जाहिरात
53 minutes ago

सोमवार, 22 सप्टेंबरपासून राज्यभरात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा नवरात्रौत्सव पावसात जाणार की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 

Live Update : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची हजेरी

उमरगा तालुक्यातील कसबे येथील बेनितुरा नदीच्या पाणी पातळीत वाढ 

नदीचे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने वाहतूक ठप्प

काल रात्रीपासून उमरगा लोहारा तालुक्यात जोरदार पावसाने लावले हजेरी 

रात्री झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेती पिकांच देखील मोठ नुकसान

नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची प्रशासनाला मागणी

Live Update : पंढरपुरात शारदीय नवरात्र उत्सवाची तयारी...

शारदीय नवरात्र उत्सवाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. पंढरपुरात विठ्ठल मंदिरातील रुक्मिणी मातेसह , अंबाबाई मंदिर, दिंडी मनातील रुक्मिणी मंदिर , यमाई तूकाइ मंदिर , पद्मावती मंदिर , रेणुका देवी मंदिर अशा विविध मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर भक्तांची गर्दी असते. यासाठी पंढरपुरातील सर्व देवींची मंदिरे ही नवरात्रीसाठी सुशोभित करण्यात आली आहेत. नवरात्रीच्या निमित्ताने रुक्मिणी सभामंडपासून सर्व मंदिरांना आकर्षक अशी रंगीबेरंगी पडद्यांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे नवरात्रीनिमित्त पंढरपुरातील तयारी पूर्णत्वाकडे होताना दिसते.

Live Update : ड्रेनेजसाठी खोदलेल्या नाल्यात पलटी होऊन कारचा अपघात

खामगाव शहरात अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे व त्यासाठी रस्त्याच्या बाजूने सात ते आठ फूट खोल नाली खोदली आहे. मात्र संबंधित कंत्राटदाराने काम करत असताना कुठल्याही सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे दररोज अपघात घडत असून यात वृद्ध व लहान मुलं जखमी होताना दिसत आहे. रात्री खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात शहरातील डॉ. ब्रह्मानंद टाले हे त्यांच्या कार ने जात असताना ड्रेनेजसाठी खोदून ठेवलेल्या नालीत त्यांची कार पलटी होऊन अपघात झाला

Live Update : पावसापासून वंचित असणाऱ्या सांगोल्यात ओला दुष्काळ जाहीर करा...

पावसापासून वंचित असणाऱ्या व कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्यात एकाच रात्रीत 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण सांगोला तालुक्यात पाणीच पाणी आहे. तालुक्यातील एक लाख हेक्टर वरील क्षेत्र हे पाण्यामुळे नुकसानित आहे. त्यामुळे सांगोला तालुक्याला ओला दुष्काळा जाहीर करावा. अशी मागणी माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्र्यांनाही भेटून सांगोल्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची तीव्रतेने मागणी करणार असल्याचेही साळुंखे यांनी सांगितले. त्यामुळे कायम दुष्काळी असणाऱ्या सांगोला तालुक्यात प्रथमच ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Live Update : भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा रनच आयोजन

भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीने नमो युवा रनच आयोजन

कोस्टल रोडवरील प्रॉमनेडवर नमो रनच आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'नमो युवा रन'ला दाखवणार हिरवा झेंडा 

व्यसनमुक्त भारतासाठी नमो युवा रनच आयोजन 

अभिनेते मिलिंद सोमण, अभिनेते आणि पद्मश्री अशोक सराफ 'नमो युवा रन'मध्ये धावणार 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्ताने रनच आयोजन

Live Update : उच्च न्यायालयाचे राज्य सरकारवर कठोर ताशेरे, 248 शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय

अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2017 मधील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून वंचित राहिलेल्या या शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या, असा ठोस आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com