जाहिरात

26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 17 वर्षांनी भारतात आणणार, तहव्वुर राणाला कुठे ठेवणार?  

तहव्वुर राणा भारत आने वाला है. उस पर केस चलेगा. जांच एतहव्वुर राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या अनेक हल्ल्यातील कटात सहभागी होता. जेंसियों की कोशिश उसे फांसी के फंदे तक पहुंचाने की होगी, ताकि साल 2008 में मुंबई की रूह पर लगे जख्मों पर कुछ हद तक मरहम लगाया जा सके.

26/11 हल्ल्याच्या मास्टरमाइंडला 17 वर्षांनी भारतात आणणार, तहव्वुर राणाला कुठे ठेवणार?  

Mumbai Terror Attack : मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला घेऊन राष्ट्रीय तपास संस्था (NIA)  अमेरिकेहून भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. भारत सरकार 2019 पासून त्याला देशात परत आणण्याचा प्रयत्न करत होते. या प्रयत्नांना आता यश आले आहे. तहव्वूरला गुरुवारी 10 एप्रिल रोजी सकाळपर्यंत भारतात आणलं येईल. येथे तो एनआयएच्या ताब्यात राहील.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतात आणल्यानंतर त्याला दिल्लीतील एनआयए मुख्यालयात ठेवण्यात येईल. तिथून त्याला न्यायालयात हजर केले जाईल. राणाला भारतात ठेवण्यासाठी दिल्ली आणि मुंबईच्या दोन तुरुंगांमध्ये तयारी करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत तपास यंत्रणांकडून अत्यंत गुप्तता पाळली जात आहे. ही संपूर्ण मोहीम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या देखरेखीखाली चालवली जात आहे. गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील यामध्ये मदत करत आहेत.

(नक्की वाचा - Rohit Pawar : विधानसभेतील मविआच्या कामगिरीवरुन रोहित पवारांची नाराजी, म्हणाले...)

दिल्ली आणि मुंबईतील प्रत्येकी एका तुरुंगात तहव्वुर राणासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रत्यार्पणाबाबत अमेरिकन न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही तयारी करण्यात आली आहे. एनआयए चौकशीनंतर, मुंबई पोलीस राणाची चौकशी करण्यासाठी न्यायालयात अर्ज देखील दाखल करू शकतात. 

मुंबई हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू

तहव्वुर राणा हा पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीचा जवळचा आहे. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत झालेल्या अनेक हल्ल्यातील कटात सहभागी होता. या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह 166 नागरिक मारले गेले होते. 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.

(नक्की वाचा- Sandeep Deshpande : "एकतरी सीट निवडून आणून दाखवा", परप्रांतीयाने डिवचलं; संदीप देशपांडे संतापले)

अमेरिकेच्या न्यायालयाने याचिका फेटाळली

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याच्या भारताकडे प्रत्यार्पणावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती. दहशतवादी तहव्वुरने एका याचिकेद्वारे प्रत्यार्पणाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. राणाने न्यायालयासमोर भारतात पाठवू नये अशी विनंती केली. त्याने न्यायालयाला असेही सांगितले की जर त्याला भारतात पाठवले तर तिथे त्याचा छळ केला जाईल.