जाहिरात

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक, घटनास्थळावरुन पळ काढत वाचवला जीव

प्रणत टुडू यांनी या घटनेच्या मागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. काही सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

VIDEO : पश्चिम बंगालमध्ये भाजप उमेदवारावर दगडफेक, घटनास्थळावरुन पळ काढत वाचवला जीव

पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देखील हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मिदनापूर जिल्ह्यातील गरबेटा येथील मंगलापोटा येथे आंदोलकांना भाजपचे उमेदवार आणि सुरक्षारक्षकांवर दगडफेक केली आहे. प्रणत टुडू असं भाजप उमेदवाराचं नाव आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

व्हिडीओत दिसत आहेत की, प्रणत टुडू यांच्यावर लोक दगडफेक करत आहे. लोकांच्या हातात लाठा-काठ्या देखील दिसत आहे. दगडफेक सुरु होताच, भाजप उमेदवार सुरक्षारक्षकांच्या गराड्यात तिथून माघारी फिरताना दिसत आहे. मात्र लोक त्यांच्या पाठलाग करुन त्यांच्यावर दगडफेक करताना दिसत आहेत. एक दगड पणत टुडू यांच्या पुढे असणाऱ्या एका व्यक्तीला लागतो.  

(नक्की वाचा- विधानपरिषदेसाठी ठाकरेंनी उमेदवारांची केली घोषणा, कोणाला उमेदवारी कोणाचा पत्ता कट?)

टुडू यांनी या घटनेच्या मागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. काही सुरक्षारक्षक जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नागरिक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना बाहेर काढण्यासाठी मतदान करत आहेत. भाजपच्या प्रतिनिधींना आत जाण्याची परवानगी न दिल्याने प्रणत टुडू गारपेटा येथील काही मतदान केंद्रांवर जात होते. 

तर तृणमूल काँग्रेसने आरोप केली की, सुरक्षारक्षकांनी रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेवर हल्ला केला. त्यामुळे संतप्त झालेले गावकरी त्यांच्याविरोधात  आक्रमक झाले.   

(नक्की वाचा- 32 वर्षानंतर विस्थापित काश्मिरी पंडितांनी अनंतनागमध्ये बजावला मतदानाचा हक्क)

   
पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रणत टुडू यांनी म्हटलं की, टीएमसीच्या गुंडांनी अचानक माझ्या कारवर विटा फेकल्या. माझ्या सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप केला त्यावेळ त्यांच्यवरही हल्ला करण्यात आला. माझ्यासोबत असलेल्या दोन सीआयएसएफच्या जवानांच्या डोक्याला इजा झाली आहे. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. मीडियाच्या वाहनांचीही यावेळी तोडफो करण्यात आली.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com