Pahalgam attack: कधी, कुठे, कसं, सैन्य ठरवेल तसं! मोदींच्या बैठकीत मोठा प्लॅन ठरला

दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सैन्याला फ्री हँड देण्याचा निर्णय यात घेण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

पहलगाममध्ये झालेल्या दहशवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमीका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक झाली. या बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सैन्यदलाचे प्रमुख ही उपस्थित होते. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी सैन्याला फ्री हँड देण्याचा निर्णय यात घेण्यात आला. सैन्याने पुढे काय करायचं आहे हे ठरवावे, त्यांच्या मध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही. ते जो निर्णय घेतील त्याला सरकारचा पुर्ण पाठिंबा असेल असं ही पंतप्रधान मोदींनी या बैठकीत सांगितलं. त्यांच्या या निर्णयामुळे सैन्याची पुढची भूमीका काय असेल याची चर्चा सुरू झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांना सर्व अधिकार देण्यात आले आहेत. सीमेच्या पलिकडे आणि आत दहशतवाद्यांचा बिमोड कसा करायचा याचा निर्णय सैन्याने घ्यावा असं मोदींनी निर्देश दिले आहेत. देश तुमच्या बरोबर आहे असं ही ते यावेळी म्हणाले. सैन्यावर आपला पूर्ण विश्वास असल्याचं ही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानुसार या पुढची रणनिती आखा. दहशतवाद्यांचे अड्डे उद्धवस्त करा, अशी भूमीकाही समोर आली आहे. त्यामुळे भारतीय लष्कर मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. ते कधी कुठे आणि कसे याबाबत मात्र उत्सुकता आहे.   

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - काहीतरी मोठे घडणार ? CDS आणि NSA ची पंतप्रधानांसोबत बैठक

पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या या निर्णयाचे दोन अर्थ काढले जावू शकतात असं संरक्षण विश्लेषक सतिश ढगे यांनी स्पष्ट केलं आहे. याचा एक राजकीय अर्थ आहे आणि दुसरा म्हणजे सामरिक अर्थ आहे असं ही ते म्हणाले. सामरिक अर्थ अतिशय महत्वाचा आहे. भारतीय सैन्य हे जगातील एक भक्कम लष्करा पैकी एक आहे. ते अधुनिक आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप नसावा. तसं झालं तर सैन्याला फ्रि हँड मिळेल. शिवाय त्यांना आरपारची लढाई ही करता येईल. सैन्य निर्णय घेण्यास मोकळे असेल असं ढगे म्हणाले. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानचा मोठा डाव फसला, करायला गेले एक अन् झालं भलतचं

या निर्णयाचा दुसरा अर्थ हा राजकीय आहे. पंतप्रधान मोदींची प्रतिमा ही 56 इंचाच्या छातीचा अशी आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना ही संधी मिळाली आहे. आमचे नेतृत्व किती खंबिर आहे हे त्यांना दाखवता येणार आहे. नेतृत्व खमकं असलं तर काय होतं हे ही जगाला सांगता येणार आहे. त्यातून एक संदेश ही दिला जात आहे. असं ढगे म्हणाले. दरम्यान भारताला फक्त युद्ध नाही तर अन्य दुसरे मार्ग ही आहेत. त्यातून  इलेक्ट्रॉनिक, सायबर, एअर स्टाईक हे पर्याय खुले आहेत. पण अँक्शनला   पाकिस्तानकडून ही रिअँक्शन मिळू शकते. ती कशी आहे हे ही पाहावं लागणार आहे असं ढगे म्हणाले.  

Advertisement