शिवाजी पार्कमधील पक्ष कार्यालयात मनसे नेत्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व आहे. आज सकाळी 10 वाजता शिवाजी पार्क येथील पक्ष कार्यालयात बैठक होणार आहे. मनसे नेत्यांची शिवाजी पार्क इथल्या पक्ष कार्यालयात बैठक आहे. आज सकाळी दहा वाजता बैठक होणार आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक असल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष तसंच मनसेचे नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. सुनिल तटकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याचं सुर्वे यावेळी म्हणाले. विकासाला आपलं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची साथ सोडली आहे.
Live Update : देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांचा भाजप प्रवेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांनी भाजप प्रवेश केला होता. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ही उपस्थित होते. जयश्री पाटील यांनी काँग्रेसला रामराम करत भाजप प्रवेश केला.
सिडको मुख्यालयात शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
सिडको मुख्यालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण तालुक्यातील धुतुम गावचे रहिवासी असलेले ८३ वर्षीय शेतकरी दत्तू भिवा ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विभागातील अधिकार्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.
Live Update : लातूरच्या बी फार्मसीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास घेत जीवन संपवलं
लातूरच्या एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीत विलासराव देशमुख कॉलेज ऑफ फार्मसी येथे बि फार्मसीचे शिक्षण घेणारा 23 वर्षिय अभिजीत निटुरे याने दुपारी दोन ते पाच च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही . पुढील तपास एम आय डी सी पोलीस करत आहेत.
Live Update : भिवंडी शांतिनगर पाईपलाइन रोडवर कंटेनर उलटला; चालकाचा जागीच मृत्यू
भिवंडी – कल्याण रोडहून शांतिनगरकडे जाणाऱ्या पाईपलाइन रोडवर भीषण अपघात झाला. एक कंटेनर असंतुलित होऊन रस्त्यावर उलटल्यानं चालकाचा जागीच मृत्यू झाला.
कंटेनर कल्याण रोडहून शांतिनगरच्या दिशेनं जात असताना अचानक त्याचा तोल सुटला आणि तो रस्त्यावर उलटला. कंटेनर उलटताच चालक त्याच्या खाली दबला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी पोलिसांना कळवले. शांतिनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे.
या अपघातामुळे शांतिनगर पाईपलाइन रोड पूर्णतः बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे.
Live Update : हिंदी भाषेची सक्ती कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही - राज ठाकरे
हिंदी भाषेची सक्ती कराल तर ते खपवून घेतले जाणार नाही - राज ठाकरे
अभ्यास क्रमाची हिंदी पुस्तके विकू दिली जाणार नाही, शाळांना विद्यार्थ्यांना ती वाटू दिली नाही. याची नोंद शाळांनी घ्यावी
जबरदस्ती इथेच का ? हा मुद्दा ताणू नये असे आवाहन आहे. या आवाहनाला आव्हान देणार असाल तर संघर्ष अटळ आहे. तसे झाले तर याला सरकारच जबाबदार राहील.
Live Update : मराठी सरकारला हिंदीचा अट्टहास का? शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे काय म्हणाले?
शाळांमधील तिसरी भाषा म्हणून हिंदी अनिवार्य करण्याच्या वादावर शिक्षण शालेय मंत्री दादा भूसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले...
माझी आपल्याला विनंती आहे की जो आता नवीन शासन निर्णय आला आहे त्यात अनिवार्य हा शब्द नाही. सर्व माध्यमांच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे. इंग्रजी माध्यम किंवा इतर माध्यमा शाळेत मराठी भाषा बंधनकारक आहे. इयत्ता पाचवीपासून गेल्या काही वर्षापासून हिंदी हा विषय आहे.
इतर काही माध्यमांच्या शाळेत त्यांची भाषा आणि यू ग्रजी तिसरी भाषा अनेक शाळेत अनेक वर्षापासून शिकवले जात आहे. इच्छुक असतील त्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा देण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
मराठीशी देवनागरी लिपी असेल किंवा संवाद साधत असताना पण बऱ्याच मोठ्या प्रमाणात हिंदी वापर केला जातो ज्या वर्गातील विद्यार्थी तिसऱ्या भाषेच्या संदर्भात तिसऱ्या भाषेची मागणी करतील त्यापद्धतीने नियोजन केले जाईल. किमान २० विद्यार्थ्यांची मागणी हवी तर ते शिक्षक उपलब्ध करून दिली जाईल.
