
NEET PG 2025 Result : NBEMS (नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनल इन मेडिकल सायन्स) ने NEET PG परीक्षा 2025 चा निकाल जाहीर केला आहे.तुम्ही ही परीक्षा दिली असेल, तर तुम्ही natboard.edu.in या अधिकृत वेबसाइटवर तुमचा स्कोअरकार्ड तपासू शकता.
या वर्षी NEET PG 2025 परीक्षा 3 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12:30 या वेळेत एकाच शिफ्टमध्ये घेण्यात आली होती.
या प्रवेश परीक्षेचे निकाल वैद्यकीय पदवीधरांना एमडी (MD), एमएस (MS), डीएनबी (DNB), डॉएनबी (DrNB - ६ वर्षांचे थेट अभ्यासक्रम) आणि पीजी डिप्लोमा (PG Diploma) यांसारख्या उच्च पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळवून देतात. मर्यादित जागांसाठी हजारो विद्यार्थी स्पर्धा करत असल्यामुळे, निकालांची घोषणा त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
( नक्की वाचा : Sangli News : लग्नानंतर तब्बल 21 वर्षांनी झाला मुलगा, कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्यात सोडला... कारण काय? )
NEET PG 2025 चा निकाल कुठे तपासणार?
उमेदवार आता त्यांचे वैयक्तिक निकाल आणि एकूण रँक थेट NBEMS च्या अधिकृत वेबसाइट natboard.edu.in वर तपासू शकतात. निकालांमध्ये 800 पैकी मिळालेले मार्क्स आणि NEET PG २०२५ रँक यांचा समावेश असतो, जे त्यांची मेरिट लिस्ट ठरवते.
श्रेणीनुसार कट-ऑफ मार्क्स काय आहेत?
NBEMS ने माहितीपत्रकात स्पष्ट केलेल्या पर्सेंटाइल निकषांवर आधारित, वेगवेगळे श्रेणींसाठी अधिकृत कट-ऑफ गुण जाहीर केले आहेत:
- जनरल (General)/ईडब्ल्यूएस (EWS): 50 वा पर्सेंटाइल (276 मार्क्स)
- जनरल पीडब्ल्यूबीडी (General PwBD): 45 वा पर्सेंटाइल (255 मार्क्स)
- एससी (SC)/एसटी (ST)/ओबीसी (OBC) (पीडब्ल्यूबीडी (PwBD) सह): 40 वा पर्सेंटाइल (235 मार्क्स)
निकाल कसा चेक करणार?
सर्वात आधी अधिकृत वेबसाइट natboard.edu.in ला भेट द्या.
त्यानंतर वेब पेजवर NEET-PG लिंक निवडा.
मग तुम्हाला निकालाच्या PDF फाईलवर क्लिक करावे लागेल.
क्लिक करताच, PDF तुमच्या स्क्रीनवर उघडेल.
आता तुम्ही तुमचा रोल नंबर त्यामध्ये तपासून तुमचा स्कोअर पाहू शकता.
तुम्ही PDF डाउनलोड करून त्याची प्रिंट देखील काढू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world