जाहिरात

टेन्शन विसरा, फॉलो करा Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स

How To Save Income Tax : इन्कम टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टेन्शन विसरा,  फॉलो करा  Income टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स
मुंबई:

नवीन आर्थिक वर्ष 2024-25 सुरु झालं आहे. आर्थिक वर्ष सुरु होताच इन्कम टॅक्स वाचवण्यासाठी सर्वांचं प्लॅनिंग सुरु होतं. वर्षाच्या सुरुवातीलाच योग्य नियोजन केलं नाही तर तुम्हाला मोठा कर भरावा लागू शकतो. इन्कम टॅक्स वाचवण्याच्या टॉप 10 टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या टिप्सचा वापर करुन Old Income Tax Regime नुसार ITR फाईल करणाऱ्या व्यक्तींचा कर वाचणार आहे.

1. सेक्शन 80 C नुसार सेव्हिंग करा. त्यामध्ये PF, PPF, LIC, पेन्शन फंड, NSC, ULIP, ट्यूशन फिस, ELSS, सूकन्या समृद्धी योजना यामध्ये गुंतवणूक करुन एकूण 1,50,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
2. NPS खातं सुरु करा - यामध्ये गुंतवणूक केल्यास 50,000 रुपयांपर्यंत सूट (सेक्शन 80CCD1B) मिळेल. त्याचबरोबर रिटायरमेंटनंतर पेन्शनचं सुख देखील मिळेल.
3. सेक्शन 80 TTA - बँकामधील बचत खात्यात जमा असलेल्या रकमेवरील व्याजावर कर लागतो. पण, 80 TTA नुसार 10,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळू शकते.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

4. होम लोनवरील व्याज - होम लोनच्या EMI वरील व्याजावर वार्षिक 2,00,000 रुपयांपर्यंत वार्षिक सूट मिळू शकते.
5. हेल्थ इन्श्युरन्स प्रीमियम - तुमचा जोडीदार तसंच तुमच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसीच्या प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.
6. 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आई-वडिलांच्या प्रीमियमवर 50,000 रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.
7. 80 DD नुसार सूट - दुर्दैवानं तुमच्यावर अवलंबून असलेली एखादी व्यक्ती दिव्यांग असेल तर त्याच्यावर केलेल्या खर्चामध्ये 75,000 ते 1,25,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.  80 DDB नुसार सूट - तुमच्यावर अवंलबून असलेल्या व्यक्तीचा आजार आणि त्यावरील विशेष उपचारासाठी केलेल्या खर्चावर 40,000 ते 1, 00,000 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते.

( नक्की वाचा : तुमचा मुलगा 25 व्या वर्षी होईल कोट्यधीश, 'या' पद्धतीनं करा बचतीला सुरुवात )

8. शैक्षणिक कर्जावर सूट - सेक्शन 80 E नुसार शैक्षणिक कर्ज फेडण्यासाठी देण्यात आलेल्या व्याजावर कर लागत नाही. या सेक्शननुसार चुकवण्यात आलेलं सर्व व्याज हे टॅक्स फ्री मानलं जातं.
9. योग्य टॅक्स पर्याय निवडा - गेल्या काही वर्षांपासून इन्कम टॅक्स मोजण्यासाठी आणि तो चुकवण्यासाठी दोन पद्धती आहेत. Old Tax Regime आणि New Tax Regime नुसार तुम्ही कर भरु शकता. जुन्या पद्धतीनुसार वरील सर्व पर्यांयाचा वापर करुन तुम्ही कर बचत करु शकता. पण, त्यामध्ये टॅक्स स्लॅब म्हणजेच इन्कम टॅक्सचा दर थोडा जास्त असतो. नव्या पद्धतीनुसार फार सवलती नाहीत. पण टॅक्सचे दर कमी आहेत. ते तुम्ही व्यवस्थित हिशेब करुन निश्चित करु शकता.

( नक्की वाचा : सर्वसामान्यांचं घराचं स्वप्न स्वप्नच राहणार?; पहिल्या तिमाहीतील टेन्शन वाढवणारी आकडेवारी )

10. वेळेवर इन्कम टॅक्स भरा - 31 मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्याचवर्षी 31 जुलैपर्यंत ITR भरावा लागतो. त्याचं भान ठेवा. नियोजित वेळेपेक्षा उशीरा टॅक्स भरला तर तुम्हाला दंड लागू शकतो. त्यामुळे 31 जुलैपर्यंत ITR नक्की भरा.

(स्पष्टीकरण - यामधील सर्व माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमचे कर सल्लागार तसंच संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.  NDTV नेटवर्क यामधून होणाऱ्या कोणत्याही परिणामांना जबाबदार नाही.)
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com