देशातील एका प्रसिद्ध शहरात मांसाहार विक्रीच्या दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे. या शहरातील सर्व मीट-मांस आणि मासे विक्री करणाऱ्या दुकानांना शहराच्या सीमेबाहेर स्थलांतरित करण्याच्या योजनेला मंजूरी देण्यात आली आहे. टाऊनहॉलमध्ये आयोजित सदनातील बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे.
शहराच्या सीमेबाहेर आधुनिक मीट आणि मासे बाजार...
वाराणसीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या योजनेअंतर्गत शहराच्या सीमेबाहेर मीट मार्केट विकसित करण्यात येणार आहे. येथे मीट, मांस आणि मासे विक्रीच्या दुकानांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात रामनगर, सूजाबाद, गणेशपूर, अवलेशपूर आणि शिवपूर भागांना चिन्हांकित करण्यात आलं आहे. या ठिकाणांवर आधुनिक सुविधांनीयुक्त मांसाहारी बाजार विकसित करण्यात येतील.
स्वच्छता आणि व्यवस्था सुधारण्यासाठी घेतला निर्णय...
पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये स्वच्छता ठेवणं सोपं जाईल. सोबतच मीट व्यावसायिकांनाही एक व्यवस्थित आणि सुविधाजनक बाजार उपलब्ध करून दिला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world