NEET-UG 2024 प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाने सांगितलं की, NEET-UG 2024 च्या पेपरमध्ये कोणतेही 'सिस्टीमॅटिक ब्रीच' म्हणजे पद्धतशीरपणे उल्लंघन झालेलं नाही. म्हणजेच पेपर लीक व्यापक प्रमाणात झालेला नाही. पेपर लीक फक्त पाटणा आणि हजारीबाग पुरतां मर्यादित होता. मात्र एनटीएने यापुढे काळजी घ्यायला हवी, असाही निष्कर्ष कोर्टाने नोंदवला.
नीट प्रकरणातील पेपर फुटीवरून देशभरातील विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त केला जात होता. अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या प्रकरणावरुन सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
नक्की वाचा - SC/ST मध्ये 'कोटा' अंतर्गत 'कोटा', सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचा अर्थ काय?
नीटमधील पेपर फुटीप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, आम्ही नीटच्या पुर्नपरिक्षेच्या मागणीला फेटाळतो आहे. या वर्षी जी गडबड झाली त्यावर केंद्र सरकारनं विचार केला पाहिजे. यापुढे अशा घटना व्हायला नको. संपूर्ण परीक्षा पद्धतीत कोणताही बिघाड नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. कोर्टाने कमिटीचा अहवाल तयार करण्यासाठी 30 सप्टेंबर 2024 चा कालावधी निश्चित केला आहे.