
Mumbai Gandhinagar Vande Bharat : मुंबई - गांधीनगर वंदे भारत पुन्हा एकदा वादात अडकली आहे. साधारण महिनाभरापूर्वी भारतीय रेल्वेवर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला होता. मुंबई-गांधीनगर वंदे भारतला पालघर येथे थांबा देण्याऐवजी वलसाड येथे थांबा दिल्याने महाराष्ट्रातून आक्षेप नोंदविण्यात आला होता. त्याला महिना उलटतो तोच पुन्हा एकदा वंदे भारत वादात सापडली आहे.
आता या ट्रेनला गुजरातमध्ये आणखी एक थांबा मिळाला आहे. यंदा वलसाडपासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या नवसारीला नवा थांबा मिळाला आहे. 23-24 ऑगस्टपासून मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस नवसारी (additional halt at Navsari) येथेही थांबेल. नवसारी स्थानक सुरतपासून 29 किमी आणि वलसाडपासून 39 किमी अंतरावर आहे.
गेल्या तीन वर्षात गुजरातमधील हा चौथा थांबा आहे. मात्र पालघर जिल्हा दुर्लक्षित राहिला आहे. गुजरातमधील थांबा आणि महाराष्ट्रातील अंतर 140 किलोमीटरपर्यंत आहे. नवीन थांबा हा सद्याच्या स्थानकाच्या फार जवळ आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास, वलसाड ते वापीमधील अंतर 24 किमी, नवसारी ते सुरतमधील अंतर 29 किमी आणि आनंद ते बडोद्यामध्ये 35 किमी अंतर आहे. प्रत्यक्षात गुजरातमध्ये 68 किमी अंतरात सुरत-नवसारी-वलसाड स्थानकं येतात. दुसरीकडे पालघर जिल्ह्याला पूर्णपणे बायपास करण्यात आलं आहे. ज्यामुळे बोरीवली ते वापी यादरम्यान तब्बल 140 किमी नॉन स्टॉप मार्ग आहे. विशेषत: यामध्ये पालघर, डहाणू आणि बोईसर यांसारखे प्रमुख प्रवासी आणि औद्योगिक केंद्र आहेत, ज्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं आहे, असा प्रवाशांचा आरोप आहे.
WR has decided to provide an additional halt at Navsari to Train Nos. 20901/02 Mumbai Central - Gandhinagar Capital Vande Bharat Express ex Mumbai Central w.e.f. JCO 24th August 2025 and ex Gandhinagar Capital w.e.f JCO 23rd August 2025#WRUpdates pic.twitter.com/O8zSbV8IUy
— Western Railway (@WesternRly) August 22, 2025
यापूर्वीही पालघरमधील नागरिकांनी येथे एक्स्प्रेस गाड्यांना थांबे देण्याची मागणी केली आहे. पालघरमधील वाढती प्रवासी संख्या आणि राज्यासाठी तयार होणारा महसूल लक्षात घेता हा पालघरवासीयांचा हक्क आहे, अशी त्यांची भावना आहे. पालघरमधील एका कार्यकर्त्याच्या मते, पालघर जिल्हा महसुलाबाबत वलसाड आणि नवसारीपेक्षा अनेक पटीने पुढे आहे. तरीही पश्चिम रेल्वेने महाराष्ट्रातील विकसनशील पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष करीत गुजरातला थांबे देत आहेत.
मुंबई ते नवसारी वंदे भारत एक्प्रेस थांबे
मुंबई सेंट्र्ल
बोरीवली
वापी
वलसाड
नवसारी
सुरत
बडोदा
आनंद
अहमदाबाद
गांधीनगर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world