Modi 3.O : NDA तील खदखद दुसऱ्याच दिवशी उघड, एकच मंत्रीपद मिळाल्यानं शिवसेना खासदार नाराज

Modi 3.O मोदी सरकारच्या मंत्रिमडळावर नाराजीचा पहिला सूर महाराष्ट्रातून उमटलाय. शिवसेना खासदारानं उघडपणे नाराजी व्यक्त केलीय.

Advertisement
Read Time: 2 mins
मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेला फक्त 1 मंत्रीपद मिळालं आहे.
पिंपरी-चिंचवड:

सूरज कसबे, प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या नेतृत्त्वाखालील NDA सरकारचा शपथविधी रविवारी (9 जून) झाला. हा शपथविधी होऊन 24 तासही झालेले नाहीत, तोवर एनडीएमधील नाराजी उघड झाली आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमडळावर नाराजीचा पहिला सूर महाराष्ट्रातून उमटलाय. शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पक्षाला मिळालेल्या मंत्रिपदावर उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहाता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं. एनडीए मधील इतर घटक पक्षांचे एक-एक खासदार निवडून आलेत, मात्र त्यांना कॅबिनेट मंत्री पद दिलं गेलं. मग शिंदे गटाबाबत भाजपने हा दुजाभाव केला ? असं सवाल बारणे यांनी विचारला. कुटुंबाविरोधात जाऊन महायुतीत आलेल्या अजित पवारांना ही एक मंत्री पद द्यायला हवं होतं. तसेच भाजपने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसलेंना ही मंत्री पद द्यायला हवं होतं. असंही मत त्यांनी व्यक्त केलं. 

कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं?

भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवता आलेलं नाही. भाजपाला 240 जागा जिंकल्या असून त्यांना एनडीएतील सहकारी पक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात 72 पैकी 61 मंत्री भाजपाचे आहेत. तर 11 मित्र पक्षातील आहेत.

( नक्की वाचा : कसं आहे NDA चं मंत्रिमंडळ, कोणाला संधी कोणाला डच्चू? वैशिष्ट्यं काय? सर्व माहिती एका क्लिकवर )


तेलुगु देसमला (16 खासदार) आणि जेडीयू (12 खासदार ) यांना प्रत्येकी 2 मंत्रीपद मिळाली आहेत. त्यामध्ये एका कॅबिनेट खात्याचाही समावेश आहे. पाच खासदार असलेल्या लोकजनशक्तीपक्षाच्या चिराग पासवान यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. 2 खासदार असलेले जेडीयू आणि 1 खासदार असलेल्या हिंदुस्थान आवाम मोर्चाला देखील कॅबिनेट मंत्रीपद मिळालं आहे. पण, 7 खासदार असलेल्या शिवसेनेला राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) मिळालंय. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी रविवारी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  

Advertisement