जाहिरात

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; दहशतवादी हाशिम मूसा पाकिस्तानी पॅरा कमांडो

सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ला करण्यासाठी काही दिवसांसाठी लश्कर-ए-तैयबाकडे पाठवले. 

Pahalgam Terrorist Attack : पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; दहशतवादी हाशिम मूसा पाकिस्तानी पॅरा कमांडो
Terrorist Hashim Musa

Pahalgam Terrorist Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सहभाग नसल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचा खोटेपणा समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानाची कट कारस्थाने उघड करत आहेत. पहलगाम येथे 26 पर्यटकांच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक हाशिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराचा पॅरा कमांडो असल्याची माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या हल्ल्यासंदर्भात ताब्यात घेतलेल्या संशयितांच्या चौकशीदरम्यान हे उघड झाले. पहलगाममधील दहशतवाद्यांचे रेखाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. उर्वरित दोन दहशतवाद्यांची ओळख अली भाई आणि आदिल हुसेन ठोकर अशी झाली. हाशिम मुसा उर्फ ​​सुलेमान याचे पाकिस्तानी सैन्याशी असलेले संबंध आता उघड झाले आहेत. भारतीय तपास यंत्रणांच्या तपासातील हा एक मोठा पुरावा मानला जात आहे. हाशिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या विशेष दलांचा माजी पॅरा कमांडर असल्याचे सांगितले जाते. 

(नक्की वाचा- Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव)

सुरक्षा एजेंसियों की जांच में हाशिम मूसा के पाकिस्तानी सेना के पूर्व पैरा कमांडो होने की बात सामने आई है.

मुसाचं पाकिस्ताना कनेक्शन

एका इंग्रजी वृत्तपत्रातील वृत्तानुसार, हाशिम मुसा सध्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबाच्या सांगण्यावरून काम करणारा दहशतवादी आहे. लष्करातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुसा याला पर्यटकांवर  हल्ला करण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला पाठवले होते. सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने त्याला दहशतवादी हल्ला करण्यासाठी काही दिवसांसाठी लश्कर-ए-तैयबाकडे पाठवले. 

(नक्की वाचा - Pahalgam attack: हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानचा थरकाप, POK मधील दहशतवादी तळाची 'अशी' झाली स्थिती)

मुसाचा गंदरबल आणि बारामुल्ला हल्ल्यातही सहभाग

15 ओव्हरग्राउंड कामगारांच्या चौकशीदरम्यान हाशिम मुसा पाकिस्तानी सैन्यात असल्याची माहिती समोर आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यासोबतच मुसा ऑक्टोबर 2024 मध्ये गंदरबल आणि बारामुल्ला येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्येही सहभागी होता. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. पहलगामच्या इतर दहशतवाद्यांसह हाशिम मुसावर देखील 20 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. 

पाकिस्तानच्या आर्मीच्या परवानगीनेच मुसा हल्ल्यात सहभागी

निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांनी याबाबत म्हटलं की, ISI चा हस्तक मुसा हा पाकिस्तान आर्मीमध्ये ट्रेन झालेला आहे. अमेरिकेत जाऊन सुद्धा ट्रेनिंग घेऊन आलेला आहे. पाकिस्तानच्या आर्मीच्या परवानगीशिवाय मुसा या हल्ल्यात सहभागी होऊ शकत नाही. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग होता हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करणे भारताला  सोपे आहे. या अनुषंगाने भारत संयुक्त राष्ट्रामध्ये आपली बाजू मांडत आहे. आयएसआय नेहमी भारतीय सिमकार्ड वापरून भारतातल्या अनेकांना फोन करत असतो. पहलगाम हल्ल्यापूर्वी असे फोन पाकिस्तानातून आयएसआयने केले होते.