Navi Mumbai Airport :मुंबईहून विमानप्रवास सुखकर; नव्या विमानतळावरुन दिल्ली-बंगळुरूसह या शहरांसाठी मिळेल फ्लाइट

Navi Mumbai Airport Update: इंडिगो एअरलाइन्स देशातील दहा शहरांना जोडेल, याशिवाय अकासा एअरने देशांतर्गत सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Navi Mumbai Airport : देशाची आर्थिक राजधानी मुंबईहून दिल्ली आणि अन्य शहरांमध्ये विमान उड्डाण करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. मुंबई विमानतळाशिवाय प्रवाशांना आता नवी मुंबई विमानतळाहून दुसऱ्या शहरांसाठी विमान प्रवास उपलब्ध होणार आहे. प्रवाशांसाठी आता पूर्वीपेक्षा अधिक पर्याय असतील. भारतीय एअरलाइन्स कंपनी इंडिगो आणि अकासा एअरने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशांतर्गत विमान विस्ताराची घोषणा केली आहे. इंडिगो एअरलाइनमुळे देशातील दहा शहरं जोडली जाणार आहे. नवी मुंबई एअरपोर्टची जबाबदारी अदाणी ग्रुपची कंपनी अदाणी एअरपोर्ट होल्डिंग लिमिटेडच्या हाती असेल. 

२५ डिसेंबरपासून इंडिगोच्या दहा शहरांसाठी उड्डाण

इंडिगो २५ डिसेंबरपासून NMIA म्हणजेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्चमधून उड्डाण सुरू करतील. एअरलाइन दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद, लखनऊ, नॉर्थ गोवा, जयपूर, नागपूर, कोचिन आणि मँगलोरसह १० शहरांना थेट जोडली जाईल. इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, एअरलाइनची योजना एनएमआयएमध्ये त्याचे कार्य विस्तारण्याचे उद्दिष्ट आहे. भविष्यात अधिक शहरांसाठी थेट उड्डाणे सुरू करण्यात येतील. 

अकासा एअरलाइन्सच्या सेवादेखील २६ डिसेंबरपासून..

अकासा एअरलाइन्स एनएमआयएकडून उड्डाणं सुरू करणाऱ्या पहिल्या विमान कंपन्यांच्या यादीत सामील झाली आहे. अकासा एअरलाइन्सकडून २५ डिसेंबर रोजी दिल्ली आणि नवी मुंबई दरम्यान पहिली उड्डाणे चालवली जातील. ही एअर लाइन्स थेट चार भारतीय शहरांशी जोडली जाणार आहे. त्यानंतर नवी मुंबईला गोवा, दिल्ली, कोची (२६ डिसेंबरपासून) आणि अहमदाबादपर्यंत (३१ डिसेंबरपासून) नियमित उड्डाणं सुरू होतील.

कंपनीने सांगितलं की, अकासा एअर एनएमआयएमधून हळूहळू आपलं कामकाज वाढवणार आहे. आठवड्याच्या उड्डाणांची संख्याही वाढविण्यात येणार आहे (३०० देशांतर्गत आणि ५० आंतरराष्ट्रीय उड्डाणे). व्यापक नेटवर्क धोरणाचा एक भाग म्हणून एअरलाइन २०२७ च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत १० पार्किंग बेसपर्यंत विस्तार करण्याची योजना आखत आहे. ज्यामध्ये मध्य पूर्व आणि आग्नेय आशियाई बाजारपेठांमध्ये आंतरराष्ट्रीय विस्तारावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे.

Advertisement

नक्की वाचा - Purandar Airport: पुरंदर विमानतळासाठी जमीन, शेतकऱ्यांनी प्रती एकर 1 कोटी नाही तर मागितले 'इतके' कोटी

नवी मुंबई विमानतळावरुन बुकिंग सुरू...

एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, विमानाचं बुकिंग अकासा एअरचं संकेतस्थळ, अँड्रॉइड आणि आयओएस अॅप याशिवाय अनेक प्रमुख ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून सुरू झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात नवी मुंबई एअरपोर्टच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं होतं. हे विमानतळ भारतातील सर्वात मोठं ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प आहे. जे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (पीपीपी) अंतर्गत विकसित केले गेले आहे. नवी मुंबई विमानतळ मुंबई महानगर प्रदेशातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून तयार करण्यात आलं आहे. भारताच्या आर्थिक राजधानीतील हवाई प्रवासाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हे विमानतळ अत्यंत उपयुक्त ठरेल हे नक्की.