गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये भीषण आग, 20 जणांचा मृत्यू

गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सांगितलं की, राजकोटच्या गेम झोनमध्ये आग लागल्याची घटना समजल्यानंतर महापालिका आणि प्रशासनाला बचावकार्य आणि तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

गुजरातच्या राजकोटमध्ये गेमिंग झोनमध्ये भीषण आग लागली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. बचावकार्य अजूनही सुरु आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश दिले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीआरपी गेमिंग झोनमध्ये ही आग लागली आहे. आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच बचावकार्य देखील सुरु आहे.

Advertisement

राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितलं की, टीआरपी गेमिंग झोनमध्ये दुपारी आग लागली. बचाव कार्य सुरू आहे. आग नियंत्रणात आहे. मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सुमारे 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून पुढील तपास सुरु आहे. 

(नक्की वाचा- VIDEO : पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक, घटनास्थळावरुन पळ काढत वाचवला जीव)

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की,  आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मृत किंवा जखमी  यांच्या संख्येबाबत अद्याप सविस्तर माहिती नाही. आग नियंत्रणात आल्यानंतर योग्य माहिती समोर येईल.   

Advertisement

गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी सांगितलं की, राजकोटच्या गेम झोनमध्ये आग लागल्याची घटना समजल्यानंतर महापालिका आणि प्रशासनाला बचावकार्य आणि तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करण्याचे देखील निर्देश दिले आहेत. 

Advertisement

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केले की, "राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केली आहे. घटनेच्या तपासासाठी एक विशेष तपास पथक (SIT) तयार करण्यात आले आहे आणि संपूर्ण तपासाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे

Topics mentioned in this article