जाहिरात

NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन

NDTV World Summit 2024 : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे, असा विश्वास पंतप्रधांनानी यावेळी व्यक्त केला.

NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन
नवी दिल्ली:

NDTV वर्ल्ड समिट 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Narendra Modi) सोमवारी एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2024 (NDTV World Summit 2024) या विशेष कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी यावेळी बोलताना देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. 140 कोटी लोकंसंख्येच्या क्षमतेची जाणीव करुन देत असतानाच त्यांनी या शतकातील भारताचं व्हिजन देखील मांडलं. भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे, असा विश्वास पंतप्रधांनानी यावेळी व्यक्त केला.

तंत्रज्ञान सशक्त बनविण्याचं साधन - PM Modi

 नवे डिजिटल  उपक्रम आणि लोकशाही मूल्यांना एकत्रित आणता येतं, भारतानं दाखवून दिलं आहे. . तंत्रज्ञान सर्वसमावेश, पारदर्शक आणि सशक्त बनवण्यासाठीचे साधन आहे, कोणाला नियंत्रित करण्यासाठी किंवा विभाजनासाठीचे साधन नाही, असं पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं.

स्थैर्य आणि शाश्वततेप्रमाणेच भारत देश उपायांवरही लक्ष्य केंद्रीत करत आहे. गेल्या दशकात भारताने अशा अनेक उपायांवर काम केले आहे जे जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी गरजेचे आहे.भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा होईल, भारताचे शतक हे संपूर्ण मानवतेच्या विजयाचे शतक ठरावे, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

NDTV World Summit : PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत?

( नक्की वाचा : NDTV World Summit : PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत? )

कठीण काळात भारत जगाच्या कामी आला - PM Modi

आज जागतिक भविष्याला दिशा देण्यात भारताचा पुढाकार आहे. संकट काळात भारताची मदत होते, याचा जगाला विश्वास वाटतो. कोरोना काळात लसींमधून आपण कोट्यवधी कमावू शकलो असतो. याचा भारताला फायदाही झाला असता, मात्र माणुसकी मेली असती. हे आमचे संस्कार नाहीत. संकटात सापडलेल्या देशांना आपण जीवनरक्षक लस पोहोचवली, औषधं दिली. कठीण काळात भारत जगाच्या कामी येऊ शकला याचं मला समाधान आहे. 

एक युग जे सगळ्यांच्या कौशल्याच्या आधारे मार्गक्रमण करेल. एक युग जे सगळ्यांच्या नावीन्यतेने समृद्ध असेल. एक असे युग जिथे गरिबी नसेल, एक असे युग असेल जिथे सगळ्यांना पुढे जाण्याची समान संधी असेल, एक असे युग ज्यात भारताच्या प्रयत्नांमुळे जगात स्थिरता आणि शांतता नांदेल, असं नव्या भारताचं व्हिजन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मांडलं. 

भारताच्या प्रगतीचा जगाला आनंद - PM Modi 

जगाने चांद्रयान मोहीमचे यश साजरं केलं. भारताचा विकास झाला की जगाला आनंद वाटतो. भारताच्या विकासाचा जगाला फायदा होईल. भारताच्या प्रगतीमुळे द्वेषाची भावना तयार होत नाही, कारण भारताच्या प्रगतीमुळे जगाला फायदा होईल.

भारताने गुलामीचा काळ बघितला. औद्योगिक क्रांतीच्यावेळीही भारत गुलामीत होता. औद्योगिक क्रांतीचा भारत तेव्हा फायदा उचलू शकला नाही.  तो काळ भारताच्या हातून निघून गेला. मात्र आता भारताचे युग आहे. भारत हा गुलाम नाही, भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाली आहेत त्यामुळे भारत कंबर कसून सज्ज झाला आहे, असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. 


 

Previous Article
NDTV World Summit : PM मोदींनी मांडलं 125 दिवसांचं प्रगतीपुस्तक, वाचा मोदी 3.0 मध्ये कसा बदलला भारत?
NDTV World Summit : भारताच्या प्रगतीचा जगाला फायदा, PM मोदींनी मांडलं नव्या भारताचं व्हिजन
NDTV world summit PM narendra modi speech on Artificial Intelligence and Aspirational India
Next Article
NDTV World Summit : भारताकडे दोन AI ची ताकद, पंतप्रधान मोदींनी सांगितला महत्त्वाकांक्षी भारताचा अजेंडा