांच्या या यात्रा काळात नाशिक ,छत्रपतीसंभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, धुळे ,या सह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक जगदंबा मातेच्या चरणी नतमस्तक होतात.यात्रेसाठी खेळण्याची दुकाने, हॉटेल, पाळणे, यासाठी जागा निश्चित करण्याची लगबग सुरू आहे.

Advertisement
Sep 21, 2025 09:39 (IST)

Live Update : पुण्यात नवरात्रौत्सवात देवीदर्शनासाठी पीएमपीएमएलची विशेष पर्यटन बससेवा

पुण्यात नवरात्रौत्सवात देवीदर्शनासाठी पीएमपीएमएलची विशेष पर्यटन बससेवा

नवरात्रोत्सवानिमित्त पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यातील देवींच्या शक्तिस्थळांचे दर्शन घडवण्यासाठी पीएमपीएमएलकडून दोन वातानुकूलित स्मार्ट इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सेवा २३ सप्टेंबरपासून सुरू होणार असून शनिवार, रविवार, सार्वजनिक सुट्टी तसेच गट बुकिंगसाठी उपलब्ध राहील.

डेक्कन, पुणे स्टेशन, स्वारगेट, कात्रज, हडपसर, मनपा भवन, भोसरी व निगडी येथे बुकिंग केंद्रे असतील.

Sep 21, 2025 08:19 (IST)

Live Update : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

उमरगा तालुक्यातील कसबे येथील बेनितुरा नदीच्या पाणी पातळीत वाढ 

नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प

काल रात्रीपासून उमरगा लोहारा तालुक्यात जोरदार पावसाने लावले हजेरी 

रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांच देखील मोठ नुकसान

नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी

Sep 21, 2025 07:00 (IST)

Live Update : पंढरपुरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी...

शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील रुक्मिणी मातेसह , अंबाबाई मंदिर, दिंडी मनातील रुक्मिणी मंदिर , यमाई तूकाइ मंदिर , पद्मावती मंदिर , रेणुका देवी मंदिर अशा विविध मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते. यासाठी पंढरपुरातील सर्व देवींची मंदिरे ही नवरात्रीसाठी सुशोभित करण्यात आली आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने रुक्मिणी सभामंडपासून सर्व मंदिरांना आकर्षक अशी रंगीबेरंगी पडद्यांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रीनिमित्त पंढरपुरातील तयारी पूर्णत्वाकडे होताना दिसते.

Sep 21, 2025 07:00 (IST)

Live Update : ड्रेनेजसाठी खोदलेल्या नाल्यात पलटी होऊन कारचा अपघात

खामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे व त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाली खोदली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहे. रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात शहरातील डॉ. ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कार ने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला

Sep 21, 2025 06:59 (IST)

Live Update : पावसापासून वंचित असणाऱ्या सांगोल्यात ओला दुष्काळ जाहीर करा...

पावसापासून वंचित असणाऱ्या व कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्यात एकाच रात्रीत 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात पाणीच पाणी आहे. तालुक्यातील एक लाख हेक्टर वरील क्षेत्र हे पाण्यामुळे नुकसानित आहे. त्यामुळे सांगोला तालुक्याला ओला दुष्काळा जाहीर करावा. अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांनाही भेटून सांगोल्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तीव्रतेने मागणी करणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले. त्यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्यात प्रथमच ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Sep 21, 2025 06:59 (IST)

Live Update : भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा रनच आयोजन

भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा रनच आयोजन

कोस्टल रोडवरील प्रॉमनेडवर नमो रनच आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'नमो युवा रन'ला दाखवणार हिरवा झेंडा 

व्यसनमुक्त भारतासाठी नमो युवा रनच आयोजन 

अभिनेते मिलिंद सोमण, अभिनेते आणि पद्मश्री अशोक सराफ 'नमो युवा रन'मध्ये धावणार 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने रनच आयोजन

Sep 21, 2025 06:55 (IST)

Live Update : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर कठोर ताशेरे, 248 शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या, असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.

Topics mentioned in this article