जाहिरात

Exclusive: पहलगामचे हल्लेखोर अमरनाथमध्ये करणार होते मोठा हल्ला, 'महादेव' ठरले त्यांचा काळ

Operation Mahadev: गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन महादेव'मध्ये मारले गेलेले पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट रचत होते.

Exclusive: पहलगामचे हल्लेखोर अमरनाथमध्ये करणार होते मोठा हल्ला, 'महादेव' ठरले त्यांचा काळ
Operation Mahadev : हे दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, हे स्पष्ट झाले आहे.
मुंबई:

Operation Mahadev : NDTV ला मिळालेल्या विशेष माहितीमध्ये काश्मीरमधील एका मोठ्या दहशतवादी कटाचा पर्दाफाश झाला आहे. गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ऑपरेशन महादेव'मध्ये मारले गेलेले पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार अमरनाथ यात्रेला लक्ष्य करण्याचा कट रचत होते. गांदरबलच्या जंगलात लपलेल्या या दहशतवाद्यांचे मॉड्यूल तांत्रिक पाळत आणि गुप्तचर माहितीद्वारे शोधण्यात आले. गांदरबल हे अमरनाथ यात्रेकरूंसाठी महत्त्वाचा मार्ग असल्याने ते संवेदनशील मानले जाते.

शोध मोहीम आणि यश

या दहशतवाद्यांबाबत मिळालेल्या माहितीनुसार 5 जुलैपासून ही शोध मोहीम सुरू करण्यात आली. गांदरबलमध्ये भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि बीएसएफ यांनी संयुक्तपणे हे ऑपरेशन सुरू केले. दहशतवाद्यांचा जंगलात शोध सुरूच होता. या काळात ते स्वत:चे ठिकाण बदलत राहिले.

सुरक्षा दलही त्यांचा सातत्याने माग काढत होते. अखेरीस, 24 दिवसांनंतर सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले. तांत्रिक पाळत आणि मानवी गुप्तचर माहितीच्या आधारे रविवारी रात्री उशिरा मुलनार गावाजवळ महादेवच्या टेकड्यांमध्ये त्यांच्या हालचालींची माहिती मिळाली.

सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता दहशतवाद्यांना टेकड्यांमध्ये शोधण्यात आले. 'ऑपरेशन महादेव' या दहशतवाद्यांसाठी काळ बनून आले. तिघांनाही कंठस्नान घालण्यात आले. त्यांच्याजवळ सापडलेली मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा सापडला. त्यावरुन ते दहशतवादी मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, हे स्पष्ट झाले. 

( नक्की वाचा : Rajnath Singh: 'ऑपरेशन सिंदूर का थांबवलं? ', संरक्षणमंत्र्यांनी सांगितलं नेमकं कारण )

परदेशी कटाचे ठोस पुरावे

श्रीनगरच्या डाचीगाम जंगलाजवळ चालवल्या गेलेल्या 'ऑपरेशन महादेव' या दहशतवादविरोधी कारवाईदरम्यान सुरक्षा दलांना परदेशी कटाचे ठोस पुरावे मिळाले आहेत. चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून जी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत, ती अनेक देशांशी संबंधित आहेत, ज्यामुळे या नेटवर्कच्या आंतरराष्ट्रीय कटाचे स्पष्ट संकेत मिळतात.

मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त

रोमेनियन मॉडेल 90 (AKMS) 7.62 मिमी: हे AKM रायफलचे एक अंडर-फोल्डिंग स्टॉक असलेले प्रकार आहे, जे जगभरातील अनेक बिगर-राज्य घटकांद्वारे (Non State Actors) वापरले जाते.
हायब्रीड रशियन AKM 7.62 असॉल्ट रायफल: अनेक भागांपासून तयार केलेले हे शस्त्र चालवताना लवचिकता देण्यासाठी सानुकूलित (Customized) केलेले असते.
अमेरिकन M4 कमांडो (कोल्ट मॉडेल 933, 5.56 मिमी, 1995 वेरिएंट): ही लहान नळीची कारबाईन (Short Barrel Carbine) सामान्यतः नाटो दलांद्वारे वापरली जाते आणि भारतात यापूर्वी फक्त मोठ्या स्तरावरील प्रशिक्षित दहशतवादीच तिचा वापर करताना आढळले आहेत.

( नक्की वाचा : S. Jaishankar : 193 पैकी फक्त 3 देश... परराष्ट्र मंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूर'बाबत सर्व सांगितलं )

ऑपरेशन महादेव - कधी, काय आणि कसे घडले?

  • मागील 4 दिवसांपासून दहशतवादी गटावर नजर ठेवली जात होती.
  • रात्री 2 वाजता: गटाने T82 अल्ट्रासेट कम्युनिकेशन डिव्हाइस सक्रिय केले. यामुळे दहशतवादी पथकाचे अचूक स्थान निश्चित झाले आणि त्याची पुष्टी झाली.
  • सकाळी 8 वाजता: दहशतवाद्यांचे पहिले छायाचित्र घेण्यासाठी ड्रोन लॉन्च करण्यात आले.
  • सकाळी 9:30 वाजता: राष्ट्रीय रायफल्सने घेराव घातला.
  • सकाळी 10 वाजता: पॅरा कमांडो दल महादेव टेकडीवर चढले.
  • सकाळी 10:30 वाजता: कमांडोद्वारे दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आली.
  • सकाळी 11 वाजता: पहिल्या गोळीबारात तिन्ही 3 दहशतवादी ठार झाले.
  • सकाळी 11:45 वाजता: 1 जखमी दहशतवादी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना मारला गेला.
  • दुपारी 12:30 वाजता: 2 किलोमीटरच्या परिसरात क्लिंजिंग ऑपरेशन लॉन्च करण्यात आले.
  • दुपारी 12:45 वाजता: दहशतवाद्यांच्या मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आणि त्यांची छायाचित्रे घेण्यात आली.

पाकिस्तानी सैन्यात घेतली होती कमांडो ट्रेनिंग

सुरक्षा यंत्रणांनुसार, हाशिम मूसा याने पाकिस्तानी सैन्याच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG) मध्ये पॅरा कमांडो म्हणून प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर तो लष्कर-ए-तैयबा सामील होऊन दहशतवादी कारवाया करू लागला. त्याने सप्टेंबर 2023 मध्ये भारतात प्रवेश केला आणि पुन्हा दक्षिण काश्मीरमध्ये आपले दहशतवादी अभियान सुरू केले, अशी माहिती आहे. 

गांदरबलमध्ये 7 नागरिकांच्या हत्येचाही आरोपी

22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला होता. सुरक्षा यंत्रणांनी या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून हाशिम मूसाची ओळख पटवली होती. यंत्रणांनुसार, तो किमान 6 दहशतवादी घटनांमध्ये सामील होता. मूसा हा अत्यंत प्रशिक्षित दहशतवादी होता. जंगलात राहणे आणि कठीण परिस्थितीत तग धरण्यात तो तरबेज होता.

हाशिमच्या नेतृत्वाखाली यापूर्वी ऑक्टोबर 2024 मध्ये झालेल्या हल्ल्यांमध्ये गांदरबलमध्ये 7 नागरिकांची हत्या आणि बारामुलामध्ये 4 सुरक्षा कर्मचाऱ्यांचा जीव गेला होता. एनडीटीव्हीने पहलगाम हल्ल्यानंतर सर्वात आधी लष्करचा कमांडर हाशिम मूसा उर्फ सुलेमानच्या संपूर्ण मॉड्यूलविषयी मोठा खुलासा केला होता.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com