
Sandeep Deshpande threat Call : मनसे पक्षाची मान्यता रद्द करावी अशी मागणी उत्तर भारतीय विकास सेना नावाच्या पक्षाकडून करण्यात आल्यानंतर भैय्यांना थेट आव्हान देणारे मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना धमकीचा कॉल आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध अमराठी वाद उफाळला आहे. उत्तर भारतीय विकास सेनेकडून मनसे पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी केल्यानंतर संदीप देशपांडेंनी मुंबईतील उत्तर भारतीयांवर निशाणा साधला होता.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आपचा पक्ष राहणार की नाही हे आता भय्ये ठरवणार असतील तर भय्यै मुंबईत राहणार की नाही, त्यांना इथं राहू द्यायचं की नाही हे आम्हाला ठरवावं लागेल अशा शब्दात संदीप देशपांडेंनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर संदीप देशपांडेंना एका उत्तर भारतीय व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देत आल्याचं समजतं. या बाबत त्यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल रोजी रात्री 10:15 वाजता त्यांना फोन आला होता. समोरील व्यक्ती शिव्या देत होती, असं देशपांडेंनी सांगितलं.
नक्की वाचा - Rohit Pawar : विधानसभेतील मविआच्या कामगिरीवरुन रोहित पवारांची नाराजी, म्हणाले...
त्या फोन कॉलमधील संभाषण...
संदीप देशपांडेंना फोन आला तेव्हा समोरील व्यक्ती शिव्या घातल होती. दुसऱ्यांदा फोन आला तेव्हा त्यांनी फोन कॉल रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे समोरील व्यक्ती मराठीत बोलत होती.
अज्ञात व्यक्ती - शिवी कशाला देताय
संदीप देशपांडे - तू आधी शिवी दिलीस ना
अज्ञात व्यक्ती - तू दिली की, मी दिली...
संदीप देशपांडे - तुझा अड्रेस दे..
अज्ञात व्यक्ती - जाऊ दे तुझी औकाद नाहीये तेवढी
संदीप देशपांडे - तुझी औकाद आहे का रे भैय्या. तुझा पत्ता दे. हिम्मत असेल तर तिथेच उभा राहा.
अज्ञात व्यक्ती - तू कशाला येतो, मीच येतो...
संदीप देशपांडे - ये ना, माझ्या घरी येतो? बघू तुझ्यात हिम्मत किती आहे ते..
अज्ञात व्यक्ती - आधी एक सीट निवडून आणून दाखल..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world