आज उद्धव ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्याआधी ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या या निर्धार मेळाव्याचा टीझरही समोर आला आहे.
सुरक्षा दलांची मोठी कारवाई
सुरक्षा दलांची मोठी कारवाई, छत्तीसगडच्या ठाणे उसूर, ठाणे जांगला आणि ठाणे नेल्सनार परिसरात स्फोटकांसह दोन लाखाचे बक्षीस घोषीत असलेल्या माओवाद्यांसह 22 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून टिफिन बॉम्ब, कार्डेक्स वायर, जिलेटिन स्टिक, डिटोनेटर, बॅटरी, इलेक्ट्रिक वायर आणि जमीन खोदण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
एसटी महामंडळाची बस दरीत कोसळता कोसळता वाचली
शहापूर तालुक्यातील दुर्गम भाग असणाऱ्या कोठारे परिसरात एस.टी.महामंडळाची बसचा ब्रेक फेल झाल्याने बस दरीत गेली. बस मध्येच अडकल्याने प्रवासी थोडक्यात वाचले आहेत. बस मध्ये प्रवास करणारे सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले असुन सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
LIVE Updates: तनिषा भिसे मृत्यू प्रकरण: डॉ. सुश्रुत घैसास यांनी पोलिसांकडून संरक्षण
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरण
डॉ. सुश्रुत घैसास यांनी पुणे पोलिसांकडून संरक्षण
पुणे पोलिसांचा एक कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात
Gold Rate: सोन्याची लाखाकडे वाटचाल, दरात 1650 रुपयांची वाढ
सोन्याच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. आज सोन्याचे दर 1650 रुपयांनी वाढले ज्यामुळे आता सोन्याचा भाव 98 हजार 100 रुपये प्रतितोळा झाला आहे. या वाढीमुळे सोने लवकरच एका लाखावर पोहोचेल.
सोन्याची लाखाकडे वाटचाल..
LIVE Updates: भरधाव चारचाकी वाहनाने एका नऊ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
भरधाव चारचाकी वाहनाने एका नऊ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू.
नागपूरच्या गोधनी परिसरातील घटना.
माहेरा अशफाक सय्यद असे मृत मुलीचे नाव.
भरधाव महिंद्रा झायलो अनियंत्रित झाल्याने आधी विजेच्या खांबाला धडक दिली आणि नंतर घरासमोर खेळणाऱ्या मुलीला चिरडले. अपघात घडल्यानंतर चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता उपस्थितांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
वाहन चालक निष्काळजी पणे भरधाव वाहन चालवत होता तसेच रस्त्यावर वेग नियंत्रक स्पीड ब्रेकर्स नसल्याने गाडीचा वेग कमी झाला नाही आणि अपघात घडला असा स्थानिकांचा आरोप.
LIVE Update: पुण्यात पुन्हा ड्रग्सचा साठा सापडला, 10 लाखांचा माल जप्त
पुण्यात पुन्हा मेफेड्रोन या अमली पदार्थाचा सापडला साठा
पुण्यातील खडकी भागात सापडला अमली पदार्थांचा मोठा साठा
खडकी भागातून 10 लाख 60 हजार रुपयांचा अमली पदार्थाचा साठा जप्त
पुणे पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई
गेल्या अनेक दिवसांपासून खडकी परिसरात ड्रग्स विकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक
LIVE Update: शरद पवार गटाची मुंबईत बैठक, राज्यभरातील संघटनेचा आढावा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची प्रदेश कार्यालयात प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडत आहे
बैठकीला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित आहेत
या बैठकीत राज्यभरातील संघटनेच्या सद्य स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे
मागील काही दिवसांत पक्षाकडून विभागनिहाय निरीक्षक नेमण्यात आले होते
निरीक्षक विभागनिहाय जयंती पाटील यांच्याकडे अहवाल सादर केला जाणार आहे
Live Update : अंबाजोगाई होणार कवितांचं गाव, दोन महिन्यात घोषणा - मंत्री उदय सामंत
- बीड जिल्ह्यात 900 कोटींची गुंतवणूक होणार -
- मुख्यमंत्री रोजगार योजनाचे उद्दिष्ट वाढवण्याचे सूचना केल्या आहेत..
- येत्या तीन वर्षात सुमारे बत्तीस हजार तरुणांना रोजगार मिळवून देणार आहे..
- कौशल्य विकास केंद्राची स्थापना बीडमध्ये होणार आहे..
- गडचिरोली, रत्नागिरी, कल्याण, डोंबिवली आणि पुणे येथे होणार होते.. आता बीडमध्ये देखील होणार आहे..
- पालकमंत्री अजित पवार यांनी यासाठी निधी देखील ठेवला आहे..
- अंबाजोगाई होणार कवितांचे गाव.. दोन महिन्यात घोषणा होणार
Live Update : अमरावती विमानतळावर पहिलं विमान लँड, अमरावतीकरांमध्ये उत्साह
Live Update : अमरावती विमानतळावर पहिलं विमान लँड, अमरावतीकरांमध्ये उत्साह
मुंबईहून निघालेलं प्रवासी विमान अखेर नव्या कोऱ्या अमरावती विमानतळावर लँड झालं आहे.
