जाहिरात

Monsoon 2025: मॉन्सूनचा वाऱ्याच्या वेगाने प्रवास, 4-5 दिवसांत केरळला पोहोचणार

Maharashtra Weather Update: तारखेच्या एक दिवस आधीच पाऊस केरळमध्ये येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. एरवी केरळमध्ये पावसाचे आगमन होण्यास 1 जून उजाडतो. 

Monsoon 2025: मॉन्सूनचा वाऱ्याच्या वेगाने प्रवास, 4-5 दिवसांत केरळला पोहोचणार

Maharashtra Monsoon News: मॉन्सूनने सुसाट वेग धारण केला असून यंदा पाऊस वेळेच्या बराच आधी (Monsoon in Kerala) भारतात दाखल होणार आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD)येत्या 4-5 दिवसांत पाऊस केरळमध्ये पोहचेल असा अंदाज हवामान खात्याने मंगळवारी वर्तवला. याआधी हवामान खात्याने 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवला होता. या तारखेच्या एक दिवस आधीच पाऊस केरळमध्ये येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. एरवी केरळमध्ये पावसाचे आगमन होण्यास 1 जून उजाडतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

16 वर्षानंतर पहिल्यांदाच लवकर एन्ट्री
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाचे खरोखर वेळेआधी आगमन झाले तर ही 2009 नंतरची वेळेआधी मॉन्सूनचे आगमन होण्याची पहिलीच वेळ असणार आहे. 2009 साली मॉन्सूनचे 23 मे रोजी आगमन झाले होते. 16 वर्षानंतर 1 जूनच्या आधी पावसाचे आगमन होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मॉन्सूनच्या केरळमधील आगमनासाठीची परिस्थिती पोषक बनली असून येत्या 4-5 दिवसांत मॉन्सूनचे केरळमध्ये आगमन होईल. 

सर्वसाधारणपणे मॉन्सूनचे केरळमध्ये 1 जून रोजी आगमन होते. 8 जूनपर्यंत पाऊस भारताचा अधिकांश भाग व्यापत असतो. 17 सप्टेंबरपासून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरूवात होते आणि 15 ऑक्टोबरपर्यंत पावसाळा संपतो. गेल्या वर्षी पावसाचे 30 मे रोजी आगमन झाले होते. 2023 साली 8 जूनला, 2022 साली 29 मे रोजी, 2021 साली 3 जून रोजी, 2020 साली 1 जून रोजी, 2019 साली 8 जून रोजी पावसाचे आगमन झाले होते. 2018 साली 29 मे रोजी पावसाचे आगमन झाले होते. 

Maharashtra Politics: 'भुजबळ तो झाकी! लवकरच सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील...' नव्या दाव्याने खळबळ

हवामान खात्याने एप्रिल महिन्यात पावसाचा अंदाज वर्तवला होता. यामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. अल-निनोचा कोणताही प्रभाव जाणवणार नाही असेही हवामान खात्याने स्पष्ट केले होते. अल-निनोमुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची भीती असते. 90 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला तर तो फार कमी, 90-95 टक्के पाऊस झाल्यास सरासरीपेक्षा कमी, 105-110 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा जास्त आणि 110 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस म्हणजे 'अति'वृष्टी मानला जातो.

कर्नाटकात अवकाळीचे 5 बळी

कर्नाटकात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून या पावसामुळे तिथे आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. साई ले आऊट परिसराला या पावसामुळे मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. या परिसरातील तळमजले अर्ध्यापर्यंत बुडाले असून या घरांमध्ये लोकं अडकून पडली आहेत. या भागातील 150 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

घरात शिरलेले पाणी बाहेर काढत असताना 12 वर्षांच्या मुलासह दोघांचा वीजेचा झटका बसल्याने मृत्यू झाला.  मनमोहन कामत (63) या व्यक्तीने घरात शिरलेले पाणी बाहेर फेकण्यासाठी मोटार पंप लावायचं ठरवलं होतं. पंपचा प्लग लावल्यानंतर बटन दाबताच शॉर्ट सर्किट झालं आणि त्यांचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. कामत यांच्या घरी काम करणाऱ्याचा 12 वर्षांचा मुलगाही शॉक लागल्याने दगावला.

Nanded News: NDTV मराठीचा दणका! नांदेडच्या 'मटका किंग'ची 24 तासात पक्षातून हकालपट्टी

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com