
तुम्ही अनेक प्रेम प्रकरणं ऐकली असतील किंवा पाहिली असतील. पण उत्तर प्रदेशातल्या कासगंज इथलं प्रेम प्रकरण थोडंल वेगळं तर आहेच पण तेवढ भन्नाटही आहे. कासगंज जवळील गावात पप्पू या व्यक्तीचे कुटुंब राहाते. त्याचे लग्न झाले असून त्याची पत्नी 32 वर्षाची आहे. तिला 6 मुलंही आहेत. याच गावात राहणारा शकील हा पप्पूचा चांगला मित्र आहे. तो ही विवाहीत असून त्याला 10 मुलं आहेत. याच शकिलच्या मुला बरोबर पप्पूच्या मुलीचे लग्न ठरले होते. लग्न लागणारही होते. सर्व तयारी ही झाली होती. पण त्या आधीच पप्पूच्या पत्नीला घेवून शकील फुर्रर्रर्र झाला. आपल्याच विहीणीला पळवून नेल्याची चर्चा गावात जोरदार पणे सुरू होती. यामागची सर्व कथा ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशात कासगंज हे गाव आहे. या गावात पप्पू आणि शकील या दोघांचीही कुटुंब राहतात. या दोघांचीही लग्न झाली आहेत. पप्पूला सहा मुलं आहेत. तर शकीलला दहा मुलं आहे. पप्पू आणि शकील हे मित्र आहेत. शकीलचे पप्पूच्या घरी येणे जाणे होते. याच काळात शकीलने आपल्या मुलाचे लग्न पप्पूच्या मुलीबरोबर करण्याचे ठरवले. त्याला दोन्ही कुटुंबानी सहमती ही दिली. याच काळात मात्र शकील आणि पप्पूच्या पत्नीचा टाका भिडला. ते दोघेही एकमेकाच्या प्रेमात पडले. लेकरांची लग्न होणार होती. सर्व तयारी ही झाली होती. पण त्यांच्या मनात काही तरी वेगळं चाललं होतं. त्यांना लेकरां पेक्षा स्वत:चं पडलं होतं. त्यांनी मुलांच्या लग्ना आधीच गावातून पोबारा केला.
ट्रेंडिंग बातमी - जयंत पाटील यांचा पराभव का झाला?, शरद पवारांनी सांगितलं कारण
यानंतर लग्न घरात एकच सन्नाटा पसरला. पप्पूच्या पाया खालची वाळू सरकली. त्याने थेट पोलिस स्थानक गाठले. पत्नीला पळवून नेल्याची तक्राही दाखल केली. मात्र गावात चर्चा रंगली ती या प्रेम प्रकरणाची. या दोघांनी कोणताही विचार न करता आपली सोळा मुले मागे सोडून ते पळून गेले. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. शिवाय ते पुढील तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world