अरेच्चा हा भारताचा इतिहास माहितीच नव्हता! ब्रिटीश इतिहासकाराने सांगितलेल्या या गोष्टी तुम्हाला माहिती असल्याच पाहीजे

चीनचे पाश्चिमेकडील आणि आग्नेयेकडील देशांशी असलेले व्यापारी संबंध उत्तम होते आणि ज्या मार्गाने हा व्यापार चालायचा त्याला सिल्क रुट असे म्हटले जाते असे आजपर्यंत शिकवण्यात आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
नवी दिल्ली:

प्राचीन काळामध्ये भारत देश हा अत्यंत समृद्ध होता असे आपण ऐकत आलो आहोत. प्रसिद्ध इतिहासकार आणि लेखक विल्यम डॅलरिंपल (William Dalrymple)  यांनी भारताच्या गौरवशाली इतिहासावर नव्याने प्रकाशझोत टाकला. NDTV वर्ल्ड समिटमध्ये (NDTV World Summit 2024) विल्यम यांनी भारताच्या गौरवशाली इतिहासाबद्दलचे सादरीकरण केले. यामध्ये त्यांनी सांगितले की रोमचा व्यापार हा प्राचीन काळात चीनशी नाही तर प्रामुख्याने भारतासोबत होत होता.  प्राचीन काळात भारताचे अनेक देशांसोबत व्यापारी संबंध होतेच शिवाय भारतातील नालंदा विद्यापीठ हे संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र होते असे विल्यम यांनी सांगितले. 

नक्की वाचा : पीएम मोदी ब्रिक्स देशाच्या परिषदेसाठी रशियाच्या कजान दौऱ्यावर; ब्रिक्सचं महत्त्व का वाढलंय?

2273 वर्षे (250BC) ते 1200वर्षे या कालखंडावर भारताचे ठळकपणे वर्चस्व होते. विल्यम यांनी वेगवेगळी उदाहरणे देत आपले म्हणणे समजावून सांगितले. इजिप्तपासून आग्नेयेतील देशांपर्यंत भारताचे उत्तम संबंध होते. रोमन राजवटीदरम्यान भारताचा इजिप्तशी नियमित व्यापार होत होता. 6 हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या इजिप्तशी भारत व्यापार करत होता हे ऐकून अनेकांना धक्का बसतो. दुसरीकडे भारताच्या पूर्वेला हजारो किलोमीटर दूर असलेल्या अंगकोरवाटमधील मंदिरातील भारतातील पौराणिक कथांशी निगडीत शिल्पे पाहून भारताशी असलेले संबंध ठळकपणे कळण्यास मदत होते. 

नक्की वाचा : भारत -चीन संबंधांबाबत Good News, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची मोठी घोषणा

भारताचा इतिहास दडवण्यात का आला ?

विल्यम डॅलरिंपल यांनी सांगितले की भारताच्या या सुवर्णयुगाबद्दल, इतिहासाबद्दलची माहिती फारशी उपलब्ध नाहीये.   एक हजार वर्ष भारत हा आशियाई खंडात आपले वर्चस्व राखून होता. भारत देशाचा प्रचंड दबदबा होता. लॉर्ड मॅकॉलेसारख्या पाश्चिमात्य देशातील लोकांनी आपल्या स्वार्थापोटी भारताच्या इतिहासासोबत छेडछाड केली आणि पाश्चिमात्य साहित्य भारतातील साहित्यापेक्षा कसे श्रेष्ठ आहे हे सतत बिंबवण्याचा प्रयत्न केला. 

नक्की वाचा : 'दुटप्पीपणा हा सौम्य शब्द आहे,' कॅनडाच्या धोरणावर परराष्ट्रमंत्र्यांची टीका

सिल्क रुटची संकल्पना खोटी ?

चीनचे पाश्चिमेकडील आणि आग्नेयेकडील देशांशी असलेले व्यापारी संबंध उत्तम होते आणि ज्या मार्गाने हा व्यापार चालायचा त्याला सिल्क रुट असे म्हटले जाते असे आजपर्यंत शिकवण्यात आले आहे. विल्यम यांनी मात्र ही बाब खोटी असल्याचे म्हटले आहे.  आपला तर्क मांडण्यासाठी विल्यम यांनी ऑक्सफोर्डचा एक नकाशा दाखवला आहे. या नकाशामध्ये रोमन काळातील नाणी जिथे सापडली ते देश दर्शवण्यात आले आहेत. या नकाशामध्ये रोमन नाणी सर्वाधिक युरोपात सापडल्याचे दिसते. बहुतांश युरोपात रोमन साम्राज्य पसरलेले होते. त्यानंतर रोमन नाणी ही सर्वाधिक भारतामध्ये मिळाल्याचं या नकाशात दिसतं. अफगाणिस्तानपासून दक्षिण भारतापर्यंत ही नाणी मिळाल्याचे दिसते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास रोमचा व्यापार हा चीनशी नाही तर भारताशी होता हे विल्यम यांनी ठसठशीतपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

नक्की वाचा :PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत?

विल्यम यांनी इतिहासकार प्लिनी यांचा हवाला देताना म्हटले आहे की रोम आणि भारतामध्ये सोन्याचा व्यापार होत होता. रोमन साम्राज्याला भारताच्या पश्चिमी किनाऱ्यावरील अनेक बंदरे माहिती होती, ज्यात आजच्या कल्याण, ठाणे, चौलचाही समावेश होता. विल्यम यांनी आपला तर्क अधिक बळकट करणारा आणकी एक पुरावा सादर केला. 'मुजिरियस पपायरस' हा एक अतिप्राचीन दस्तावेज संशोधकांना सापडला होता. हा दस्तावेज म्हणजे आपण वस्तू खरेदी करताना जसे बिल बनवतो तसे बिल आहे. भारतातील व्यापाऱ्याने अलेक्झांड्रियातील व्यापाऱ्याला सामान पाठवले होते. 10टन सामान अलेक्झांड्रियाला समुद्री मार्गाने पाठवण्यात येत होते.  ज्यात हस्तीदंत, मिरी आणि अन्य गोष्टींचा समावेश होता.