Uttar Pradesh Crime news : लग्नाच्या काही तासातच नवरा-नवरीचा घरातच संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्येतून ही घटना समोर आली आहे. प्राथमिक अंदाजनुसार, नवरदेवाने नवरीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर आत्महत्या केली असावी.
प्रदीप कुमार (24 वर्ष) आणि शिवानी (22 वर्ष) असं मृत नवविवाहीत दाम्पत्याचं नाव आहे. प्रदीप कुमार आणि शिव7 मार्च रोजी रोजीच लग्न झाले होते.
(नक्की वाचा- Nagpur Crime : सासूच्या न्यायासाठी मध्यरात्री न्यायालयाचं दार उघडलं, काय आहे प्रकरण? रात्रीच का घेतली सुनावणी?)
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी लग्नाचा घरी परतल्यानंतर दिवसभर लग्नानंतरचे विधी पार पडले. शनिवारी रात्री उशीरा वधू आणि वर त्यांच्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी वारंवार दार ठोठावल्यानंतरही दाम्पत्याने प्रतिसाद दिला नाही. त्यावेळी कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला आणि त्यांना बेडवर शिवानीचा मृतदेह आढळला. तर प्रदीप छताच्या पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
खोली आतून बंद आढळल्याने प्रथमदर्शनी असे दिसून येत आहे की, प्रदीप कुमारने आत्महत्या करण्यापूर्वी शिवानीची हत्या केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत आणि चौकशी सुरू आहे, असं पोलिसांनी सांगितले.
(नक्की वाचा- Beed News : बीडमध्ये 'टीम DM' अॅक्टिव्ह? सुरेश धस, संदीप क्षीरसागरांनंतर प्रकाश सोळंकेंच्या निकटवर्तीच्या VIDEO Viral)
रिसेप्शनच्या आधी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने सर्वांनाच धक्का बसला. बंद खोलीत घडलेल्या घटनेचा एकमेव साक्षीदार नवरदेवाचा मोबाईल असू शकतो. घटनास्थळावरून पोलिसांना शिवानीचा फोन सापडलेला नाही. तर प्रदीप कुमारचा फोन जप्त करण्यात आला आहे. यातून पोलिसांना काही सुगावा लागण्याची आशा आहे.
(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)
Helplines | |
---|---|
Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) |