जाहिरात

UPSC परीक्षेत अपयश, आईने घराबाहेर काढलं; वाचा AAP मध्ये प्रवेश केलेल्या अवध ओझाचा प्रवास

यूपीएससीमधील अपयशानंतर अवध ओझा इलाहाबाद येथे गेले. तिथे ते एका कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये पुण्यात कोचिंग सेंटर IQRA ची सुरुवात केली.

UPSC परीक्षेत अपयश, आईने घराबाहेर काढलं; वाचा AAP मध्ये प्रवेश केलेल्या अवध ओझाचा प्रवास

मोटिव्हेशनल स्पीकर आणि यूपीएससी कोचिंग सेंटरची संचालक अवध ओझा (Avadh Ojha) अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात सामील झाले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपमध्ये प्रवेश केल्याने ते निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून ते आगामी विधानसभा निवडणूक लढवू शकतात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अवध ओझा यांच्या पक्ष प्रवेशावेळी अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया देखील उपस्थित होते. अवध ओझा यांनी यावेळी म्हटलं की, राजकारणात येऊन शिक्षण क्षेत्रात चांगलं काम करण्याची संधी दिली त्याबद्दल केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांचे आभार. 

अवध ओझा आधी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र चर्चा फिस्कटल्याने त्यांना संधी मिळाली नाही. आता ते आम आदमी पक्षात सामील झाले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी अमेठी येथून निवडणूक लढण्याची देखील इच्छा व्यक्त केली होती. 

(नक्की वाचा-  Karnataka IPS Officer : मेहनत करुन IPS बनला, मात्र पहिली पोस्टिंग घेण्यासाठी जाताना वाटेतच अपघाती मृत्यू)

Latest and Breaking News on NDTV

कोण आहेत अवध ओझा?

अवध ओझा कोचिंग सेंटरसोबतच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर देखील आहेत. अवध ओझा यांचे वडील श्रीमाता प्रसाद ओझा हे उत्तर प्रदेशमध्ये पोस्टमास्टर होते. त्यांनी पत्नी म्हणजे अवध ओझा यांच्या आईला वकील बनवण्यासाठी आपली 5 एकर जमीन विकली होती. अवध ओझा यांनी देखील जमीन विकून आपलं यूपीएससीचं शिक्षण सुरु केलं होतं. ओझा यांना बरीच वर्ष तयारी केली, मात्र त्यांना मुख्य परीक्षेत यश आलं नाही. बेसिक क्लिअर नसल्याने यूपीएससी परीक्षेत यश मिळवता आलं नाही, असं अवध ओझा सांगतात. 

यूपीएससीमधील अपयशानंतर अवध ओझा इलाहाबाद येथे गेले. तिथे ते एका कोचिंग सेंटरमध्ये शिक्षक म्हणून काम सुरु केलं. त्यानंतर त्यांनी 2019 मध्ये पुण्यात कोचिंग सेंटर IQRA ची सुरुवात केली. त्यानंतर 2020 मध्ये त्यांनी यूट्युब चॅनल Ray Avadh Ojha सुरु केलं. अवध ओझा यांनी एबीसी अॅकॅडमी ऑफ़ सिव्हील सर्विस, चाणक्य आयएएस अॅकॅडमी, Unacadamy येथेही यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं आहे. 

(नक्की वाचा-  Shobhita Shivanna : दाक्षिणात्य सिनेसृष्टी हादरली; प्रसिद्ध अभिनेत्री घरात आढळली मृतावस्थेत)

Latest and Breaking News on NDTV

अवध ओझा यांची संपत्ती किती?

मीडिया रिपोर्ट्नुसार, अवध यांच्याकडे एकूण 11 कोटींची संपत्ती आहे. कोचिंग व्यतिरिक्त अवध ओझा मोटिव्हेशनल स्पीकर आणि सोशल मीडिआ इन्फ्लुएन्सर म्हणूनही प्रसिद्ध आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

आईने घरातून बाहेर काढलं होतं

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अवध ओझा यांनी सांगितलं की, यूपीएससीच्या शेवटच्या प्रयत्नातही त्यांना यश मिळालं नाही. त्यानंतर ते घरी पोहोचले तेव्हा त्यांची आई खूप निराश होती. दोघांमध्ये यावरून वादही झाला होता. त्यानंतर आईने त्यांना घराबाहेर काढलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ओझा 2000 ते 2007 आपल्या घरी गेले नव्हते. मात्र त्यानंतर त्यांनी मेहनत घेत आपली स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com