NDTV World Summit : ' माझ्या आवाजात मोठ्या रकमेची मागणी झाली,' सुनील मित्तल यांनी सांगितला तो किस्सा

NDTV World Summit 2024 : भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांनी त्यांच्या आवाजात आलेल्या स्पॅम कॉलचा अनुभव सांगितला.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

NDTV वर्ल्ड समिट : जगभरातील घडामोडींचा वेध घेणारं NDTV वर्ल्ड हे नवं कोरं चॅनल सोमवारी (21 ऑक्टोबर 2024) लॉन्च झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हे चॅनल लॉन्च केलं. यावेळी पंतप्रधान यांनी 'भारताचं शतक' या विषयावर त्यांची भूमिका जगासमोर मांडली. पंतप्रधानांसह जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती NDTV वर्ल्ड समिटमध्ये त्यांचे अनुभव मांडत आहेत. भारती एअरटेलचे संस्थापक सुनील भारती मित्तल (Sunil Bharti Mittal) यांनी या सबमिटमध्ये त्यांची भूमिका मांडली. जगभरातील सर्वांना भेडसवणाऱ्या स्पॅम कॉलची समस्येवरील उत्तर सांगितलं. त्याचवेळी त्यांच्या आवाजात आलेल्या स्पॅम कॉलचा अनुभव सांगितला. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

स्पॅम कॉल्सच्या निराकरणाचा प्रयत्न

स्पॅम कॉल्समुळे ग्राहकांची छळवणूक होते, याचा खूप त्रास झाला आहे. एअरटेलमध्ये आम्ही या समस्येच्या निकाकरणासाठी प्रयत्न सुरू केले. AI, मशिन लर्निंगच्या सहाय्याने आम्ही ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ग्राहकांना आलेला कॉल हा स्पॅक कॉल आहे, हे समजू लागलं. त्यामुळे त्यांचा त्रास कमी झाला, असं मित्तल यांनी सांगितलं. 

'माझ्या आवाजात मोठ्या रकमेची मागणी'

सुनील मित्तल यांनी यावेळी बोलताना AI च्या वाढत्या गैरवापरबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर यामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचाही उल्लेख केला. माझ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन आला होता आणि समोरच्याने माझ्या आवाजात त्याच्याकडे मोठ्या रकमेची मागणी केली. ती ऑडियो रेकॉर्डींग ऐकल्यानंतर मी देखील आश्चर्यचकीत झालो होतो, असा अनुभव मित्तल यांनी सांगितला. 

( नक्की वाचा : NDTV World Summit : 'तुम्ही इतकी धावपळ का करता?' PM मोदींनी दिलं अनेकांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर )

एआयमुळे प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या अनेक नोकऱ्या गायब झालेल्या असतील. मात्र नव्या विचार, कल्पनांमुळे रोजगाराच्या नव्या संधी , उद्योग उदयास येतील असा माझा विश्वास आहे, असं त्यांनी सांगितलं. 

अमेरिकेतील मित्रांनी सांगितले की ते इंटरनेटवर 100 डॉलर महिना खर्च करतात. अमेरिकेतील सेवा भारतापेक्षा वाईट आहे. भारतात महिना अडीच डॉलरमध्ये 60 गीगाबाईट मिळतात. भारत युके, युरोप, युएसपेक्षा सरस आहोत. मात्र आपण जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियाच्या मागे आहोत या  देशात मोबाईल कनेक्टिव्हिटीचा दर्जा उत्तम आहे. 

( नक्की वाचा : NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन )

चीनच्या गुंतवणुकीच्या तुलनेत भारताच्या गुंतवणुकीचे स्वागत केले जाते. आखाती देशातील गुंतवणुकीबाबत सावध दृष्टीकोण अवलंबला जातो. पाश्चिमात्य देशांना भारतातील खासगी गुंतवणुकीची आशा आहे. जीएमआर, अदाणी, गोदरेज, बजाज, हिरो मोटर्स हे इतर देशात आपला विस्तार करत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.