कमी विद्यार्थी असतील तर ऑनलाइन पद्धतीने शिकवली जाईल. असा जर निदर्शनास आला तर कठोर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल एकदा दोनदा समाज दिल्यानंतर पण मराठी शिकवण सुरू झालं नाही तर कारवाई केली जाईल
Live Update : इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात ठाकरे गट आणि मनसेच आज आंदोलन...
इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात ठाकरे गट आणि मनसेच आज आंदोलन...
11 वाजता प्रादेशिक कामगार आयुक्त यांच्या कार्यालय चुनाभट्टी इथे आंदोलन
भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष आणि ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत तसेच मनसे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संतोष धूरी यांच्या उपस्थितीत मुंबईत आंदोलन...
एकीकडे ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरु असताना मनसे आणि ठाकरेंच आंदोलन
या आंदोलनापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नेत्यांना चुनाभट्टी पोलिसांकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत
Live Update : छत्रपती संभाजीनगर धुळे सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात
छत्रपती संभाजीनगर धुळे सोलापूर महामार्गावर तिहेरी अपघात
चार चाकी आणि दोन बसमध्ये अपघात
दोन बसची एकमेकांना जोरदार धडक
अपघातात 25 पेक्षा अधिक लोक जखमी
जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
बसचा ड्रायव्हर गंभीर जखमी असल्याने रुग्णालयात हलवलं
Live Update : अमरावतीचे महापालिका आयुक्त संचिन कलंत्रे यांचे पुणे येथे बदली..
अमरावतीचे महापालिका आयुक्त संचिन कलंत्रे यांचे पुणे येथे बदली..
* नागपूरच्या स्मार्ट सिटीच्या सीईओ सौम्या शर्मा चांडक नव्या महापालिका आयुक्त....
* वर्षभराच्या आतच सचिन कलंत्रे यांची बदली...
Live Update : पंढरपुरात आषाढी वारीसाठी 22 जून रोजी महास्वच्छता अभियान
आषाढी वारी पूर्वी पंढरपूर शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे. यासाठी ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहरात 22 जून रोजी महास्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे हे स्वतः प्रयत्न करून दीड हजाराहून अधिक स्वयंसेवक पंढरपुरात एकत्रित करणार आहेत. तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच पिंपरी चिंचवड येथून खास रस्ते स्वच्छता करणाऱ्या मशनरीच आणून पंढरपूर शहराची महास्वच्छता केली जाणार आहे. वारी पूर्वी आणि वारीनंतर अशी स्वच्छता पंढरपुरात करून वारकऱ्यांची सेवा करण्याचा मानस प्रशासनाचा आहे.
Live Update : धनादेश अनादर प्रकरणात भुसावळ न्यायालयाने कर्जदारास सुनावला 62 हजार रुपये दंड
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतलेल्या कर्जदाराने कर्जाच्या परतफेडी साठी कंपनीला दिलेला धनादेश न वटल्याने धनादेश अनादर केल्या प्रकरणी कर्जदारास भुसावळ न्यायालयाने 62 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच दंड न भरल्यास एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. बब्बू गवळी असे शिक्षा सुनावलेल्या कर्जदाराचे नाव आहे.
Live Update : चंद्रपुरात शिक्षण संचालक यांच्या परिपत्रकाची होळी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकेत्तर भरती स्थगिती विरोधात आंदोलन
राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेत्तर भरती करण्यासाठी शासनाने सुधारित आकृतीबंध जाहीर करून पदभरती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार भरती प्रक्रिया सुरू झाली होती. परंतु त्याला २०२४-२५ च्या संचमान्यतेचे कारण देत संबंधित पदभरती स्थगित करण्यात आली. दहा ते पंधरा वर्षांपासून कर्मचारी भरतीच नसताना केवळ संचमान्यतेचे कारण देत संबंधित पदभरती बंद करण्यात आली. शिक्षकेत्तर भरती स्थगिती विरोधात चंद्रपूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून शिक्षण संचालक यांच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.