जाहिरात

एका दिवसात भारतीय किती किलो नॉनव्हेज खातात? भारत की पाकिस्तान सर्वाधिक मांस कुठे खाल्लं जातं? 

दक्षिण आशियातील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात मोठ्या संख्येने मांसाहार करतात. दोन्ही देशाच्या जेवणाच्या पद्धती आणि परंपरांवर मांस सेवनाचा परिणाम स्पष्टपणे पाहायला मिळतो.

एका दिवसात भारतीय किती किलो नॉनव्हेज खातात? भारत की पाकिस्तान सर्वाधिक मांस कुठे खाल्लं जातं? 

Meat Consumption in India : दक्षिण आशियातील भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात मोठ्या संख्येने मांसाहार करतात. दोन्ही देशाच्या जेवणाच्या पद्धती आणि परंपरांवर मांस सेवनाचा परिणाम स्पष्टपणे पाहायला मिळतो. अशात एक प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जातो तो म्हणजे भारत की पाकिस्तान सर्वाधिक मांस कुठे खाल्लं जातं? 


भारतात मांसाहार करणाऱ्यांची संख्या वाढली...

भारतात मांसाहार करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. राष्ट्रीय कुटुंब स्वास्थ सर्व्हेक्षणानुसार, १५ ते ४९ वर्षांतील साधारण ८० टक्के भारतीय कोणत्या ना कोणत्या पद्धतीत पशू आधारित प्रोटीनचं सेवन करतात. यामध्ये अंड, मासे, चिकन आणि दुसऱ्या मांसाचा समावेश आहे. २००६ मध्ये हा आकडा तब्बल ७४ टक्के होता, जो २०२१ मध्ये वाढून ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला. सर्व्हेक्षणानुसार, १० पैकी एक व्यक्ती दररोज कोणत्या ना कोणत्या प्रकाराचं मांस किंवा मांसाहारी जेवण करतात. तर ६० टक्के लोक आठवड्यात एक किंवा त्याहून अधिक वेळा मांसाहारी आहार घेतात. 

एका दिवसात भारतीय किती मांस खातात?

आकड्यांनुसार, भारताची लोकसंख्या १.४ अरब आहे. जी पाकिस्तानच्या लोकसंख्येपेक्षा अनेक पटीने जास्त आहे. त्यामुळे देशातील एकूण मांस सेवनाचा  दैनंदिन किंवा वार्षिक आकडा भारतात जास्त आहे, पण प्रति व्यक्तीच्या खाण्याचा विचार केल्यास पाकिस्तान या बाबतीत भारताच्या पुढे आहे. पाकिस्तानात वर्षभरात एक व्यक्ती जवळपास १५ ते २५ किलो मासांचं सेवन करते. तर भारतात एक व्यक्ती ४ ते ६ किलो मांसाचं सेवन करते. ओईसीडीच्या जुन्या आकड्यांनुसार, भारतात एक व्यक्ती वर्षभरात जवळपास ३ किलोग्रॅम मासांचं सेवन करीत असल्याचं सांगितलं जात होतं. याचा अर्थ जवळपास एक भारतीय दररोज साधारण ८ किलो मांसांचं सेवन करतो. हा आकडा केवळ मांसाबद्दल आहे. यामध्ये अंडी, मासे किंवा दुसरे पशू आधारित खाद्यपदार्थांचा समावेश होत नाही. 

नक्की वाचा - Late Night Eating : रात्री 9 नंतर जेवणाची सवय आहे? दुष्परिणामांची यादी पाहून धक्काच बसेल!


पाकिस्तानात किती मांस खाल्लं जातं?

पाकिस्तानमध्ये मांसाहार अत्यंत महत्त्वाचा आहार आहे. तेथे केलेल्या सर्व्हेक्षणानुसार, ३८ टक्के लोक बीफ खाणं पसंत करतात. तर ३४ टक्के लोक चिकन आणि २५ टक्के लोक मटणाला प्राथमिकता देतात. पाकिस्तानात पशूधन आणि मांस उद्योगांशी संबंधित रिसर्चनुसार, २००० मध्ये प्रती व्यक्ती मासांचं सेवन जवळपास ११.७ किलो होता, जे सातत्याने वाढत आहे. काही संशोधनानुसार, काही वर्षांपूर्वी प्रती व्यक्ती मांसाचं सेवन तब्बल ३२ किलो वर्षाला असल्याचं सांगितलं जातं. मात्र आतंरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध काही आकड्यांनुसार, पाकिस्तानात प्रती व्यक्ती मांसांचं सेवन तब्बल १२.७ किलो असल्याचं सांगितलं जातं. 

भारत की पाकिस्तान, दोघांमध्ये मांस खाण्यात कोण पुढे?

आकड्यांनुसार, प्रती व्यक्ती मांस खाण्याच्या बाबत पाकिस्तान भारताहून पुढे आहे. याचा मोठं कारण म्हणजे भारतातील मोठी शाकाहारी लोकसंख्या, धार्मिक परंपरा आणि स्थानिक खाद्य संस्कृतीतील वैविध्य आहे. तर पाकिस्तानात अधिकांश मांसाहार केला जातो आणि बीफ, मटण किंवा चिकनचा जेवणात सर्वाधिक समावेश केला जातो.    


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com