Thane News : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचं विद्यार्थ्यांवर प्रचंड दडपण असतं. अनेकदा लेखी परीक्षा पास केलेली मुलं मुलाखतीत अडकतात. अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये मुलाखतीच्या भीतीमुळे नैराश्य निर्माण होतं. त्याअनुषंगाने UPSC च्या स्पर्धा परीक्षेत मुलाखतीस यशस्वीपणे सामोरं जाण्याकरीता आणि विद्यार्थ्यांमधील मुलाखतीबाबत असलेली भीती दूर करण्याकरिता ठाणे महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत मॉक इंटरव्हुवचं (MOCK-INTERVIEW) आयोजन नुकतेच करण्यात आलं होतं. यामध्ये अनेक मोठमोठे व्यक्ती सहभागी झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन केलं. युपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मॉक मुलाखतीची संधी मिळणार आहे.
नुकत्याच आयोजित केलेल्या मुलाखतीच्या सत्रात ठाणे महानरगपालिकेचे आयुक्त सौरभ राव (भाप्रसे), अणु ऊर्जा विभागाचे संचालक डॉ. नितीन जावळे (भाप्रसे), राज्य गुप्तचर विभाग, रेल्वे, मुंबईचे सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (IPS), माहिती अधिकार मुंबईचे आयुक्त शेखर चन्ने (भाप्रसे), केंद्रीय उत्पादन शुल्क आणि केंद्रीय कर, गुजरातचे प्रधान आयुक्त सुरेंद्र मानकोसकर (भामसे), अश्विनी आडिवरेकर (भामसे), कस्टमचे उपआयुक्त अक्षय पाटील (IRS), मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ मृदुल निळे, UPSC आणि MPSC तज्ज्ञ मार्गदर्शक यांनी परीक्षणार्थींच्या मॉक इंटरव्हुव (MOCK-INTERVIEW) घेतल्या.
UPSC विद्यार्थ्यांची मुलाखतीची तयारी...
सदर सत्रात उपरोक्त अनुभवी व तज्ज्ञ परीक्षकांनी Mock Interview करिता आलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) मुलाखतीकरिता कोणत्या बाबी आवश्यक आहेत? विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशा पद्धतीने द्यावीत? तसेच Mock Interview मध्ये दिलेल्या उत्तरांमध्ये कशा पध्दतीत बदल केला पाहिजे? बॉडीलॅग्वेज कशा पध्दतीने हवी? आयकॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे? या इतर अनेक बाबींबाबत सखोल असे बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच, संस्थेमार्फत सदर मुलाखतीचे अत्याधुनिक पध्दतीने विडीयो रेकाँर्डींग करण्यात आलेले असून, सदर व्हिडिओ रेकाँर्डींग विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे, जेणेकरुन मुलाखतीत झालेल्या चुकांचे विद्यार्थ्यांना योग्य वेळेत मूल्यमापन करता येईल. महाराष्ट्रातील एकुण 25 विद्यार्थ्यांचे DAF-2 अवलोकन करून, संस्थेच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून सदर DAF-2 चे ANALYSIS करून त्याआधारे प्रश्नावली तयार करून, मुलाखतीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
20 डिसेंबर रोजी पुन्हा Mock Interview
शनिवार 20 डिसेंबर 2025 रोजी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेमार्फत पुन:श्च Mock Interview चे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर मुलाखत पॅनलमध्ये के.पी. बक्षी (IAS) सेवानिवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव - महाराष्ट्र शासन, डॉ. शैलेंद्र मिश्रा (IPS) DIG, NIA Branch Office Mumbai, मोक्षदा पाटील (IPS) Deputy Inspector General Of Police – Mumbai, स्वप्नील थोरात (IFS), प्रतीती गोयल (IRS) Deputy Commissioner At Indian Reveunue Service - Mumbai, नेहा निकम (IRS), अभिजीत थोरात (IRS), श्री. भुषण देशमुख, UPSC आणि MPSC तज्ज्ञ मार्गदर्शक इत्यादी मान्यकरांचा समावेश करण्यात आलेला आहे. जे विद्यार्थी दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी मॉक इंटरव्हिवकरिता (MOCK-INTERVIEW) इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे DAF-2 संस्थेच्या www.cdinstitute@thanecity.gov.in या ईमेल आयडीवर अपलोड करावे. अधिक माहितीकरीता संस्थेच्या 25881421 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखतीबाबत मार्गदर्शन हवे असल्यास, संस्थेचे संचालक याचेंशी व संस्थेच्या मुख्य केंद्रास त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेचे संचालक महादेव जगताप यांनी केले. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (1) संदिप माळवी, उपआयुक्त सचिन सांगळे आणि संचालक महादेव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम यशस्वी करणेकरीता चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी/कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