Live Update : अमरावती विमानतळावर शिंदे गटांचे जिल्हाप्रमुख व पोलिसांमध्ये वादावादी....
अमरावती विमानतळावर शिंदे गटांचे जिल्हाप्रमुख व पोलिसांमध्ये वादावादी....
शिंदे गटांच्या जिल्हाप्रमुखांना आत प्रवेश न दिल्यामुळे शिवसैनिक आक्रमक....
Live Update : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगावी दरे येथे खासगी दौऱ्यावर
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज त्यांच्या मूळगावी दरे, येथे खासगी दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी 5 नंतर ते दरे गावात हेलिकॉप्टरने पोहोचतील. दोन दिवसांचा हा दौरा असल्याचं सांगितलं जात आहे. विश्रांतीच्या निमित्तानं होणारा हा दौरा असला तरी यामागे काही राजकीय चर्चाही रंगू लागल्या आहेत. दरे गावात एकनाथ शिंदेंची मोठी शेती आहे. ते जेव्हा-जेव्हा गावी येतात, तेव्हा वेळ काढून स्वतः शेतीकामात रमतात. मंत्रीपदाची धावपळ आणि जबाबदाऱ्या असतानाही. मूळ गावाशी असलेलं हे नातं आजही ते जपतात. त्यांच्या या दौऱ्यात शेतीची पाहणी, गावकऱ्यांशी संवाद आणि काही महत्त्वाच्या भेटीगाठीही होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Live Update : लातूरच्या अहमदपुरात गुटख्यासह 4 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूरच्या अहमदपूर तालुक्यात अवैद्य गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत चार लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा अवैद्यरित्या उदगीर ते शिरूर ताजबंद रस्त्यावर वाहतूक करत असताना अहमदपूर पोलिसांनी पाठलाग करून गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनांसह गुटखा जप्त केला आहे.. वाहतूक करणाऱ्या व्यक्तींवर अहमदपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत .
Live Update : अमरावतीहून पहिलं प्रवासी विमान लवकरच मुंबईच्या दिशेने झेपावणार...
Live Update : अमरावतीहून पहिलं प्रवासी विमान लवकरच मुंबईच्या दिशेने झेपावणार...
काही वेळेतच पहिलं प्रवासी विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार...
प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण...
Live Update : नाशिकमधील काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर बाबा दर्ग्यावर कारवाई
नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज सकाळी 6 वाजता मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पोलीस बंदोबस्तात काठे गल्ली येथील अनधिकृत धार्मिक स्थळ असलेले सातपीर बाबा दर्गा काढून टाकण्यात आले आहे.
Live Update : चिपळूण नगर परिषदेने गाठला वसुलीचा उच्चांक
चिपळूण नगर परिषदेने गेले दोन महिने कर वसुलीकडे लक्ष केंद्रीत केल्याने आर्थिक वर्षात तब्बल 16 कोटी 68 लाख रुपयांचा कर नगर परिषद तिजोरीत जमा करण्यात मुख्याधिकारी विशाल भोसले व त्यांच्या टीमला यश आलं आहे. नगर परिषदेने 90.99 टक्के मालमत्ता कर, तर 51.59 टक्के पाणीपट्टी वसुली करत मागील दहा वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक वसुली केली आहे. या वसुलीदरम्यान, शहरातील थकबाकीदार 46 जणांच्या मालमत्तांवर जप्तीची, तर 44 नळजोडण्या तोडण्याची कारवाई करण्यात आली.
Live Update : चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास ग्रामस्थांनी दिला चोप
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या एका गावात पाच वर्षीय चिमुकलीवर एका तरुणांकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणास ग्रामस्थांनी चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. मात्र ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीत संशयित तरुण हा गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी चोपडा पोलीस स्टेशन मध्ये संशयित तरुणा विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Live Update : वर्ध्यातील देवळी मतदारसंघात रायपुर गाव झाले पाहिले सौरग्राम
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या रायपुर या गावाने देखील प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजनेअंतर्गत वर्धा जिल्ह्यात देवळी तालुक्यातून पाहिले सौरग्राम होण्याचा मान मिळवला आहे.
Live Update : खामगावच्या इलेक्ट्रिक डीपीला आग, परिसर रात्रभर अंधारात...
खामगाव शहरातील नांदुरा रोडवर असलेल्या हॉटेल पुष्पांजली समोर इलेक्ट्रिक डीपी असून रात्रीच्या सुमारास अचानकपणे या डीपीने पेट घेतला. काही वेळातच संपूर्ण डीपी जळून खाक झाली. यानंतर या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री बारा वाजेपासून सकाळपर्यंत हजाराच्या जवळपास घरे ही अंधारामध्ये होती. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी या भागातील विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी कामाला सुरुवात केली होती. विद्युत डीपी जळत असताना अनेकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली मात्र अग्निशमन दल हे उशिरा पोहोचल्याने विद्युत डीपी पूर्णपणे जळून खाक झाली होती.