जाहिरात

पीएम मोदी ब्रिक्स देशाच्या परिषदेसाठी रशियाच्या कजान दौऱ्यावर; ब्रिक्सचं महत्त्व का वाढलंय?

जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला महत्त्व आलं आहे.

पीएम मोदी ब्रिक्स देशाच्या परिषदेसाठी रशियाच्या कजान दौऱ्यावर; ब्रिक्सचं महत्त्व का वाढलंय?
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स देशाच्या परिषदेसाठी रशियाच्या कजान दौऱ्यावर आहेत. चीनचे राष्ट्रपती जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता आहे. जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याला महत्त्व आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाशी द्विपक्षीय चर्चा करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रशियाचे राष्ट्रपती व्लादमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत. 

ब्रिक्स नक्की काय आहे?
2006 मध्ये ब्राझिल, रशिया, भारत आणि चीन या देशांनी एकत्र येऊन 'ब्रिक' नावाचं संघटन तयार केले. या संघटनेमध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश झाल्यानंतर 2010 साली या संघटनेचे नाव 'ब्रिक्स' असं झालं. इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरात (UAE) यांचाही ब्रिक्स देशांच्या संघटनेत समावेश करण्यात आला आहे. ब्रिक्स देश वार्षिक शिखर परिषदेत आपल्या योजना बनवतात. या देशाचे सदस्य क्रमाने आपले अध्यक्ष बदलतात.

NDTV World Summit : भारत -चीन संबंधांबाबत Good News, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची मोठी घोषणा

नक्की वाचा - NDTV World Summit : भारत -चीन संबंधांबाबत Good News, परराष्ट्रमंत्री जयशंकर यांची मोठी घोषणा

ब्रिक्स संघटनेचं महत्त्व का वाढलं आहे?
ब्रिक्स देशांच्या संघटनेत चीन आणि रशिया, तसंच त्या त्या खंडातील शक्तिशाली असणाऱ्या दक्षिण आफ्रिका, ब्राझिल अशा देशांचा समावेश आहे. नव्यानं देश सहभागी झाल्यानं संघटनेची एकत्रित लोकसंख्या 3.5 अब्ज इतकी झाली आहे म्हणजेच जगाच्या लोकसंख्येच्या 45 टक्के इतकी आहे. या सर्व देशांची एकत्रित अर्थव्यवस्था ही 28.5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत 28% इतकी आहे. ब्रिक्स देशांचा कच्चा तेलाच्या उत्पादनाचा भाग 44% इतका आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com