Mumbai News: शिमल्याला फिरायला जाणं जीवावर बेतू शकतं! मुंबईतील महिलेसोबत काय घडलं?

Mumbai Tourist Dies in Shimla: प्रियंका या आपल्या मावशीसोबत मनालीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध सोलांग व्हॅलीमध्ये फिरायला गेल्या होत्या. मात्र, तिथून परतत असताना त्यांना अचानक थंडीने भरले आणि असह्य हुडहुडी भरली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai Tourist Dies in Shimla: हिमाचल प्रदेशातील मनाली येथे पर्यटनासाठी गेलेल्या मुंबईच्या पर्यटकाचा अतिथंडीमुळे मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. निसर्गरम्य हिमाचलमध्ये सध्या निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत असून, एका बाजूला अतिनीचांकी तापमान तर दुसऱ्या बाजूला भूस्खलन आणि भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

मुंबईतील कालाचौकी परिसरातील रहिवासी असलेल्या प्रियंका विष्णू दुखंढे (38 वर्ष) यांचा हिमाचल प्रदेशातील मनाली येथे अतिथंडीमुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत असून मनालीतील तापमान शून्याखाली गेले आहे, ज्याचा फटका या पर्यटकाला बसला.

सोलांग व्हॅलीत काय घडले?

प्रियंका या आपल्या मावशीसोबत मनालीपासून 15 किमी अंतरावर असलेल्या प्रसिद्ध सोलांग व्हॅलीमध्ये फिरायला गेल्या होत्या. मात्र, तिथून परतत असताना त्यांना अचानक थंडीने भरले आणि असह्य हुडहुडी भरली. त्यांची प्रकृती वेगाने खालावल्याने त्यांना तात्काळ मनालीतील रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 'कोल्ड एक्स्पोजर'मुळे हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

(नक्की वाचा-  Railway Block: गोरेगाव-सीएसएमटी सेवा 3 महिने बंद राहणार, मेगाब्लॉकमुळे प्रवाशांचे होणार 'मेगा'हाल)

हिमाचलवर नैसर्गिक संकटांची मालिका

हिमाचलमध्ये केवळ थंडीच नाही, तर इतर नैसर्गिक आपत्तींनीही थैमान घातले आहे. गुरुवारी पहाटे 3.59 वाजता किन्नौर जिल्ह्यात 3.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. याचा केंद्रबिंदू चांगो परिसरात होता. कुल्लू जिल्ह्यातील पहनाला गावाजवळ गुरुवारी सकाळी भूस्खलन झाल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
 

Advertisement
Topics mentioned in this article