Government On Snapchat : पेपर लीक प्रकरणामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानात ऐतिहासिक आंदोलन केलं.Gen-Z तरुणांनी आंदोलनाचा हत्यार उपसलं आणि सरकारला धारेवर धरलं.त्यानंतर केंद्र सरकारकडून जेन-झी तरुणांपर्यंत पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत विद्यार्थ्यांना संबोधित केलं.मोदी यांनी मंत्र्यानाही सोशल मीडियावर सक्रीय राहण्याच्या सूचना दिल्या.
अशातच आता भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जेन-झी ट्रेंडमध्ये लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साईट स्नॅपचॅटवर उललब्धता दर्शवली आहे. भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे.जयस्वाल यांनी म्हटलंय की,आता आम्ही Snapchat वरही आहोत.खास गोष्टी,अपडेट्स,इंटरेस्टिंग कन्टेंट आणि अनेक विषयांसाठी आमच्या संपर्कात राहा. चला स्नॅप करूया.
नक्की वाचा >> Ratnagiri News: सावधान! कोकणात फिरायला जाताय? 'या' समुद्रकिनाऱ्यावर घडली धडकी भरवणारी घटना
पीएम मोदींचा व्हिडीओ झाला होता तुफान व्हायरल
जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्स्टाग्रामवर सक्रीय झाले होते.त्यांनी गुरुवारी उशिरा रात्री एक व्हिडीओ पोस्ट करत तरुणांना,विद्यार्थ्यांना संबोधीत केलं होतं.त्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पीएम मोदींनी नवीन व्हिडीओ जारी करून देशातील तरुणांना (विशेषत:जेन-झी) आणि सामान्य लोकांचे आभार मानले होते.
व्हिडीओत मोदींनी म्हटलं होतं की, "थँक्स फ्रेंड्स,काल उशिरा रात्री तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. माझ्या व्हिडीओला तुम्ही ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिल्या आणि सकारात्मक उपाय सूचवले, त्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार.तुमचं हे प्रेम असंच राहूद्या. आपलं नातं अधिक सक्रियतेनं जोडलं जाईल.तुमचं हे प्रेम कायम राहील.धन्यवाद मित्रांनो".
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world