जाहिरात

NDTV World Summit : भारत -चीन संबंधांबाबत Good News, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची मोठी घोषणा

NDTV World Summit 2024 : भारत-चीन संबंधाबाबत दिलासा देणारी घोषणा केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे.

NDTV World Summit : भारत -चीन संबंधांबाबत Good News, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची मोठी घोषणा
नवी दिल्ली:

NDTV World Summit 2024 : भारत आणि चीन या आशिया खंडातील दोन बड्या देशांमधील तणाव हा जगाच्या काळजीचा विषय आहे. विशेषत: 2020 साली डोकलाममध्ये भारत आणि चीनचे सैन्य आमने-सामने आल्यानंतर दोन्ही देशांमधाल तणाव शिगेला पोहोचला होता. आशिया खंडातील शेजारी देशांच्या संबंधाबाबत दिलासा देणारी घोषणा केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. नवी दिल्लीमधील NDTV वर्ल्ड समिट 2024 मध्ये बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

2020 पूर्वीची परिस्थिती बहाल

पेट्रोलिंगवरून भारत आणि चीन यांच्यात सहकार्य झाले आहे. यामुळे 2020 पूर्वी जशी परिस्थिती होती, तशी पुन्हा निर्माण झाली आहे. देपसांगशिवाय अन्य काही भाग आहे जिथे भारतीय सैनिकही आता गस्त घालू शकतील जसे 2020 पूर्वी घालत होते. ही एक सकारात्मक आणि चांगली घडामोड आहे. यासाठी सातत्याने आणि चिकाटीने पाठपुरावा करण्यात आला होता, असं परराष्ट्र मंत्र्यांनी NDTV वर्ल्ड समिटमध्ये बोलताना जाहीर केलं. 

अशा घडामोडींमुळे शांतता नांदण्यास मदत होते. कारण ही शांतता प्रस्थापित झाली नाही तर दोन देशातील संबंध सुधारतील याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. भारत आणि चीन सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि सांस्कृतिक वारसा असलेले देश आहेत. भारत आणि चीन या दोन देशांचे महत्त्वही अधिक आहे. चीन शेजारी देश असून आपला त्यांच्याशी सीमावाद आहे. दोन्ही देश वाढतायत. दोन शेजाऱ्यांनी वेगाने वाढत असताना मुत्सद्देगिरीची गरज आहे. दोन्ही देशांना अधिकाधिक प्रभावी व्हायचे आहे.

NDTV World Summit : 'दुटप्पीपणा हा सौम्य शब्द आहे,' कॅनडाच्या धोरणावर परराष्ट्रमंत्र्यांची टीका

( नक्की वाचा : NDTV World Summit : 'दुटप्पीपणा हा सौम्य शब्द आहे,' कॅनडाच्या धोरणावर परराष्ट्रमंत्र्यांची टीका )

भारत आणि अमेरिकेचे संबंध सातत्याने सुधारत गेल्याचे बघायला मिळत आहेत. खासकरून गेल्या 10 वर्षांत. वैचारीक अडथळे होते दूर करून भारत आत्मविश्वासाने भारत पुढे सरसावला आहे. अमेरिका आणि चीनमध्ये वितुष्ट आहे. ते पाहाता भारताने आपल्या भल्याच्या दृष्टीने निर्णय घेतले, असं परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

कॅनडाबाबत काय घडलं?

भारत-कॅनडामध्ये सध्या चिघळलेल्या परिस्थितीचंही जयशंकर यांनी विश्लेषण केलं. . जगातिक समीकरणं बदलत आहेत. आता गैर पश्चिमी देशाचा बोलबाला आहे. कॅनडाला हे स्वीकार करण्यास वेळ लागत आहे, जगातील शक्तीचं संतुलन बदलत आहे. पाश्चिमात्य देशांना हे समजायला वेळ लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com