नवी दिल्ली:
नवी दिल्ली: NDTV वर्ल्ड समिट 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी NDTV वर्ल्ड समिटमध्ये बोलताना भारत हा जगासाठी आशेचा किरण आहे, असं सांगितलं. अर्थव्यवस्थेची घसरण, बेरोजगारी, हवामानातील बदल यासह वेगवेगळ्या जागतिक संकटामध्ये भारताबाद्दल जगाला आशा वाटते, असं त्यांनी स्पष्ट केलं
NDTV वर्ल्ड समिटमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाची वक्तव्य
- आपण गेल्या चार-पाच वर्षांमधील जगातील चर्चा पाहिली तर भविष्याबद्दलची काळजी ही गोष्ट सर्वत्र समान आढळलते. कोव्हिडच्या संकटात अर्थव्यवस्थेवर ताण होता. बेरोजगारी आणि आरोग्य हे जगासमोरचे प्रश्न होते.
- भारतामध्ये आपण 'भारताचे शतक' या विषयावर चर्चा करत आहोत. जगभरातील संकटाच्या कालखंडामध्ये भारत हा जगासाठी आशेचा किरण आहे. वेगवेगळ्या काळजीनं ग्रस्त असलेल्या जगाला आशा देणारा भारत प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व प्रमाणात आणि वेगाने काम करत आहे. भारतासमोरही आव्हानं आहेत. पण, आमच्याकडं सकारात्मक वातावरण आहे. त्यामुळेच आपण 'भारताचं शतक' या विषयावर चर्चा करत आहोत. भारताची गती आणि क्षमता अभूतपूर्व आहे.
- आमच्या सरकारनं तिसऱ्या कार्यकाळातील 125 दिवस पूर्ण केले आहेत. या 125 दिवसांमध्ये 3 कोटी गरिब लोकांसाठी पक्की घरं बांधण्याचं काम केलं आहे. 9 लाख कोटींच्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरु झाले आहेत. 15 वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ झाला आहे. 8 नव्या विमानतळ सुरु झाली आहेत. तरुणांसाठी 2 लाख कोटींचं पॅकेज जाहीर झालंय. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांसाठी आरोग्य विमा योजना जाहीर झाली आहे. हे सर्व फक्त 125 दिवसांमध्ये घडलंय.
- आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील कामांची गतीपाहून अनेक संस्थांनी भारताच्या विकासाचा अंदाज सुधारित केला आहे. 125 दिवसांमध्ये आम्ही 12 नव्या प्रकल्पांना मान्यता दिलीय. BSE नं 7 टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केलाय.
- भारतामध्ये खूप काही घडत आहे. आमच्या तिसऱ्या कार्यकाळात भारतानं विकासाची गती पकडली आहे. आमचे सरकार वेगानं निर्णय घेत आहे. त्याचबरोबर सुधारणा करत आहे. मी अनेकांना भेटतो. त्यावेळी ते, 'भारत इतकं चांगलं काम करत असतानाही तुम्ही धावपळ का करता? असा प्रश्न विचारतात.' त्यांना माझं एकच उत्तर असतं ,'आमची स्वप्न आणि उद्दीष्टांचा विचार केला तर, आम्हाला विश्रांती घेणं शक्य नाही.'
- गेल्या दहा वर्षात 12 कोटी शौचालयं बांधली गेली आहेत. 16 कोटी लोकांना गॅस कनेक्शन दिलं आहे. हे पुरेसं आहे का? माझं उत्तर आहे, नाही. हे पुरेसं नाही. भारत हा तरुणांचा देश आहे. आपल्या देशासाठी खूप काही करण्याची गरज आहे. भारताच्या व्हिजनमध्ये आता बदल झाला आहे.
- प्रत्येक सरकार आपल्या कामाची तुलना मागील सरकारशी करते, ही परंपरा आहे. आपण आजवर याच वाटेनं चालत होतो. आता आपण भूतकाळ आणि वर्तमानाची तुलना करु शकत नाही. त्यामध्ये समाधानी राहू शकत नाही.
- जगाचं वर्तमान आणि भविष्य AIशी जोडलं गेलं आहे. भारताकडे दोन AI पॉवर आहेत. दुसरं AI म्हणजे Aspirational India अर्थात महत्त्वाकांक्षी भारत. Artificial Intelligence आणि Aspirational India ची ताकद एकत्र आल्यावर विकासाची गती वाढणे स्वाभाविक आहे. आमच्यासाठी AI फक्त एक तंत्रज्ञान नाही तर भारतातील तरुणांसाठी संधीची कवाडं आहेत. याच वर्षी भारताने इंडिया AI मिशन सुरू केलं आहे.
- जगानं चांद्रयान मोहिमेचं यश साजरं केलं. भारताचा विकास झाला की जग आनंदी होतं. भारताच्या विकालाचा जगाला फायदा होतो. भारताने भूतकाळात जगाचा विकास घडवून आणला पण वसाहतवादाच्या काळात आपण ते करू शकलो नाही. आता, आम्ही स्वतंत्र आहोत आणि विकासाला चालना देण्यासाठी सज्ज आहोत.
- मी पॉल रोमर यांना अनेकदा भेटलो आहे. त्यांनी भारतातील डिजिटल पायाभूत सुविधांचं कौतुक केलं आहे. भारताचा DPI पाहून जग थक्क झाले आहे. आम्हाला फर्स्ट मूव्हरचा फायदा नव्हता. आम्ही तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले आहे. DPI ला एक नवीन मार्ग दिला. डिजिटल इनोव्हेशन आणि लोकशाही एकत्र राहू शकतात हे भारताने जगाला दाखवून दिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world