Heart Attack VIDEO: नाचता नाचता कोसळली, नवऱ्यासमोरच नवविवाहितेने सोडला जीव; मन सुन्न करणारा व्हिडीओ

Heart Attack VIDEO: सोनम अचानक कोसळल्यामुळे काही क्षणांसाठी लोकांना काहीच समजले नाही. त्यानंतर जेव्हा तिचा पती तिला उचलण्यासाठी धावला, तेव्हापर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Heart Attack Video: देवीचा जागर करताना नवऱ्यासमोरची बायकोचा जीव गेल्याची घटना मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात घडली आहे. गरबा नृत्यादरम्यान नवविवाहित महिलेचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही महिला तिच्या पतीसोबत 'मेरे ढोलना' या गाण्यावर डान्स करत असताना अचानक खाली कोसळली आणि तिने या जगाचा निरोप घेतला.

19 वर्षीय सोनम ही तिच्या पतीसह कृष्णपाल गावातील सिंगाजी मंदिराच्या जवळील दुर्गा पंडालमध्ये दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. भक्तीमय वातावरणात सोनमने डोक्यावर पदर घेऊन 'मेरे ढोलना' या गीतावर नृत्य करायला सुरुवात केली. तिचा पती कृष्णपालदेखील तिच्यासोबत नाचू लागला. मात्र सोनम नाचता नाचता अचानक खाली कोसळली.

पाहा VIDEO

सोनम अचानक कोसळल्यामुळे काही क्षणांसाठी लोकांना काहीच समजले नाही. त्यानंतर जेव्हा तिचा पती तिला उचलण्यासाठी धावला, तेव्हापर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती. हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

5 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

सोनमचे काही महिन्यांपूर्वीच 1 मे रोजी कृष्णपाल याच्याशी लग्न झाले होते. नवविवाहित वधूच्या रूपात ती देवीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आली होती. या घटनेनंतर कुटुंबीयांनी गावातीलच एका डॉक्टरकडून सोनमची तपासणी करून घेतली, ज्यांनी तिला मृत घोषित केले. सोमवारी सकाळीच तिच्यावर अंत्यसंस्कार केले. सणासुदीच्या उत्साहाच्या वातावरणात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement
Topics mentioned in this article