Toll Charges Hike: सर्वसामान्यांच्या खिशावर ताण, निवडणुका संपताच टोल दरात मोठी वाढ

New Toll Tax Rate List: एक्स्प्रेस-वेचा वापर करणाऱ्या प्रवाशांना 3 जूनपासून अधिकचा टोल टॅक्स भरावा लागणार आहे.  

Advertisement
Read Time: 2 mins

Toll Charges Hike: निवडणुका संपताच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे दिसत आहे. कारण अमूल दूध दरवाढीसह आता महामार्गांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना सोमवारपासून (3 जून) अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरातील टोल दरामध्ये सरासरी पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सोमवारपासून (3 जून) प्रवासाकरिता महामार्गांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महामार्ग वापरकर्ता शुल्कातील वार्षिक सुधारणा यापूर्वी 1 एप्रिलपासून लागू होणार होती. पण लोकसभा निवडणुकीमुळे ही टोल दरवाढ पुढे ढकलण्यात आली. वार्षिक सुधारणा सरासरी पाच टक्क्यांच्या श्रेणीमध्ये असण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा: Amul Milk Price Hike: देशभरात अमूल दूध आजपासून महागले, जाणून घ्या नवे दर)

"नवीन वापरकर्ता शुल्क 3 जून 2024 पासून लागू होईल,"अशी माहिती NHAIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने रविवारी (2 जून) सांगितली. टोल शुल्कातील हा बदल घाऊक किंमत निर्देशांक (CPI) आधारित चलनवाढीच्या बदलांशी संबंधित दरांतील सुधारणेच्या वार्षिक प्रक्रियेचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रीय महामार्ग नेटवर्कवर सुमारे 855 टोल प्लाझा आहेत. येथे राष्ट्रीय महामार्ग शुल्क  नियम, 2008 नुसार प्रवाशांकडून शुल्क आकारले जाते.

(नक्की वाचा: टेन्शन विसरा, फॉलो करा Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स)

VIDEO:निवडणुका संपल्या, सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार...टोल आणि अमूल दुधाच्या दरांमध्ये वाढ

Topics mentioned in this article