जाहिरात

Maharashtra Politics: 'भुजबळ तो झाकी! लवकरच सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील...' नव्या दाव्याने खळबळ

छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Maharashtra Politics: 'भुजबळ तो झाकी!  लवकरच सुप्रिया सुळे, रोहित पवार, जयंत पाटील...' नव्या दाव्याने खळबळ

रेवती हिंगवे, पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा अखेर राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. छगन भुजबळ यांच्या मंत्रिमंडळातील समावेशानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठे विधान केले आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत लक्ष्मण हाके?

'गेल्या काही दिवसांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगल्या आहेत. राष्ट्रवादीच्या मनोमिलनासह रोहित पवार यांना राज्यात मंत्रिपद तर सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद दिले जाईल अशाही बातम्या समोर आल्या आहेत. आता छगन भुजबळ यांच्या शपथविधीनंतर लक्ष्मण हाके यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. "भुजबळ साहेबांचा मंत्रिमंडळातील समावेश येतो झाकी है पुढे जाऊन जयंत पाटील ,रोहित पवार, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये यांचा मंत्रिमंडळात समावेश महाराष्ट्राला येत्या काळात पाहायला मिळेल,' असा सर्वात मोठा दावा त्यांनी केला आहे. 

तसेच "सरकारमध्ये छगन भुजबळ यांना उशिरा का होईना स्थान दिलं त्याबद्दल सरकारचे स्वागत. ओबीसीच्या दृष्टिकोनातून छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश आवश्यक होता. पण ओबीसी आरक्षण हा येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये महत्त्वाचा विषय ओबीसी नेत्यांसमोर असणार आहे. येणाऱ्या पंचायतराज निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसी समोर आणि ओबीसी नेत्या समोर आव्हानांचे प्रश्न आहेत , त्यांच्या समावेशाने या लढाई ला बळ भेटणार आहे, असे म्हणत ओबीसी प्रश्नावर भूमिका घेणार नसाल तर गाठ ओबीसी समाजाशी आहे," असा इशाराही त्यांनी छगन भुजबळांना दिला आहे.

( नक्की वाचा :  Exclusive: काश्मीरला जा, फोटो घे... ISI एजंट आणि हेर यांच्यात काय झाली चर्चा? )

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या महायुतीमधील प्रवेशाच्या चर्चांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय बदनामी करण्याचे काहीजण काम करतात. मला शपथ घ्यायची म्हणून काहीजण अफवा पसरवत असतात. ज्यावेळेस काही करायचे असेल त्यावेळी उघड करू. विनाकारण बदनामी का करतात? असा सवाल करत आम्ही शरद पवार यांच्या आदेशान काम करतो आणि करत राहील, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com